२३ ऑगस्टपासून सोनी मराठीवर दिसणार महाबली हनुमानचा महिमा
सोनी मराठीवर पहिल्यांदाच पौराणिक मालिका
आजपासून सुरू होणार महाबली हनुमान ची गाथा
२३ ऑगस्टपासून सोनी मराठीवर दिसणार महाबली हनुमानचा महिमा
वाहिनीची पहिली पौराणिक मालिका
महाबली हनुमान २३ ऑगस्टपासून सोनी मराठीवर
सोनी मराठी नवनवीन मालिका सादर करून प्रेक्षकांना मनोरंजनाचा वैविध्यपूर्ण अनुभव देत आहे . २३ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या महाबली हनुमान या नव्या मालिकेच्या निमित्ताने अशीच एक पौराणिकमालिका सोनी मराठीवर पहिल्यांदाच सादर होणार आहे.
भक्तीभावचैतन्य देऊ करणाऱ्या या नव्या मालिकेच्या निमत्ताने अंजनीसुताचा अवखळपणा, त्याचे गोड हट्ट, श्रीरामांवरचं प्रेम, त्याची भक्ती या सगळ्याच गोष्टी अनुभवता येणार आहे. या मालिकेचं शीर्षकगीत नुकतंच लाँच करण्यात आलं. समर्थ रामदासांच्या रचनेला संगीतकार देवेंद्र भोमे यांनी मॉडर्न संगीताचा साज चढवला आहे, तर अवधूत गुप्ते आणि जयदीप वैद्य यांनी हे स्तोत्र तितक्याच सुंदरपणे सादर केलं आहे.हे मारूती स्तोत्र नवीन अंदाजात सादर झाल्याने सोशल मीडिया वर ह्याचे विशेष कौतुक होताना दिसत आहे .
तेव्हा ही जीवनगाथा नक्की अनुभवा , महाबली हनुमान आजपासून दर शुक्रवार -शनिवार रात्री ९ वाजता, फक्त सोनी मराठीवर.
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST