Monday, August 12, 2019

जीआयटीएम 2019 चे आयोजन करण्यासाठी गोवा टुरिझम सज्ज, 23- 25 ऑक्टोबर दरम्यान गोव्यातील सर्वात मोठ्या बीटुबी ट्रॅव्हल नेटवर्किंग कार्यक्रमाचे आयोजन

जीआयटीएम 2019 चे आयोजन करण्यासाठी गोवा टुरिझम सज्ज, 23- 25 ऑक्टोबर दरम्यान गोव्यातील सर्वात मोठ्या बीटुबी ट्रॅव्हल नेटवर्किंग कार्यक्रमाचे आयोजन



पणजी, 7 ऑगस्ट 2019 – गोवा इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्टचे (जीआयटीएम) 23 ते 25 ऑक्टोबर 2019 दरम्यान डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी मैदान, तळेइगाव येथे आयोजन करण्यात आले आहे. या प्रतिष्ठित बीटुबी कार्यक्रमात प्रवासी कंपन्या, हॉटेलचालक, इको टुरिझम, साहस, वन्यजीव, नाइटलाइफ, इव्हेंट व्यवस्थापक, वेडिंग प्लॅनर्स आणि इतर जीवनशैलीविषयक उद्योजक राज्यातील पर्यटन गुंतवणुकीची क्षमता दर्शवण्यासाठी एकाच छताखाली एकत्र येणार आहेत.


गोवा सरकारचे पर्यटन सचिव श्री. जे. अशोक कुमार म्हणाले, ‘येत्या ऑक्टोबरमध्ये जीआयटीएमच्या तिसऱ्या आवृत्तीचे आयोजन करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. 2011 आणि 2014 मध्ये झालेल्या पहिल्या दोन आवृत्त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि यावर्षी हा कार्यक्रम आणखी मोठा व भव्य केला जाणार आहे. जेव्हा संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्था पर्यटनावर महत्त्वाचे क्षेत्र म्हणून लक्ष केंद्रित करत असताना आणि पर्यटकांची नवनव्या ठिकाणांचा शोध व अनुभव घेण्याची इच्छा वाढत असताना जीआयटीएमसारखे व्यासपीठ भागधारकांना संवाद साधण्यासाठी, विकासासाठी आवश्यक व्यावसायिक संधींचा शोध घेण्यासाठी, नाविन्यपूर्ण गोष्टी करण्यासाठी आदर्श आहे. मी जीआयटीएमला शुभेच्छा देतो आणि सर्व पर्यटन भागधारकांना सहकार्य करण्याचे मान्य करतो.’


यावर्षाचे जीआयटीएम गेल्या वर्षाच्या तुलनेत जास्त मोठे असून अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, स्कँडेनेव्हिया, बाल्टिक्स, सीआयएस, ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड, क्रोएशिया, बल्गेरिया, इस्त्राएल, जॉर्डन, संयुक्त अरब अमिराती, मध्य पूर्व, इटली, झेक रिपब्लिक, रशियास पोलंड, नॉर्वो, फिनलँड, डेन्मार्क, स्वीडन, मलेशिया या देशांतले 125 आंतरराष्ट्रीय खरेदीदार त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला देशांतर्गत पातळीवरही मोठी प्रतिष्ठा असून 150 खरेदीदार त्यात सहभागी होणार आहेत. जीआयटीएमला या क्षेत्रातील टीटीएजी, टीएएआय, टीएएफआय, एडीवायओआय, एटीटीओआय आणि आयएटीओ या संस्थांचाही भरघोस पाठिंबा लाभला आहे.


आंतरराष्ट्रीय मीडिया, सुमारे 25 ब्लॉगर्स, पर्यटन- व्यापार क्षेत्राचे वार्तांकन करणारे 35 देशांतर्गत मीडिया या कार्यक्रमासाठी उपस्थित राहाणार आहे.


पर्यटन- व्यापार, हॉटेलचालक आणि गोव्यातील इतर भागधारकांना भारत व परदेशातील आघाडीचे ट्रॅव्हल एजंट्स आणि चालकांबरोबर प्रत्यक्ष संवाद साधण्याची व नेटवर्किंगची संधी देणे हे जीआयटीएम 2019 चे मुख्य ध्येय आहे. जीआयटीएम व्यापारी संघटना/राष्ट्रीय पर्यटन संस्था, विमानकंपन्या, प्रवासी एजंट्स, सहल चालक, हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स, साहस पर्यटन चालक, मसाल्याच्या बागा इत्यादीपर्यंतही पोहोचणार आहे. गोव्याच्या पर्यटन क्षेत्रातील संधी आणि क्षमता दर्शवण्याखेरीज हा कार्यक्रम गोव्यातील विविध क्षेत्रांना समोर आणून त्यातून राज्याचे बहुपैलुत्व व्यक्त करणार आहे.



गोव्यातील नाइटलाइफ, समुद्रकिनारे, हेरिटेज ट्रेल्स, युनेस्को हेरिटेज साइट्स, वन्यजीव, वैद्यकीय पर्यटन, पावसाळी पर्यटन एमआयसीई, वेडिंग डेस्टिनेशन, धार्मिक पर्यटन, मसाल्यांची शेती आणि साहसी उपक्रम, प्राचीन वारसा, कला, कारागिरी यांचा प्रचार, भूभाग पर्यटनाचा प्रसार, राज्याची श्रीमंत संस्कृती आणि वारसा इत्यादी दर्शवण्यासाठी खास गोवा पॅव्हेलियनही तयार केले जाणार आहे.



जीटीआयएममध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक भागधारकांचा त्याला भरघोस प्रतिसाद लाभत असून पर्यटन उद्योग व्यावसायिकांशिवाय विशिष्ट प्रकारच्या सहली, लीझर उपक्रम आयोजित करणारे, एमआयसीई चालक, इव्हेंट व्यवस्थापक, प्रसिद्ध पर्यटन लेखक, ब्लॉगर्स आणि स्तंभलेखक त्यात सहभागी होणार आहेत. प्रवासी एजंट्स आणि सहल चालकांना नॉन- हॉस्टेड बेसिसवर सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.



देशांतर्गत सहभागी खरेदीदार संख्या 150
सहभागी आंतरराष्ट्रीय खरेदीदार संख्या
125

आंतरराष्ट्रीय मीडियाची संख्या 25

देशांतर्गत मीडियाची संख्या 35

सहभागींची एकूण संख्या 335

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

चाळीस वर्षांनी 'पुरुष' पुन्हा एकदा गाजवणार मराठी रंगभूमी

  चाळीस वर्षांनी 'पुरुष' पुन्हा एकदा गाजवणार मराठी रंगभूमी  १४ डिसेंबरला सादर होणार पहिला प्रयोग  जयवंत दळवी यांच्या लेखणीतून साकारल...