Wednesday, August 28, 2019

क्रांती रेडकरने लाँच केला तिचा स्वत:चा क्लोथिंग ब्रँड ‘ZZ

क्रांती रेडकरने लाँच केला तिचा स्वत:चा क्लोथिंग ब्रँड ‘ZZ

क्रांती रेडकरने लाँच केला तिचा स्वत:चा क्लोथिंग ब्रँड ‘ZZ’
अभिनय आणि दिग्दर्शन या दोन्ही जबाबदा-या उत्तमरित्या साकारणारी अभिनेत्री क्रांती रेडकर वानखेडेमधील आणखी एक टॅलेंट लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेअसे काही दिवसांपूर्वी सांगण्यात आले होते. आणि ते नेमके टॅलेंट कोणते याविषयी जाणून घ्यायची उत्सुकता अनेकांमध्ये असणार यात शंका नाही.

उत्तम अभिनय आणि दिग्दर्शन करुन प्रेक्षकांचे लक्ष पडद्यावर खिळवून ठेवणा-या क्रांतीने तिचा स्वत:चा क्लोथिंग ब्रँड लाँच करुन तिची आणखी एक नवी बाजू सर्वांना दाखवून दिली. नुकतेचमुंबईमध्ये क्रांती रेडकरचा क्लोथिंग ब्रँड ‘ZZ ZIYA ZYDA’ लाँच करण्यात आला. आपण जेव्हा एखादी नवीन गोष्ट करतो तेव्हा आपल्याला चिअर अप करण्यासाठी आपल्या खास मित्र-मैत्रिणींच्या शुभेच्छा आपल्यासोबत असतातच आणि त्याचप्रमाणे क्रांतीच्या खास जवळ असणा-या व्यक्ती आणि आपल्या सिनेसृष्टीतील कलाकारांच्या विशेष उपस्थितीत क्रांतीचा क्लोथिंग ब्रँड लाँच करण्यात आला आणि त्यांनी क्रांतीला शुभेच्छा देऊन तिच्या नवीन उपक्रमाला प्रोत्साहन दिले.

नवीन भरारी घेण्यासाठी सज्ज झालेली क्रांती अशा एका प्लॅटफॉर्मच्या शोधात होती जिथे तिच्या नवीन कल्पनायोजना समजून घेतल्या जातील आणि त्याच दरम्यान तिची भेट अक्षय बर्दापूरकर आणि प्लॅनेट टॅलेंटशी झाली. आणि जसा प्लॅटफॉर्म हवा होता तसाच प्लॅटफॉर्म क्रांतीला प्लॅनेट टीच्या माध्यमातून मिळाला आणि या माध्यमाच्या मदतीने तिने तिच्यातील टॅलेंट म्हणजेच ‘ZZ ZIYA ZYDA’ प्रेक्षकांसमोर आणले.
‘ZZ झिया झायदा’ या नवीन क्लोथिंग ब्रँडच्या नावातच आकर्षण तर आहेच आणि या माध्यमातून क्रांतीची फॅशन स्टाईल आणि युनिक कलेक्शन पाहायला मिळणार याची उत्सुकता देखील आहे.



No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

चाळीस वर्षांनी 'पुरुष' पुन्हा एकदा गाजवणार मराठी रंगभूमी

  चाळीस वर्षांनी 'पुरुष' पुन्हा एकदा गाजवणार मराठी रंगभूमी  १४ डिसेंबरला सादर होणार पहिला प्रयोग  जयवंत दळवी यांच्या लेखणीतून साकारल...