Thursday, October 13, 2022

प्राजक्ता गायकवाड झळकणार "काटा किर्रर्र" या आगामी चित्रपटामध्ये...

                  प्राजक्ता गायकवाड झळकणार "काटा किर्रर्र" या आगामी चित्रपटामध्ये...


स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेमधून आपल्या अभिनयाची छाप सोडत तमाम मराठी भाषिक प्रेक्षकांच्या मनात घर करणारी, अभिनयाने परिपूर्ण अशी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड "काटा किर्रर्र" या आगामी चित्रपटामधून आपल्या भेटीला येणार आहे.  प्रेम करण्यासाठी कोणत्याच गोष्टींच्या बंधनाची गरज नसते, आणि जिथे कोणत्याही प्रकारचे बंधने येतात तिथे प्रेम कधीच होत नाही. काटा किर्रर्र चित्रपटामधून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आपल्याला मोहिनी या भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. आपल्या भावावर म्हणजेच चित्रपटामधील मुख्य कलाकार कांतावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्याच्या पाठीशी उभी राहून त्याच्या साठी झगडणारी अशी बहीण आपल्याला चित्रपटामध्ये बघायला मिळेल. आपल्या परिपूर्ण अशा अभिनय कौशल्याने प्राजक्ता गायकवाड हिने मोहिनी या भूमिकेला साजेसा न्याय मिळवून दिला आहे. प्राजक्ताने स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेमधून येसूबाईंची नाविन्यपूर्ण अशी भूमिका साकारत सगळ्या प्रेक्षकांच्या मनामध्ये एक वेगेळे असे स्थान मिळवले आहे. याच प्रेमाची परतफेड करत प्राजक्ता गायकवाड काटा किर्रर्र मधून पुन्हा एकदा आपले मनोरंजन करायला सज्ज झाली आहे. आपल्या प्रत्येक भूमिकेला साजेसा असा अभिनय करणारी हि हरहुन्नरी अभिनेत्री नेहमीच तिच्या कामामध्ये शंभर टक्के देत आलेली आहे, याच उत्तम उदाहरण आपल्याला काटा किर्रर्र मध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे.


 प्रेम आणि करियर या नाजूक अशा विषयावर भाष्य करत दिग्दर्शक जितेंद्र वाईकर यांनी दिग्दर्शनाची बाजू खूप चांगल्या पद्धतीने सांभाळली आहे. तसेच चित्रपटामध्ये निर्माते सतीश देवकर स्वतः मुख्य भूमिकेमध्ये बघायला मिळणार आहे, त्याचसोबत स्नेहा कुडवाडकर, कमलेश सावंत, सुरेश विश्वकर्मा, आणि विशाल चव्हाण यांसारखे दमदार कलाकार सुद्धा आपल्या भेटीला येणार आहेत. नुकतंच या चित्रपटाचे दमदार असे, काटा किर्रर्र हे  गाणं सोशल मिडिया वर गाजत असून या तडफदार गाण्याला आनंद शिंदे यांनी आवाज दिला आहे. प्रेम आणि संघर्ष यासारख्या नाजूक विषयावर भाष्य करणारा "काटा किर्रर्र" हा चित्रपट येत्या १४ ऑक्टोबर २०२२ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून हा चित्रपट सगळ्यांचे मनोरंजन करेल यामध्ये काही वाद नाही.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...