Tuesday, January 17, 2023

'पोस्ट ऑफीस उघडं आहे' मालिकेत गुरुशिष्याची जोडी मकरंद अनासपुरे आणि दिलीप घारे!

                                                              'पोस्ट ऑफीस उघडं आहे

                                             

 'पोस्ट ऑफीस उघडं आहेमालिकेत गुरुशिष्याची जोडी मकरंद अनासपुरे आणि दिलीप घारे!

नवी मालिका - 'पोस्ट ऑफीस उघडं आहे...',  जानेवारीपासून गुरुवार ते शनिवार रात्री 9 वासोनी मराठी वाहिनीवर.

 

                      सोनी मराठी वाहिनी वैविध्यपूर्ण कार्यक्रमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेआता अजून एक वेगळी मालिका आपल्याला पाहायला मिळणार आहे.  'पोस्ट ऑफीस उघडं आहे...', असं या मालिकेचं नाव आहे आणि ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी दाखल झाली आहेवेगळ्या विषयांच्या आणि धाटणीच्या मालिका आपल्याला सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळतात. 'पोस्ट ऑफीस उघडं आहे...' या मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्राया कार्यक्रमातले विनोदी अभिनेते या मालिकेत पाहायला मिळणार आहेतसर्वांचे आवडते आणि लाडके मकरंद अनासपुरेही या मालिकेतून आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

                     मालिकेत एक विशिष्ट जोडी पाहायला मिळणार आहेमकरंद अनासपुरे आणि दिलीप घारे ही गुरुशिष्यांची जोडी ह्या मालिकेत पाहायला मिळणार आहेहे दोघेही दिग्गज अभिनेते आहेत. 'पोस्ट ऑफिस उघडं आहे...' या मालिकेत दिलीप घारे हे मकरंद अनासपुरे यांच्या वडिलांचा भूमिकेत आपल्याला दिसणार आहेतदिलीप घारे हे माझे अभिनयातले गुरू आहेतअसं मकरंद अनासपुरे यांनी सांगितलं.  अभिनय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात दिलीप घरे यांनी मकरंद अनासपुरे यांना अभिनय शिकवला आणि आता हे दोघे दिग्गज आपल्याला एकाच मालिकेत दिसणार आहेतत्यांची जुगलबंदी पाहण्यासारखी आहेवडील आणि मुलगा यांची ही मराठवाड्यातली सुंदर जोडी आपल्याला पाहता येणार आहेयाबद्दल मकरंद अनासपुरेही  उत्सुक आहे


.

                    पाहायला विसरू नकानवी मालिका - 'पोस्ट ऑफीस उघडं आहे...',  गुरुवार ते शनिवार रात्री 9 वासोनी मराठी वाहिनीवर

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...