Thursday, August 22, 2019

अक्षय बर्दापूरकर यांच्या ‘प्लॅनेट टी’मध्ये क्रांती रेडकरची एण्ट्री! OR अक्षय बर्दापूरकर यांच्या ‘प्लॅनेट टी’मधून दिसणार क्रांती रेडकरचे नवे टॅलेंट!

अक्षय बर्दापूरकर यांच्या ‘प्लॅनेट टी’मध्ये क्रांती रेडकरची एण्ट्री! OR अक्षय बर्दापूरकर यांच्या ‘प्लॅनेट टी’मधून दिसणार क्रांती रेडकरचे नवे टॅलेंट!

अक्षय बर्दापूरकर यांच्या ‘प्लॅनेट टीमध्ये क्रांती रेडकरची एण्ट्री!
OR
अक्षय बर्दापूरकर यांच्या ‘प्लॅनेट टीमधून दिसणार क्रांती रेडकरचे नवे टॅलेंट!



जत्रा या मराठी सिनेमातील कोंबडी पळाली या गाण्यावर सर्वांना ठेका धरायला भाग पाडणारी आणि दिग्दर्शिका म्हणून नवीन ओळख तयार करुन काकण सिनेमातून प्रत्येकाला भावूक करणारी अभिनेत्रीक्रांती रेडकरने आता अक्षय बर्दापूरकर यांच्या प्लॅनेट टीमध्ये एण्ट्री घेतली आहेअभिनेत्री अमृता खानविलकर नंतर अक्षय बर्दापूरकर यांच्या प्लॅनेट टी मध्ये सहभागी होणारी क्रांती रेडकर ही दुसरीअभिनेत्री आहे.  

क्रांतीचे अनेक चाहते आहेत जे तिच्या अभिनयावर फिदा आहेत आणि वेळोवेळी तिला मनापासून दाद देखील देतातक्रांती अभिनय तर उत्तम करतेचतसेच तिच्यामध्ये असलेले दिग्दर्शन कौशल्य देखीलअप्रतिम आहेदोन गोंडस जुळ्या बाळांची आई आणि IRS ऑफिसरची पत्नी असलेल्या क्रांती रेडकरने ‘अभिनेत्री’ आणि ‘दिग्दर्शिका’ अशी ओळख बनवल्यानंतर पुढे भविष्यात तिला आणखी काही तरी नवीकरु पाहायचं आहे.

ज्या व्यक्तींमध्ये टॅलेंट आहे आणि त्यांच्यातील टॅलेंट मराठी-हिंदी सिनेसृष्टीत पोहचवण्यासाठी ज्या माध्यमाची मदत किंवा मंच याची आवश्यकता असते तो मंच म्हणजे ‘प्लॅनेट टी’ ही एंजन्सी



क्रांती रेडकर ‘प्लॅनेट टीचा एक भाग बनली या विषयी आपल्या भावना व्यक्त करताना अक्षय बर्दापूरकर यांनी म्हटले की, “क्रांती ही मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे आणि ती माझ्याएजन्सीचा भाग बनणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि याचा मला आनंद आहेआम्हांला खात्री आहे कीआम्ही एकत्र येऊन नक्कीच ‘क्रांती’ करु”.

नवीन काही तरी करु पाहणारी क्रांती अशाच एका प्लॅटफॉर्मच्या शोधात असताना तिची भेट अक्षय यांच्याशी झाली आणि ‘प्लॅनेट टीच्या माध्यमातून क्रांतीला एक परफेक्ट प्लॅटफॉर्म मिळालाआणि याविषयीव्यक्त होताना तिने म्हटले की, “मी अशा व्यक्तीच्या शोधात होते जो मला आणि माझ्या ध्येयांना आणि करिअरशी निगडीत असलेल्या माझ्या प्लॅन्सला समजून घेऊ शकेलमाझी भेट अक्षयशी झाली आणिमाझे काम आणि नवीन उपक्रम पुढे नेण्यासाठी अक्षयची मदत होऊ शकते कारण त्याच्याकडे व्हिजनकॉन्टॅक्ट्स आणि व्यवसायाशी निगडीत लागणारे उत्तम कौशल्य आहे.”

अक्षय बर्दापूरकर आणि क्रांती रेडकर एकत्र येऊन प्लॅनेट टीच्या मंचावर नक्कीच क्रांती करतील यात शंका नाही.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

चाळीस वर्षांनी 'पुरुष' पुन्हा एकदा गाजवणार मराठी रंगभूमी

  चाळीस वर्षांनी 'पुरुष' पुन्हा एकदा गाजवणार मराठी रंगभूमी  १४ डिसेंबरला सादर होणार पहिला प्रयोग  जयवंत दळवी यांच्या लेखणीतून साकारल...