Friday, August 16, 2019

सैन्यातील जवानांसाठी दोन लाख राख्या तयार करण्यासाठी फेविकोल ए + चे एनएबी आणि शालेय विद्यार्थ्यांशी सहकार्य

सैन्यातील जवानांसाठी दोन लाख राख्या तयार करण्यासाठी फेविकोल ए + चे एनएबी आणि शालेय विद्यार्थ्यांशी सहकार्य

सैन्यातील जवानांसाठी दोन लाख राख्या तयार करण्यासाठी फेविकोल  + चे एनएबी आणि शालेय विद्यार्थ्यांशी सहकार्य

मुंबई14 ऑगस्ट 2019 – फेविकोल  + – पिडीलाइटचा नाविन्यपूर्ण क्राफ्टिंग ग्लू अ बाँड ऑफ लव्ह या उपक्रमासह देशभर रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा करत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून फेविकोल  + ने नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड इंडियाबरोबर (एनएबी) भारतीय सैन्य दलातील जवानांसाठी 1.5 लाख राख्या तयार करण्यासाठी सहकार्य केले आहे.
एनएबीमधील अंध स्त्रियांनी फेविकोल  + आणि पिडीलाइट टीमने त्यांच्यासाठी खास तयार केलेले डिझाइन्स वापरून सुंदर राख्या तयार केल्या आहेत. पहिल्यांदाच एनएबीने तयार केलेल्या राख्या शिवण्याऐवजी चिकटवण्यात आल्यामुळे हे काम या स्त्रियांसाठी कितीतरी सोपे झाले. त्याशिवाय शालेय विद्यार्थ्यांनाही जवानांप्रती आदर व ऋण व्यक्त करण्यासाठी आपल्या हाताने राखी आणि पत्र तयार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. 600 शाळांतील एक लाख विद्यार्थ्यांनी राखी बनवण्याच्या या उपक्रमात सहभागी होऊन एक लाख राख्या तयार केल्या.

राखी बनवण्याचा हा उपक्रम जुलै 2019 मध्ये सुरू झाला आणि ऑगस्ट 2019 मध्ये संपला. देशातील 16 शहरांत हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
एकंदर 2.5 लाख राख्या तयार करण्यात आल्या असून त्या रक्षा बंधनासाठी जवानांना पाठवल्या जातील.


पिडीलाइट इंडस्ट्रीज लि. च्या ग्राहक उत्पादन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शांतनू भांजा म्हणाले, सर्वांमध्ये सर्जनशीलता रूजवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आमच्या फेव्हिक्रिएट उपक्रमाद्वारे आयोजित करण्यात आलेला बाँड ऑफ लव्ह हा उपक्रम राष्ट्राच्या हिरोंप्रती प्रेम आणि आदर व्यक्त करण्याचा आमचा मार्ग आहे. आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी एनएबीमधील स्त्रिया आणि शालेय विद्यार्थ्यांनी ज्या उत्साहाने या राख्या तयार केल्यातो कौतुकास्पद आहे. अंध स्त्रियांनी दर्शवलेले कौशल्य थक्क करणारे आहे आणि आपल्या सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी कलाकुसर करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी त्या प्रेरणादायी आहेत. विद्यार्थ्यांनाही जवानांप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी आपले कलाकुसर कौशल्य वापरता यावे म्हणून फेविकोल  + सारखे उत्पादन उपलब्ध करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

जैन मुनि डॉ अजितचंद्र सागर जी महाराज बनाएंगे नया विश्व रिकॉर्ड।

  जैन मुनि डॉ अजितचंद्र सागर जी महाराज बनाएंगे नया विश्व रिकॉर्ड।  योगा और साधना की शक्ति देखेगी दुनिया।  मुंबई, अप्रैल 2024  - जैन धर्म के ...