Thursday, August 29, 2019

आरोह वेलणकरला मिळतोय फिनालेसाठी प्रेक्षकांचा पाठिंबा

आरोह वेलणकरला मिळतोय फिनालेसाठी प्रेक्षकांचा पाठिंबा

आरोह वेलणकरला मिळतोय फिनालेसाठी प्रेक्षकांचा पाठिंबा

अभिनेता आरोह वेलणकरने वाईल्ड कार्ड म्हणून बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात २० जुलैला दणक्यात प्रवेश केला. कमी वेळातच आरोहने सगळ्यांची मने जिंकत टॉप ६ मध्ये बाजी मारली. आरोह वेलणकरचा स्पष्टवक्ता स्वभाव आणि बुद्धीचातुर्य वापरून खेळायची वृत्ती यामुळे अल्पावधीतच त्याने प्रेक्षकांची वाहवाही मिळवली. आरोहने टॉप ६ मध्ये एन्ट्री केल्यापासून सध्या सोशल मिडीयावरून त्याचे चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करतआहेत.

आरोह वेलणकरच्या सोशल मिडीयावर चाहत्यांनी अगदी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.  त्या काही प्रातिनिधीक प्रतिक्रिया :

“आरोह तू माझा सर्वात आवडता स्पर्धक आहेस. मी तुझा खूप मोठा चाहता आहेस. मला तुझ्या हातात बिग बॉसची ट्रॉफी पाहायची आहे. तू एक स्ट्राँग कंटेस्टंट आहेस. तू बिग बॉसच्या घरातला सर्वाधिक समजूतदार आणि सरळमार्गी कंटेस्टंट आहेस”



“आरोह तू बिग बॉसच्या घरात सर्वात चांगला खेळाडू आहेस. शिस्तबध्द खेळाडू आहेस. तू सुरूवातीपासून असतास तर तूच विनर झाला असतास. तू खूप हुशार आहेस. तू जसा खेळतो आहेस. त्यामूळे मला तूझा बिग ब़ॉसमधला परफॉर्मन्स खूप आवडतो आहे. “

“आरोह तू स्पर्धक म्हणून माझा फेवरेट आहेस. तुझा स्पष्टवक्तेपणा मला आवडतो. टास्कमध्ये सुध्दा तू खूप छान खेळतोस. माझ्यासाठी तूच बिग बॉसचा विनर आहेस.”

“कुणाशी भांडण नाही ना तंट नाही. जिथे कुठे चुकलास, तिथे एकदम चांगल्या प्रकारे माफी मागितलीस. टास्कसगळेच एकदम मन लावून खेळलास. जरी बिग बॉस जिंकला नाही तरी काही हरकत नाही. कारण तू जनतेचं मन जिंकलंस.”

“तुझं घरातल्या प्रत्येक स्पर्धकाविषयीचं विश्लेषण अगदी योग्य असतं.  आपलं म्हणणं सर्वांसमोर ठामपणे मांडण्याची तुझ्यात हिम्मत आहे, ह्याचे मला कौतुक वाटते. “

“तु वाइल्ड कार्ड असूनही सर्वांना मागे टाकलं दादा. वाइल्ड कार्ड कंटेस्टंटने कसं खेळावं हे तू दाखवून दिलंस . तू खूप मॉच्युअर्डली बोलतोस.  आणि बरोबर बोलतोस ते आम्हांला आवडतं.”

जसे चाहते आरोहचे कौतुक करत आहेत. तसेच आरोहचे कौतुक बिग बॉसच्या घरातल्या स्पर्धकांनीही वेळोवेळी केले आहे. आरोहने एन्ट्री घेताक्षणी बिगबॉसच्या घरात एक सकारात्मकता आणली होती. त्याला पहिल्यांदाच भेटणारे अभिजित केळकर आणि वैशाली म्हाडे आरोहविषयी बोलताना, “तो चांगला आहे. पॉझीटीव्ह, स्पष्ट आणि क्लीअर वाटतो. चांगलं जमेल त्याच्याशी. स्वभाव छान आहे.”

 सुपरस्टार सलमान खान आलेला असताना महेश मांजरेकरांनी त्याची स्तुती केली होती कि, “आरोह नेहमी सत्याच्या बाजूने असतो. तो नियमांना धरून खेळणारा स्पर्धक आहे .” असं म्हटलं होतं.

नुकत्याच झालेल्या वीकेंडच्या डावमध्ये आरोहला बेस्ट परफॉर्मरचा किताब मिळाला होता. महेश मांजरेकर म्हणाले होते की,”या आठवड्यात आरोह सेन्सिबल खेळला. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक बोलला.”

थोडक्यात ‘हँडसम हंक’ आरोहला फिनालेसाठी प्रेक्षकांचा भरभरून पाठिंबा मिळत आहे त्यामुळे तो बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता ठरला, तर आश्चर्य वाटू नये.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026

  India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026 IIJS Bharat – Signature 2026 to expected to ge...