Thursday, August 22, 2019

शिवानी सुर्वेला मिळाले ‘टिकिट टू फिनाले’

शिवानी सुर्वेला मिळाले ‘टिकिट टू फिनाले’

अभिनेत्री शिवानी सुर्वे बिग बॉस मराठीच्या दूस-या पर्वातली सर्वाधिक स्ट्राँग स्पर्धक आहे, हे पहिल्या दिवसापासून दिसत होतेच. तिच गोष्ट तेराव्या आठवड्यातही पून्हा एकदा अधोरेखीत झालीय. बिग बॉसच्या घरात आलेल्या नऊपैकी पाच स्पर्धकांनी शिवानी सुर्वेला ‘टिकिट टू फिनाले’ दिले आहे.

बाप्पा जोशी, दिगंबर नाईक, सुरेखा पुणेकर, रूपाली भोसले, माधव देवचके ह्या पाच स्पर्धकांना शिवानी सुर्वे स्ट्राँग स्पर्धक वाटत असल्याचे दिसून आले आहे. दिगंबर नाईक ह्यांनी शिवानीला टिकिट टू फिनाले देताना म्हटले, “बिग बॉसच्या घरात शेवटपर्यंत जाण्यासाठी जसे खेळायला हवे. तसेच शिवानी तू खेळत आहेस. तू एक स्ट्राँग कंटेस्टंट आहेस. तू खूप छान खेळत आहेस.”

तर रूपाली भोसले शिवानीविषयी म्हणाली, “काही कारणामूळे शिवानी बाहेर गेली. पण सर्व गोष्टींवर मात करून ती परत आली, आणि परतल्यावर ज्या स्ट्राँग पध्दतीने ती खेळतेय. मला खरंच आवडतंय.”

सगळे एक्स-कंटेस्टंट परतल्यावर शिवानीसोबतची त्यांची बॉन्डिंगही स्पष्ट दिसून येत होती. सूत्रांच्या अनुसार, बिग बॉसमधून प्रकृतीच्या कारणास्तव बाहेर पडलेल्या शिवानीने पूर्ण बरे होऊन ह्या खेळात परतल्यावर बिग बॉसच्या इतर स्पर्धकांसोबतच प्रेक्षकांचीही मने जिंकली. शिवानीमध्ये दर दिवशी दिसलेला सकारात्मक बदल, तिचे ह्या खेळाला घेऊन दिसत असलेले गांभिर्य, सर्व स्पर्धकांसोबत मिळून-मिसळून वागणे, टास्कमधला सक्रिय सहभाग अशा अनेक जमेच्या बाबी आहेत. तिच्या चाहत्यांचे तिच्यावर असलेले प्रेम वेळोवेळी चाहत्यांनीही सोशल मीडियावरून दाखवून दिले आहे.


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...