Thursday, January 12, 2023

आईच्या अस्तित्वासाठी दिशाचा भूतकाळाशी प्रतिशोध!

 आईच्या अस्तित्वासाठी दिशाचा भूतकाळाशी प्रतिशोध!

नवी मालिका - 'प्रतिशोध'- झुंज अस्तित्वाची.

१६ जानेवारी पासून सोमते शनिरा१० वासोनी मराठी वाहिनीवर.

 

               सोनी मराठी वाहिनी कायमच आशयघन विषय मांडत वेगवेगळ्या मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत असतेआता 'प्रतिशोधही मालिका  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत्याची पहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळते आहेनिरनिराळ्या चित्रपटांमधून आणि मालिकांमधून वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे अमोल बावडेकर आता एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. 'प्रतिशोधया नव्या कोऱ्या मालिकेतून अमोल   बावडेकर तृतीयपंथी आईची भूमिका साकारणार आहेममता असे या व्यक्तिरेखेचे नाव आहेअमोल  बावडेकरबरोबरच पायल मेमाणे ही गुणी अभिनेत्रीसुद्धा पाहायला मिळणार आहेती ममताच्या मुलीची म्हणजेच दिशाची व्यतिरेखा साकारताना दिसणार आहे.


               प्रतिशोध ही आई आणि मुलगी यांच्या विशिष्ट नात्यावर भाष्य करणारी ही थरारक मालिका आहेभूतकाळातील काही विशिष्ट गोष्टींमुळे ममता आणि दिशा यांना यांच्या भविष्यात कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागणार आहेहे आपल्याला या मालिकेतून पाहायला मिळेल.

 एक आगळंवेगळं कथानक असलेली ही मालिका सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी घेऊन येते आहेयेत्या १६ जानेवारीपासून रात्री १० वाजता.'प्रतिशोध' - झुंज अस्तित्वाची ही नव्या पठडीतली मालिका प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते आहेया मालिकेत तृतीयपंथी आई आणि दिशा नावाची मुलगी यांचं नातं उलगडणारी आहे आणि त्यांच्या  संघर्षाची कहाणीही या मालिकेतून दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे.




 
नव्या मालिकेतील अमोलची तृतीयपंथीची भूमिका त्याच्यासाठी आव्हानात्मक ठरलेली आहेअशा धाटणीची भूमिका प्रथमच साकारण्याची संधी मिळाल्याने तो या भूमिका साकारण्यासाठी उत्सुक आहेमालिकेचा पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेहे आगळंवेगळं कथानक पाहून प्रेक्षकांनी या मालिकेचं स्वागत केलं आणि अमोलच्या भूमिकेला पसंतीही दर्शवलीअरुण नलावडे आणि अक्षय वाघमारे हे कलाकारही  या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत.

           निरनिराळ्या धाटणीच्या मालिका आणि विषय सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळतातत्यातच आता ही थरारक मालिका आपल्याला पाहायला मिळणार आहेमालिकेची पहिली झलकदेखील उत्कंठावर्धक रितीने प्रेक्षकांसमोर आली आहे आणि पुढचे कथानकही रोमांचक पद्धतीने  रंगेल यात काही शंका नाही.  भूतकाळाची सावली बदलणार भविष्याची दिशापाहायला विसरू नका 'प्रतिशोध'- झुंज अस्तित्वाची.

१६ जानेवारी पासून सोमते शनिरा१० वासोनी मराठी वाहिनीवर.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...