'मिलीनीयर' 'प्रशांत नाकती' नवनवीन मराठी अल्बम गाणी प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतो. यावेळेस 'नादखुळा म्युझिक' रेकॉर्ड लेबल प्रस्तुत, निखिल नमित आणि प्रशांत नाकती निर्मित एक शिवकालीन ऐतिहासिक असं 'पिरतीचं याड' गाणं प्रदर्शित झालं आहे. मराठी अल्बम गाण्यांमधील हे पहिलचं गाणं आहे जे ऐतिहासिक काळावर भाष्य करणारं आहे.
शिवकालीन काळात प्रत्येक मावळ्याची जन्माची गाठ, आपल्या पत्नीशी परंतु नाळ मात्र आपल्या मायभूमीशी जोडलेली होती. असं हे सुवर्णकाळातलं सुंदर गाणं प्रदर्शित झालं आहे. शिवाय अवघ्या काही सेकंदातच सोशल मीडियावर गाणं तुफान व्हायरल होत आहे.
या गाण्यात प्रशांतने ऐतिहासिक काळातील पती पत्नीच्या नात्यावर भाष्य करणारी कलाकृती रेखाटली आहे. त्यामुळे ही आगळीवेगळी प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 'पिरतीचं याड' या गाण्याचं संगीत प्रशांत नाकती आणि संकेत गुरव यांनी केलं आहे. या गाण्याचे गीतकार प्रशांत नाकती आणि गणेश व्हटकर आहेत. तर गायक 'रविंद्र खोमणे' आणि गायिका 'सोनाली सोनावणे' हीने हे गाणं गाऊन या गाण्याला चार चांद लावले आहेत. या गाण्याचे दिग्दर्शन अभिजीत दाणी यांनी केले आहे. या गाण्यात अभिनेता विशाल फाले आणि अभिनेत्री तृप्ती राणे हे प्रमुख भूमिकेत आहेत. सध्या सोशल मिडीयावर सर्वत्र 'पिरतीचं याड' गाण्याच्या रील्स व्हिडिओची चर्चा आहे.
'पिरतीचं याड' या गाण्याविषयी प्रशांत नाकती सांगतो, "आपलीच हवा, मी सिंगल, आपली यारी या गाण्यांच्या घवघवीत यशानंतर आम्ही एक ऐतिहासिक प्रेमकहाणी तुमच्यासाठी घेऊन यायची आमची इच्छा या गाण्याच्या स्वरूपात पूर्ण झाली. इतिहासातील एका मावळ्याचं जोडपं आहे. जे आपल्या मायभूमीसाठी लढले आहेत. त्यांचं आयुष्य खडतर होतं तसचं त्यांच्या कुटुंबाशी असलेलं नातं यात मांडलं आहे. पती पत्नीच्या नात्यातील गोडवा या गाण्यात दिसून येतो. आपल्या मायभूमीसाठी केलेला लढा, त्याग, समर्पण आणि प्रेम याचं संदेश देणारं हे गाणं आहे."
पुढे तो सांगतो, "आम्ही मुबलकश्या पैशात आणि खूप कमी वेळेत फक्त मेहनतीच्या जोरावर या गाण्याची निर्मिती केली आहे. या गाण्यात VFX चा वापर केला आहे. आम्हाला शिवकालीन वाडा तयार करायला तीन दिवस लागले. २०२३ या नववर्षाची सुरुवात आम्ही 'पिरतीचं याड' या गाण्याने करत आहोत. माझ्या सर्व प्रेक्षकांचे मी आभार मानतो की त्यांनी नादखुळा म्युझिक आणि 'पिरतीचं याड' या गाण्यावर भरभरून प्रेम केलं. तुमचं असचं प्रेम कायम राहू देत."
Link -
https://youtu.be/SLSPwKuA4lQ
We are here to bring Entertainment Update to you earlier so be updated by us... Glad to serve you all
Thursday, January 12, 2023
'पिरतीचं याड'
नवी मुंबईत ‘अपोलो जेनोमिक्स इंस्टिट्यूट’ ची स्थापना
अनुवांशिक विकारांवर योग्य उपचार करण्याचे अभिनेत्री शर्मिला टागोर यांचे आवाहन !
नवी मुंबईत ‘अपोलो जेनोमिक्स इंस्टिट्यूट’ ची स्थापना
नवी मुंबई, ११ जानेवारी २०२३: नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने आज अनुवांशिक विकार असलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सर्वसमावेशक वैद्यकीय सेवा प्रदान करण्यासाठी अपोलो जेनोमिक्स इंस्टीट्यूट्सची स्थापना केली आहे. जेनोमिक अनुवांशिक विकारांशी संबंधित आहे तसेच यामुळे दुर्मिळ आणि अनुवांशिक रोगांचे निदान आणि उपचार करण्यात मदत होते. यामुळे एखाद्या व्यक्तीला रोग होण्याच्या जोखमीबद्दल आणि विशिष्ट उपचारांना त्यांच्या प्रतिसादाबद्दल माहिती देखील प्रदान केली जाऊ शकते आणि म्हणून अचूक व वैयक्तिकृत औषधोपचार करता येतात. दुर्मिळ विकारांचे निदान करण्याव्यतिरिक्त, जेनोमिक औषधाचा उपयोग कर्करोगाच्या फार्माकोजेनॉमिक्समध्ये आणि संसर्गजन्य रोगांच्या प्रादुर्भावाचा मागोवा घेण्यासाठी देखील केला जात आहे. अपोलो जेनोमिक्स इंस्टिट्यूटमुळे व्यक्तीला, जोडप्यांना आणि कुटुंबीयांना जनुकीय विकारांचे वैद्यकीय, मानसिक, कौटुंबिक आणि पुनरुत्पादक परिणाम समजून घेण्यास मदत होईल. अपोलो जेनोमिक्स इन्स्टिट्यूटमधून मोठ्या लोकसंख्येला अनुवांशिक विकार, असामान्य अनुवांशिक चाचण्या, उशीरा वाढणारी मुले, जन्मजात विसंगती याबाबत आणि अनुवांशिक अस्वस्थता असलेल्या कुटुंबातील सदस्यांना देखील लक्षणीयरित्या फायदा होईल. जेनोमिक केंद्रामुळे संबंधित मध्यस्थी, दीर्घकालीन उपचार आणि सेवा घेऊन जनुकीय परिस्थितीचे त्वरित मूल्यांकन करण्यात आणि ओळख पटण्यास देखील मदत होईल.
अपोलो हॉस्पिटल्सचे ग्रूप वैद्यकीय संचालक प्रा. (डॉ.) अनुपम सिबल म्हणाले, “जेनोमिक औषधांमुळे एखाद्या व्यक्तीच्या अनुवांशिक संरचनेचे मूल्यांकन करून रोगावरील उपचार आणि त्यावरील प्रतिबंध यावर लक्ष केंद्रित करता येते. अपोलो जेनोमिक्स इंस्टिट्यूट समर्पित आणि अनुभवी सल्लागार तसेच प्रमाणित अनुवांशिक समुपदेशक यांच्या सहाय्याने रुग्णांसाठी अनुवांशिक औषधातील प्रगतीचे रुपांतर वास्तविक लाभांमध्ये करेल. जेनोमिक औषधे परिवर्तनाची भूमिका निभावू शकतात अशा वैद्यकीय परिस्थितींमध्ये पुढील बाबींचा समावेश आहे - मुलांमध्ये वाढ होण्यास विलंब, एकापेक्षा जास्त गर्भपात, प्रगत मातृत्व वय (आईचे वाढलेले वय/ऍडव्हान्स मॅटर्नल एज), वंध्यत्व, कुटुंबातील अनुवांशिक रोगाचा इतिहास. अपोलो हॉस्पिटल्समधील जेनोमिक औषधोपचारात तज्ज्ञ असलेली टीम हे सुनिश्चित करेल की या आजारांचे निदान लवकरात लवकर होईल तसेच इतर जोखीम असलेल्या कुटुंबातील सदस्यांची तपासणी केली जाईल.”
Meri Aashiqui Romatic Love Song
Song Link- https://youtu.be/Z37JhRW7TTM
United White Flag, released a lovely romantic number "Meri Aashiqui ", a song about romantic love, falling in love and the feelings that these experiences bring. Saaj Bhatt's beautiful vocals breathe life into Sanjeev Chaturvedi's lyrics & composition. Featuring Abhishek Nigam And Yesha Rughani , this soothing, peaceful & calming track has music by Sanjeev - Ajay & produced by - Jitin Agrawal & Rajesh Talesara.
Ramji Gulati says "Meri Aashiqui narrates love, romance & passion. It does not give momentary pleasure, it makes your soul happy"
Abhishek Nigam says "It is an addictive, smooth and orchestral soundtrack. When I was first approached for the song, I was mesmerized by the audio itself. The recital is very sweet, soothing and catchy. It is happening due to the love of our fans. Now they have to shower there love and make it bigger for us"
Yesha Rughani says "Love is the most universal emotion which anyone and everyone can relate to. Meri Aashiqui speaks the language of love with utmost simplicity, which is very attractive"
Saaj Bhatt says "The music is something that attracted me the most. Once I heard it, I was hooked and addicted to it. Everyone has done a beautiful job in the song"
Sanjeev Chaturvedi says "A beautiful timeless melody with a new sound & approach, it is surely more welcoming to today’s audience"
Sanjeev - Ajay says "The music of Meri Aashiqui is everything that a romantic song should have and yet it is different from other songs"
Jitin Agrawal & Rajesh Talesara says "I would like to congratulate the entire team. We are excited & looking forward to the response from the audience”
"Har Ek Saans" depicts the depth of love
"Har Ek Saans" depicts the depth of love
Launch saw the presence of Kailash Kher, Arindam Biswas, Maithili Shome, Debu Chakraborty, Priya Tipale, Abhinay Soni
Kailasa Records, a record label featuring mellifluous melodies released a rhythmic romantic number "Har Ek Saans", a song about romantic love, falling in love and the feelings that these experiences bring. Maithili Shome's beautiful vocals breathe life into Israr Ansari's lyrics & composition. Featuring Priya Tipale, Maithili Shome & Abhinay Soni, this soothing, peaceful & calming track is directed by the visionary Arindam Biswas & project by : Abhinay Soni.
Har Ek Saans carries a sense of timeless eternal appeal. While it has a strong nostalgia attached to it, it is feels like a warm blanket on a cold winter day, you know the minute you drape it on, the feeling of warmth and familiarity starts to creep in slowly, it's a touching, romantic & soulful, the kind of song that will remain in your playlist for long.
"Kailasa Records is a label that creates original music in different genres and showcases them with a complete visual treat. The song narrates love, romance & passion. It does not give momentary pleasure, it makes your soul happy. Simple words, but very layered melodies, and that's the best combination which describes Har Ek Saans" says Kailash Kher
Singer Maithili Shome says "In my life, all my music has been destiny-driven and this song came about when I met my diction mentor, Israr Ansari Ji. He was quite impressed with my voice, and I was honoured that he wrote this beautiful song for me – both the lyrics and the melody. The rest is history. This single is the first of many originals yet to come. I am busy with 2 more playback songs in upcoming films and am also working as an assistant music composer for upcoming OTT web series"
Actor Abhinay Soni says "Har Ek Saans is extremely close to my heart as our team worked dedicatedly from the scratch to final video, Beautifully sung by Maithili, and creatively done by our director Arindam. The video is engaging and shot perfectly. The heartly Thanks to Padmashri Kailash Kher ji for encouragement and making it even bigger with Kailasa Records"
Lyricist & Composer Israr Ansari says "Mere liye fakr aur behad khushi ki baat hai ki meri ghazal Har EK Saans jise maine likha aur compose kiya hai, Padmashri Kailash kher ji ke record label se release hua hai, is Ghazal ko Maithili Shome ne bakhubi anjaam diya hai, Maithili boht honhaar singer hai, Ummed karta hu ye song sabhi ko boht pasand aayega"
Priya Tipale says "Har ek Saans" directly connects with your heart. Kailash sir is a real magician.. Because of him the world is going to witness this magical art piece. The song is a perfect package of story, emotions, lyrics, music, dance and what not.. Blessed to be part of it."
"मी वसंतराव" ह्या चित्रपटाचा ९५व्या ऑस्कर पुरस्कार नामांकनासाठी जाहिर करण्यात आले.
"मी वसंतराव" ह्या चित्रपटाचा ९५व्या ऑस्कर पुरस्कार
नामांकनासाठी जाहिर करण्यात आले
द अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’ कडून ९५व्या ऑस्कर पुरस्कार नामांकनासाठी जाहिर करण्यात आलेल्या जगभरातील ३०० हून अधिक चित्रपटांच्या यादीत जीओ स्टुडिओजच्या "मी वसंतराव" ह्या चित्रपटाचा समावेश|
संपूर्ण सिनेसृष्टीसाठी ऑस्कर हा मानाचा पुरस्कार मानला मानला जातो. जगभरातील वेगवेगळ्या भाषेमधील तब्बल ३०० हून अधिक सिनेमांमधील यादित भारतातील कांतारा , गंगूबाई काठियावाडी, द कश्मीर फाईल्स बरोबरच मी वसंतराव या मराठी चित्रपटाचा समावेश होणे खरंच खूप गौरवाची बाब आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी म्हणतात, ''मी वसंतराव' या चित्रपटावर आम्ही तब्बल ९ वर्षं काम केले आहे. एखाद्या महान व्यक्तीचा जीवनपट पडद्यावर दाखवणे हे फार आव्हानात्मक काम होते. पण यात तो काळ, व्यकितमत्वाचे पैलू, निर्मिती प्रक्रिया आणि मुख्य म्हणजे संगीत, हे सर्व निर्माण करण्यासाठी संपूर्ण टीमने अथक प्रयत्न केले आहे आणि याचीच दाद म्हणून आज ऑस्कर सारख्या प्रतिष्ठीत पुरस्काराच्या नामांकन यादीमध्ये मी वसंतरावचा विचार केला जातोय हे खूप अभिमानास्पद आहे .
गायक-अभिनेता राहुल देशपांडे म्हणाले की, “ही खूप आनंदाची गोष्ट आहे कारण, यानिमित्ताने आम्ही केलेल्या कामाची दखल जागतिक पातळीवर घेतली जात आहे, ही अभिमानाची बाब आहे. शिवाय मराठी चित्रपट व संगीत सृष्टीसाठी देखील हे महत्त्वाचे आहे असे मी मानतो. ‘मी वसंतराव’ हा चित्रपट एक वेगळाच प्रयोग होता. यामध्ये माझे आजोबा डॉ. वसंतराव देशपांडे यांचीच कथा मी त्यांचा नातू एक नट म्हणून रसिकांसमोर घेऊन आलो आहे. इतकेच नव्हे तर त्यातील गाणी आणि संगीतदिग्दर्शन हे देखील मी स्वत:च केले असल्याने हा चित्रपट अनेकार्थाने माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. आजच्या या नामांकनाने मला खूप आनंद झाला आहे.
आईच्या अस्तित्वासाठी दिशाचा भूतकाळाशी प्रतिशोध!
आईच्या अस्तित्वासाठी दिशाचा भूतकाळाशी प्रतिशोध!
नवी मालिका - 'प्रतिशोध'- झुंज अस्तित्वाची.
१६ जानेवारी पासून सोम. ते शनि. रा. १० वा. सोनी मराठी वाहिनीवर.
सोनी मराठी वाहिनी कायमच आशयघन विषय मांडत वेगवेगळ्या मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. आता 'प्रतिशोध' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याची पहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळते आहे. निरनिराळ्या चित्रपटांमधून आणि मालिकांमधून वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे अमोल बावडेकर आता एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. 'प्रतिशोध' या नव्या कोऱ्या मालिकेतून अमोल बावडेकर तृतीयपंथी आईची भूमिका साकारणार आहे. ममता असे या व्यक्तिरेखेचे नाव आहे. अमोल बावडेकरबरोबरच पायल मेमाणे ही गुणी अभिनेत्रीसुद्धा पाहायला मिळणार आहे. ती ममताच्या मुलीची म्हणजेच दिशाची व्यतिरेखा साकारताना दिसणार आहे.
प्रतिशोध ही आई आणि मुलगी यांच्या विशिष्ट नात्यावर भाष्य करणारी ही थरारक मालिका आहे. भूतकाळातील काही विशिष्ट गोष्टींमुळे ममता आणि दिशा यांना यांच्या भविष्यात कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागणार आहे, हे आपल्याला या मालिकेतून पाहायला मिळेल.
एक आगळंवेगळं कथानक असलेली ही मालिका सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी घेऊन येते आहे. येत्या १६ जानेवारीपासून रात्री १० वाजता.'प्रतिशोध' - झुंज अस्तित्वाची ही नव्या पठडीतली मालिका प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते आहे. या मालिकेत तृतीयपंथी आई आणि दिशा नावाची मुलगी यांचं नातं उलगडणारी आहे आणि त्यांच्या संघर्षाची कहाणीही या मालिकेतून दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
निरनिराळ्या धाटणीच्या मालिका आणि विषय सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळतात. त्यातच आता ही थरारक मालिका आपल्याला पाहायला मिळणार आहे. मालिकेची पहिली झलकदेखील उत्कंठावर्धक रितीने प्रेक्षकांसमोर आली आहे आणि पुढचे कथानकही रोमांचक पद्धतीने रंगेल यात काही शंका नाही. भूतकाळाची सावली बदलणार भविष्याची दिशा. पाहायला विसरू नका 'प्रतिशोध'- झुंज अस्तित्वाची.
१६ जानेवारी पासून सोम. ते शनि. रा. १० वा. सोनी मराठी वाहिनीवर.
Tuesday, January 10, 2023
'बांबू' चित्रपटातील गाणं प्रदर्शित
'बांबू' चित्रपटातील गाणं प्रदर्शित
अभिनयला प्रत्येक मुलगी म्हणतेय 'मी तुला त्या नजरेनं कधी पाहिलं नाही’
'बांबू' चित्रपटातील गाणं प्रदर्शित
जर तुम्ही खऱ्या प्रेमाच्या शोधात असाल आणि प्रेमाच्या सायन्सचे नियम पाळले नाहीत तर कधी ना कधी प्रेमात तुमचे बांबू लागणार. काही दिवसांपूर्वी 'बांबू' या चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. तेव्हापासूनच प्रेमात बांबू लागलेला प्रत्येक जण हा चित्रपट पाहण्यासाठी आतुर झाला आहे. या चित्रपटातील 'मी तुला त्या नजरेने' हे धमाल गाणे प्रदर्शित झाले असून हे गाणे रोहित राऊत आणि ज्ञानदा पवारने गायले आहे. तर सचिन पाठक यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला समीर सप्तीसकर यांनी संगीत दिले आहे.
या गाण्यात अभिनय बेर्डेच्या आयुष्यात अनेक मुली येताना दिसत असल्या तरी त्याचे खरं प्रेम त्याला मिळत नाहीये. प्रत्येक मुलगी त्याच्याकडे केवळ एका चांगल्या मित्राच्या भावनेने पाहात असल्याने प्रत्येकवेळी अभिनयच्या प्रेमाचं पुस्तक उघडण्यापूर्वीच बंद होताना दिसतेय. प्रत्येक मुलगी त्याला एकच वाक्य बोलतेय 'मी तुला त्या नजरेने कधी पाहिलं नाही'. आता त्याची ही शोधमोहीम पूर्ण होऊन त्याला खरं प्रेम मिळणार का, हे आपल्याला २६ जानेवारीला चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजेल.
गाण्याबद्दल दिग्दर्शक विशाल देवरूखकर म्हणतात, "हे एक जबरदस्त गाणे असून तरूणाईला आवडेल, असे आहे. या गाण्याचे बोल, संगीत अतिशय भन्नाट आहे आणि यात रोहित राऊत आणि ज्ञानदाच्या आवाजाने अधिकच रंगत आणली आहे.’’
क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन निर्मित या चित्रपटाचे निर्माते तेजस्विनी पंडित, संतोष खेर आहेत. तर या चित्रपटाचे लेखन अंबर हडप यांनी केले आहे. अभिनय बेर्डे, शिवाजी साटम, अतुल काळे, वैष्णवी कल्याणकर, पार्थ भालेराव, स्नेहल शिदम, समीर चौघुले यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
Tata Mumbai Marathon 2025 Race Route
Tata Mumbai Marathon 2025 Race Route Tata Mumbai Marathon 2025 Race Route unveiled at the technical press conference (L to R), Mandar Pandy...
-
Connect to Future of Cooling with Whirlpool Voice and Wi-fi enabled 3D Cool Inverter AC in India Mumbai 7 th June 2019: Whirlpoo...
-
DESIGNER, STYLIST SAAZISH SIDHU’S “STYLE IN THE CITY” Leading light of Indian fashion landscape, Designer, Stylist & Managing Di...
-
अश्विन बागल व अक्षय सेठी यांचे व्हॅलेंटाईन डे स्पेशल 'तुमसे मिलु अपनी कहूं' गाणं प्रदर्शित 'रावरंभा' या ऐतिहासिक चित्रपटा...