दिवाळी निमित्त 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' च्या मंचावर पाहुणे म्हणून प्रशांत दामले आले आहेत.
एक विशेष ईच्छा व्यक्त केली ती म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातील कलाकारांसोबत स्कीट करण्याची. हास्य जत्रेचे शूटिंग हा तसा किचकट भाग असतो शूटिंगच्या आदल्या दिवशी रंगीत तालमी करणं गरजेचं असतं, प्रशांत दामले त्यांच्या अत्यंत व्यस्त अशा वेळापत्रकातून वेळ काढून तालमीला हजेरी लावली. तब्बल चार ते पाच तास ते सलग सगळ्या कलावंतांबरोबर ते तालीम करत होते त्यांनी तालमीची ही प्रोसेस मजा घेत पूर्ण केली. नाटकासारखं मूळ स्क्रिप्ट बरोबर स्क्रिप्टला साजेस असं इम्प्रोवायझेशन देखील ते करत होते. या स्कीटमध्ये त्यांच्याबरोबर प्राजक्ता माळी, समीर चौगुले शिवाजी परब ओंकार राऊत आणि चेतना भट यांनी देखील सहभाग घेतला आहे. शूटिंगच्या दिवशी सुद्धा इतर कलावंतांसारखं, 'माझे कपडे कुठले असतील? माझा प्रवेश कधी होणार आहे? प्रवेशाच्या वेळेला कोणी काय करायचं? ए जास्त एडिशन घ्यायचे नाही, व्यवस्थित सुटसुटीत साचेबद्ध पण तडाखेबाज करूयात अशा सूचनावजा सल्ला देत प्रशांत दामले यांनी हास्य जत्रेच्या रंगमंचावरती एन्ट्री घेतली आणि हास्याचा आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. अगदी पहिल्या सेकंदापासून स्कीटच्या शेवटच्या सेकंदापर्यंत त्या टाळ्या आणि अशा थांबल्याच नाहीत.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' च्या मंचावर प्रशांत दामले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रेक्षकांना दिवाळी निमित्त विशेष प्रशांत दामले यांचे स्कीट पाहायला मिळणार आहे. प्रशांत दामले यांना कॉमेडी स्कीट मध्ये पाहणं म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे. दिवाळी विशेष भाग सोमवार २४ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पाहायला विसरू नका 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोमवार, रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर.
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST