Tuesday, August 13, 2019

सलमान खानने दिला शिवानी सुर्वेला सल्ला

सलमान खानने दिला शिवानी सुर्वेला सल्ला
सलमान खानने दिला शिवानी सुर्वेला सल्ला

बिग बॉस मराठीच्या दूस-या पर्वात विकेन्डला सर्वांना एक छान सरप्राइज मिळालं. बॉलीवुड सुपरस्टार सलमान खानची चक्क विकेन्डला शोमध्ये एन्ट्री झाली. लहानपणापासुन सलमान खानची चाहती असलेल्या शिवानी सुर्वेसाठी तर सलमान खानला याची देही याची डोळा पाहणं आणि त्याच्यासोबत बातचीत करायला मिळणं हा सुखद आश्चर्याचा धक्का होता.

महेश मांजरेकरांनी शिवानीचा परिचय करून देताना, अँग्री यंग वुमन असा करून दिला. म्हणूनच सलमान खानला शोमध्ये आलेलं पाहून शिवानीने महेश मांजरेकर ह्यांना प्रश्नही विचारला की, सर, हे स्वप्न आहे, की सत्य हेच मला समजत नाही.”…

सलमाननेही आपल्या चाहतीची थट्टा-मस्करी करायला सुरूवात केली. सलमान म्हणाला, हो मी सलमानचा डुप्लिकेट आहे. खरं तर, मी तुला माझ्या एका फिल्ममध्ये घेणार होतो. पण तू बिगबॉसच्या घरात आहेस. तुला जर फिल्म करायची असेल, तर एक पर्याय आहे. तिथे कुणाला तरी थप्पड मारून निघून ये. नियमांचं उल्लंघन करून टाक.

शिवानीने ह्यावेळी आठवणी सांगितल्या, पूर्वी सलमान खानच्या घराखाली जाऊन मी अनेकदा जानम समझा करो चित्रपटातलं जिद ना करो जरा समझा करो’ हे गाणं नेहमी गायचे.

ह्यावेळी शिवानीने सलमानसमोर त्याच्याच 'मुझसे शादी करोगे' ह्या सिनेमातलं जिने के है चार दिन ह्या गाण्यावर डान्सकरून सलमानची वाहवाही घेतली.



No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

चाळीस वर्षांनी 'पुरुष' पुन्हा एकदा गाजवणार मराठी रंगभूमी

  चाळीस वर्षांनी 'पुरुष' पुन्हा एकदा गाजवणार मराठी रंगभूमी  १४ डिसेंबरला सादर होणार पहिला प्रयोग  जयवंत दळवी यांच्या लेखणीतून साकारल...