Friday, August 23, 2019

वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतलेला आरोह वेलणकर बनला बिग बॉसच्या घरच्यांचा लाडका

वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतलेला आरोह वेलणकर बनला बिग बॉसच्या घरच्यांचा लाडका

वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतलेला आरोह वेलणकर बनला बिग बॉसच्या घरच्यांचा लाडका

बिग बॉस मराठीच्या दुस-या पर्वातल्या टॉप-6 स्पर्धकांमध्ये हँडसम हंक अभिनेता आरोह वेलणकरची वर्णी लागली आहे. या टॉप 6 सदस्यांना भेटायला नुकतेच यंदाच्या पर्वातले जुने सदस्य घरात आले होते. टिकिट टू फिनाले या टास्क दरम्यान दिगंबर नाईक,  बाप्पा जोशी, अभिजित केळकर, रुपाली भोसले,सुरेखा पुणेकर, मैथिली जावकर आणि माधव देवचके पुन्हा बिग बॉसच्या घरात आले असताना त्यांनी आरोहची विशेष प्रशंसा केली.

टिकिट टू फिनाले ह्या टास्क दरम्यान आरोहला फ्रिझ केले असल्याने आरोह घरात आलेल्या सदस्यांशी बोलू शकत नव्हता. पण ह्या सदस्यांनी आरोहशी संवाद साधला.  बाप्पा जोशीने घरात आल्यावर आरोहकडे जाऊन 'आरोह कसा आहेस मजा करतोयस ना ? आता दोनच आठवडे राहिलेत एन्जॉय कर’ अशी अगत्याने विचारपूस केली.

दिगंबर नाईक आरोहला पहिल्यांदाच भेटत होता. त्याने आरोहला मिठी मारली आणि म्हणाला, “तू मस्त खेळत आहेस. तू चांगले स्टँड घेतोस. तुझे बोलणे खूप आवडते. तू लोकांनाही खूप आवडत आहेस. तू  वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून आला आहेस असं वाटत नाही. तू खूप आधीपासून या खेळात असल्यासारखा वाटतोस. तू जर आधीपासून आला असतास तर आपली चांगली दोस्ती झाली असती. “

मैथिली जावकर म्हणाली, “तुझी फिल्म मी पाहिली . मला खूप आवडली. तू बाहेर आल्यावर आपण नक्की काम करू.”



सुरेखा पुणेकर म्हणाल्या, “आरोह तू छान खेळतो बाळा. तू पुणेकर आहेस. मला माहित आहे.  मी बघते रोज, तु चांगला खेळत आहेस.”

माधव देवचकेही आरोहला सल्ला देताना म्हणाला, “आता रडायची नाही तर रडवायची वेळ आलेली आहे. ऑल दि बेस्ट.”

 रुपाली भोसले देखील टास्क दरम्यान आरोहला आनंदाने मिठी मारून म्हणाली कि, “जाम आवडतोस तू मला!” तसेच अभिजित केळकरने खास आरोहला भेटून त्यांच्यातली अढी दूर करत म्हणाला कि, “ तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस.आपण गेम खेळायला आलो आहोत. तू मला नॉमिनेट केलंस, ह्याचं वाईट वाटून घेऊ नकोस. तू तुझा गेम खेळलास मी माझा.”

बिग बॉसचा खेळ आता अंतिम टप्प्यात आला असताना आरोहने आपल्या चाहत्यांसमोर मनोगत व्यक्त केले कि, “माझा माझ्यावर विश्वास आहे. माझ्या खेळावर विश्वास आहे. मी जे करतोय प्रामाणिकपणे त्याच्यावर माझा विश्वास आहे. मी पुढील येणाऱ्या दिवसांना नव्या जोमाने सामोरे जाणार आहे. अजून मेहनतीने छान खेळ खेळण्याचा प्रयत्न मी करणार आहे. हि संधी माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. मला पुन्हा स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळत आहे. त्या संधीचे मी सोने करेन. मला सिद्ध करायला आवडेल कि मी बिग बॉसचा विजेता होणारच! मी त्यासाठी खूप छान खेळ खेळीन. मी खूप मेहनत करीन.”

आपल्या दमदार खेळीमूळे आरोह प्रेक्षकांचा आवडता स्पर्धक आहे. आरोह वेलणकरने कमीत कमी वेळात बिग बॉसच्या घरातल्या सगळ्या स्पर्धकांची मनं जिंकून घेतली. बिग बॉसमधल्या जुन्या सदस्यांनी त्याची आवर्जून प्रशंसा केली आहे. त्याशिवाय घरात राहणारे सदस्यही त्याच्याविषयी चांगली मतं व्यक्त करत असतात. नुकत्याच पार पडलेल्या बिचुकलेंच्या कोर्टात आरोह विरोधात एकही ठोस आरोप नव्हता. कामातली तत्परता आणि समंजस स्वभाव यामुळे तो सगळ्यांचा आवडता स्पर्धक आहे. सगळ्यांचा आवडता आरोह आपल्या बुद्धी चातुर्याने आणि दमदार खेळाने बिग बॉसचा विजेता ठरू शकतो. मायबाप प्रेक्षक त्याला अंतिम फेरीत पाठवतील का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...