Tuesday, August 27, 2019

गोदरेज इंटेरिओने मुंबईत सुरु केले भारतातील पहिले हेल्थकेअर एक्सपीरियन्स सेंटर

गोदरेज इंटेरिओने मुंबईत सुरु केले भारतातील पहिले हेल्थकेअर एक्सपीरियन्स सेंटर


गोदरेज इंटेरिओने मुंबईत सुरु केले भारतातील पहिले हेल्थकेअर एक्सपीरियन्स सेंटर
'एलिवेटिंग एक्सपीरियन्सेसएंरीचिंग लाइव्हससंशोधन अहवालाचे प्रकाशनभारतात आरोग्य सेवा प्रदान करत असताना नर्सिंग कर्मचाऱ्यांना सहन कराव्या आव्हानांची माहिती

मुंबई२६ ऑगस्ट२०१९:  घरगुती आणि इन्स्टिट्यूशनल वापराच्या फर्निचरचा भारतातील आघाडीचा ब्रँड गोदरेज इंटेरिओने आज 'गोदरेज इंटेरिओ हेल्थकेअर एक्सपीरियन्स सेंटरचे उदघाटन केले.  ही एक अभिनव रिटेल संकल्पनाअसून हे अशाप्रकारचे पहिलेच केंद्र आहे ज्याठिकाणी आरोग्यसेवा क्षेत्रासाठी गोदरेज इंटेरिओने तयार केलेली सर्वोत्तम उतपादने  सेवांचा अनुभव घेता येईल.

हेल्थकेअर एक्सपीरियन्स सेंटरच्या उदघाटन प्रसंगी गोदरेज अँड बॉयस मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेडच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष श्रीजमशेद गोदरेजगोदरेज इंटेरिओचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्रीअनिल माथूर यांच्यासहहॉसमॅकचे संचालक डॉविवेक देसाईमसिनाचे सीईओ डॉविस्पी जोखीहिंदुजाचे सीईओ श्रीगौतम खन्ना, हे वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गज तज्ञ देखील उपस्थित होते.  सर्व हितधारकांची काळजी घेणारीत्यांच्या गरजा पूर्ण करणारीउत्पादने विकसित करण्याच्या मानव-केंद्रित दृष्टिकोनावर आणि सहज वापरता येण्याजोग्या सुविधांवर आधारित गोदरेज इंटेरिओच्या तत्त्वज्ञानाला अनुसरून हे सेंटर तयार करण्यात आले आहे.



नवीन सेंटरच्या उदघाटन प्रसंगी गोदरेज अँड बॉयसचे व्यवस्थापकीय संचालक  अध्यक्ष श्रीजमशेद गोदरेज यांनी सांगितले"प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात दर दिवशी जीवनशैलीच्या गुणवत्तेमध्ये विकास घडून यावा हे गोदरेज अँडबॉयसचे उद्धिष्ट आहे.  भरपूर विस्तारप्रसारसेवासरकार आणि खाजगी संस्था या दोन्ही बाजूंनी सतत वाढत असलेली गुंतवणूक यामुळे भारतात आरोग्यसेवा क्षेत्र वेगाने विकसित होत आहे.  परंतु आजही आपल्याकडे अशा खासवातावरणाची कमतरता आहे ज्यामुळे रुग्णांना आराम  सुरक्षित वाटेलत्याचबरोबरीने खर्चाचे आव्हानही सहज पेलता येईल.  क्षेत्राची विशिष्ट आव्हाने लक्षात घेऊन गोदरेजमध्ये आम्ही वेगवेगळी नाविन्यपूर्ण उत्पादनेसुविधा तयारकरत असतो.  उदाहरणार्थलवकरच आम्ही जगातील पहिला असा बेड तयार करणार आहोत जो हॉस्पिटलमध्येच मॅन्युअल ते मोटराइज्ड असा बदलता येऊ शकेल.  यामुळे हॉस्पिटल्सना एकच बेड नंतरसुद्धा अपग्रेड करता येईलवेगवेगळ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून आरोग्यसेवा सुविधांचा दर्जा सुधारावा यासाठी गोदरेज इंटेरिओ प्रयत्न करत आहे ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे."  



गोदरेज इंटेरिओचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्रीअनिल माथूर यांनी सांगितले, "आरोग्यसेवा हे भारतातील सर्वात मोठ्या क्षेत्रांपैकी एक आहे.  महसूल आणि रोजगार निर्मिती या दोन्ही बाबतीत तसेच १६-१७ टक्के दराने वाढणारासीएजीआर या सर्वच बाबतीत या क्षेत्राची क्षितिजे विस्तारत आहेतपरंतु भारतात उपलब्ध असलेल्या आरोग्यसेवा सुविधा या बदलत्या गरजांना पुरेशा पडणाऱ्या नाहीत.  गोदरेज इंटेरिओ हेल्थकेअर व्यवसायाने असे वातावरण निर्माणकरण्यावर लक्ष केंद्रित केले आहे ज्यामध्ये रुग्ण  त्याच्या आप्तेष्टांना उपचारांच्या कालावधीत समाधानदायक अनुभव मिळेल.  एर्गोनॉमिकली डिझाईन करण्यात आलेल्या वातावरणाचा मुख्य भर क्षमतासहानुभूती आणि रुग्णकाळजी घेणारे कर्मचारीनातेवाईक आणि डॉक्टर या सर्वांचे कल्याण यावर असेल.  हेल्थकेअर एक्सपीरियन्स सेंटरमध्ये आमचे डिझाईन तत्वज्ञान दिसून येते जे मानवकेंद्रित दृष्टिकोनावर आणि रुग्ण-डॉक्टर यांच्या दरम्यान जास्तचांगला संवाद व्हावा यासाठी सहजसोप्या सुविधांवर आधारित आहे." 

याप्रसंगी गोदरेज इंटेरिओने आरोग्यसेवा क्षेत्राशी संबंधित आपल्या पहिल्या सर्वेक्षणाच्या अहवालाचेही प्रकाशन केले.  'एलिवेटिंग एक्सपीरियन्सेसएंरीचिंग लाइव्हसया सर्वेक्षणामध्ये भारतात आरोग्यसेवा प्रदान करत असताना नर्सिंगकर्मचाऱ्यांना ज्या आव्हानांचा सामना करावा लागतो त्यांची माहिती मिळते.

या सर्वेक्षणातून दिसून येते की ९०नर्सेसनी त्यांना काहीना काही सांध्यांचा आजार असल्याची तक्रार केली आहे.  नर्सिंगच्या कामात त्यांना दीर्घ काळपर्यंत उभे राहावे लागते.  ८८नर्सेसनी सांगितले की त्या दिवसाचे -१० तास कामकरतातशिवाय महिन्यातून कमीत कमी दोनदा किंवा तीनदा ओव्हरटाईम करतात (३५नर्सेस महिन्यातून तीनपेक्षा जास्त वेळा ओव्हरटाईम करतात). ७४नर्सेस दर दिवशी - तासांपेक्षा जास्त काळ सलग उभ्या असतात ज्यामुळेत्यांना कंबर आणि पायाचे विकार जडतात.  कामाचे लांबलचक तासओव्हरटाईमभरपूर काम यामुळे नर्सच्या शारीरिक  मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.  तज्ञांनी असा इशारा दिला आहे की आजारीत्रासलेलेथकलेलेकर्मचारी हे आरोग्यक्षेत्रात घडणाऱ्या चुकांना कारणीभूत असलेल्या प्रमुख घटकांपैकी एक आहेत.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...