गोदरेज इंटेरिओने मुंबईत सुरु केले भारतातील पहिले हेल्थकेअर एक्सपीरियन्स सेंटर
गोदरेज इंटेरिओने मुंबईत सुरु केले भारतातील पहिले हेल्थकेअर एक्सपीरियन्स सेंटर
'एलिवेटिंग एक्सपीरियन्सेस, एंरीचिंग लाइव्हस' संशोधन अहवालाचे प्रकाशन, भारतात आरोग्य सेवा प्रदान करत असताना नर्सिंग कर्मचाऱ्यांना सहन कराव्या आव्हानांची माहिती
मुंबई, २६ ऑगस्ट, २०१९: घरगुती आणि इन्स्टिट्यूशनल वापराच्या फर्निचरचा भारतातील आघाडीचा ब्रँड गोदरेज इंटेरिओने आज 'गोदरेज इंटेरिओ हेल्थकेअर एक्सपीरियन्स सेंटर' चे उदघाटन केले. ही एक अभिनव रिटेल संकल्पनाअसून हे अशाप्रकारचे पहिलेच केंद्र आहे ज्याठिकाणी आरोग्यसेवा क्षेत्रासाठी गोदरेज इंटेरिओने तयार केलेली सर्वोत्तम उतपादने व सेवांचा अनुभव घेता येईल.
हेल्थकेअर एक्सपीरियन्स सेंटरच्या उदघाटन प्रसंगी गोदरेज अँड बॉयस मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेडच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष श्री. जमशेद गोदरेज, गोदरेज इंटेरिओचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्री. अनिल माथूर यांच्यासहहॉसमॅकचे संचालक डॉ. विवेक देसाई, मसिनाचे सीईओ डॉ. विस्पी जोखी, हिंदुजाचे सीईओ श्री. गौतम खन्ना, हे वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गज तज्ञ देखील उपस्थित होते. सर्व हितधारकांची काळजी घेणारी, त्यांच्या गरजा पूर्ण करणारीउत्पादने विकसित करण्याच्या मानव-केंद्रित दृष्टिकोनावर आणि सहज वापरता येण्याजोग्या सुविधांवर आधारित गोदरेज इंटेरिओच्या तत्त्वज्ञानाला अनुसरून हे सेंटर तयार करण्यात आले आहे.
नवीन सेंटरच्या उदघाटन प्रसंगी गोदरेज अँड बॉयसचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष श्री. जमशेद गोदरेज यांनी सांगितले, "प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात दर दिवशी जीवनशैलीच्या गुणवत्तेमध्ये विकास घडून यावा हे गोदरेज अँडबॉयसचे उद्धिष्ट आहे. भरपूर विस्तार, प्रसार, सेवा, सरकार आणि खाजगी संस्था या दोन्ही बाजूंनी सतत वाढत असलेली गुंतवणूक यामुळे भारतात आरोग्यसेवा क्षेत्र वेगाने विकसित होत आहे. परंतु आजही आपल्याकडे अशा खासवातावरणाची कमतरता आहे ज्यामुळे रुग्णांना आराम व सुरक्षित वाटेल, त्याचबरोबरीने खर्चाचे आव्हानही सहज पेलता येईल. क्षेत्राची विशिष्ट आव्हाने लक्षात घेऊन गोदरेजमध्ये आम्ही वेगवेगळी नाविन्यपूर्ण उत्पादने, सुविधा तयारकरत असतो. उदाहरणार्थ, लवकरच आम्ही जगातील पहिला असा बेड तयार करणार आहोत जो हॉस्पिटलमध्येच मॅन्युअल ते मोटराइज्ड असा बदलता येऊ शकेल. यामुळे हॉस्पिटल्सना एकच बेड नंतरसुद्धा अपग्रेड करता येईल. वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून आरोग्यसेवा सुविधांचा दर्जा सुधारावा यासाठी गोदरेज इंटेरिओ प्रयत्न करत आहे ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे."
गोदरेज इंटेरिओचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्री. अनिल माथूर यांनी सांगितले, "आरोग्यसेवा हे भारतातील सर्वात मोठ्या क्षेत्रांपैकी एक आहे. महसूल आणि रोजगार निर्मिती या दोन्ही बाबतीत तसेच १६-१७ टक्के दराने वाढणारासीएजीआर या सर्वच बाबतीत या क्षेत्राची क्षितिजे विस्तारत आहेत. परंतु भारतात उपलब्ध असलेल्या आरोग्यसेवा सुविधा या बदलत्या गरजांना पुरेशा पडणाऱ्या नाहीत. गोदरेज इंटेरिओ हेल्थकेअर व्यवसायाने असे वातावरण निर्माणकरण्यावर लक्ष केंद्रित केले आहे ज्यामध्ये रुग्ण व त्याच्या आप्तेष्टांना उपचारांच्या कालावधीत समाधानदायक अनुभव मिळेल. एर्गोनॉमिकली डिझाईन करण्यात आलेल्या वातावरणाचा मुख्य भर क्षमता, सहानुभूती आणि रुग्ण, काळजी घेणारे कर्मचारी, नातेवाईक आणि डॉक्टर या सर्वांचे कल्याण यावर असेल. हेल्थकेअर एक्सपीरियन्स सेंटरमध्ये आमचे डिझाईन तत्वज्ञान दिसून येते जे मानवकेंद्रित दृष्टिकोनावर आणि रुग्ण-डॉक्टर यांच्या दरम्यान जास्तचांगला संवाद व्हावा यासाठी सहजसोप्या सुविधांवर आधारित आहे."
याप्रसंगी गोदरेज इंटेरिओने आरोग्यसेवा क्षेत्राशी संबंधित आपल्या पहिल्या सर्वेक्षणाच्या अहवालाचेही प्रकाशन केले. 'एलिवेटिंग एक्सपीरियन्सेस, एंरीचिंग लाइव्हस' या सर्वेक्षणामध्ये भारतात आरोग्यसेवा प्रदान करत असताना नर्सिंगकर्मचाऱ्यांना ज्या आव्हानांचा सामना करावा लागतो त्यांची माहिती मिळते.
या सर्वेक्षणातून दिसून येते की ९०% नर्सेसनी त्यांना काहीना काही सांध्यांचा आजार असल्याची तक्रार केली आहे. नर्सिंगच्या कामात त्यांना दीर्घ काळपर्यंत उभे राहावे लागते. ८८% नर्सेसनी सांगितले की त्या दिवसाचे ८-१० तास कामकरतात, शिवाय महिन्यातून कमीत कमी दोनदा किंवा तीनदा ओव्हरटाईम करतात (३५% नर्सेस महिन्यातून तीनपेक्षा जास्त वेळा ओव्हरटाईम करतात). ७४% नर्सेस दर दिवशी ४-६ तासांपेक्षा जास्त काळ सलग उभ्या असतात ज्यामुळेत्यांना कंबर आणि पायाचे विकार जडतात. कामाचे लांबलचक तास, ओव्हरटाईम, भरपूर काम यामुळे नर्सच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. तज्ञांनी असा इशारा दिला आहे की आजारी, त्रासलेले, थकलेलेकर्मचारी हे आरोग्यक्षेत्रात घडणाऱ्या चुकांना कारणीभूत असलेल्या प्रमुख घटकांपैकी एक आहेत.