Thursday, August 29, 2019

अभिनेता अंकुश चौधरीने शिवानी सुर्वेला दिल्या वाढदिवसाच्या ट्रिपल शुभेच्छा

अभिनेता अंकुश चौधरीने शिवानी सुर्वेला दिल्या वाढदिवसाच्या ट्रिपल शुभेच्छा


अभिनेता अंकुश चौधरीने शिवानी सुर्वेला दिल्या वाढदिवसाच्या ट्रिपल शुभेच्छा
बिग बॉस मराठीच्या दुस-या पर्वातील स्ट्राँग कंटेस्टंट शिवानी सुर्वेचा 28 ऑक्टोबरला वाढदिवस असतो. बिग बॉस मराठीच्या दूस-या पर्वातली स्ट्राँग कंटेस्टंट असलेल्या शिवानीला सध्या तिचे महाराष्ट्रभरातले फॅन्स वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतानाच तिच्यासाठी महाराष्ट्राच्या सुपरस्टारने दिलेल्या शुभेच्छा खूप खास आहेत. महाराष्ट्राचा सुपरस्टार अंकुश चौधरीने  शिवानी सुर्वेला वाढदिवसाच्या आणि बिग बॉस मराठी सिझनची विजेती होण्यासाठी ट्रिपल शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेता अंकुश चौधरीसोबत शिवानी सुर्वेची येत्या 24 ऑक्टोबरला 'ट्रिपल सीटही फिल्म येत आहे. बिग बॉसमधली बॉस ब्युटी शिवानी सुर्वेसाठी ही फिल्म खूप खास आहे. शिवानी सुर्वेने बिग बॉसमध्ये एका टास्क दरम्यान सुपरस्टार अंकुश चौधरी यांच्यासोबत काम करण्याचे आपले स्वप्न तिच्या आगामी सिनेमाव्दारे पूर्ण झाल्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या.
सूत्रांच्या अनुसार, शिवानी सुर्वे अंकुश चौधरीची लहानपणापासून खूप मोठी चाहती आहे. आणि फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवल्यावर एकदा तरी अंकुश चौधरी यांच्यासोबत काम करायला मिळावं, ही शिवानीची इच्छा होती. जी तिच्या ट्रिपल सीट सिनेमाव्दारे पूर्ण झालीय. शिवानीच्या वाढदिवसानिमीत्त शिवानी-अंकुशचे पोस्टरही अनविल करण्यात आले आहे. त्यात अंकुश चौधरी ह्यांनी तिला शुभेच्छा देणं म्हणजे तिच्यासाठी नक्कीच हा दुग्धशर्करा योग असणार आहे. तिला अर्थातच ही गोष्ट बिग बॉसच्या घरात असल्याने माहित नाही आहे. पण याचा उलगडा तिला बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर नक्कीच होईल.
ट्रिपल सीट सिनेमाचा नायक अंकुश चौधरी ह्यांनी शिवानीला शुभेच्छा देताना म्हंटलंय, ''शिवानी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि बिग बॉस मराठीच्या दुस-या पर्वातील ग्रँड फिनालेसाठी तुला माझ्याकडून ट्रिपल सीट शुभेच्छा.''

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Shivangi Sharma Redefines Stardom with Music, Magic & a Million-Watt Presence WITH HER LAST SONG “INDIA KA IPL” WITH DJ BRAVO

  Shivangi Sharma Redefines Stardom with Music, Magic & a Million-Watt Presence WITH HER LAST SONG “INDIA KA IPL” WITH DJ BRAVO Riding h...