Tuesday, January 10, 2023

स्मृती मंदाना हर्बालाइफ न्युट्रिशनची स्पॉन्सर्ड स्पोर्टस क्रीडापटू

 

स्मृती मंदाना हर्बालाइफ न्युट्रिशनची स्पॉन्सर्ड स्पोर्टस क्रीडापटू

हर्बालाइफ परिवारात समाविष्ट होत असलेली दुसरी क्रिकेटर स्मृती मंदाना क्रीडा क्षेत्रासाठी आदर्शवत

 प्रीमियम ग्लोबल न्युट्रिशन कंपनी हर्बालाइफ न्युट्रिशन इंडियाने आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट क्षेत्रातील प्रसिद्ध खेळाडू स्मृती मंदाना यांच्याशी न्युट्रिशन स्पॉन्सर्स म्हणून भागिदारी केली आहे. जबरदस्त खेळाडू असलेल्या स्मृती मंदाना उदयोन्मुख क्रिकेट खेळाडूंसाठी प्रेरणादायी आणि आदर्श असून खेळाप्रती त्यांची बांधिलकी हर्बालाइफ न्युट्रिशनशी सुसंगत आहे. आपल्या फलंदाजी कौशल्याने स्मृती यांनी क्रिकेट क्षेत्र गाजवले आहे. सध्या त्या भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या उपकर्णधार असून पर्दापणापासूनच त्यांनी भारतासाठी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. जगभरातील १५० पेक्षा जास्त स्पॉन्सर्ड टीम्स आणि क्रीडापटूंसह हर्बालाइफ न्युट्रिशन क्रीडापटूंसह काम करत आहे. त्यासाठी कंपनी आपल्या उत्पादनांमध्ये विज्ञान आणि नाविन्याचा समावेश करत तज्ज्ञांचे ज्ञान व पाठिंब्यासह खेळाडूंना त्यांची कामगिरी उंचावण्यासाठी मदत करते.  

अजय खन्ना, वरिष्ठ उपाध्यक्ष - व्यवस्थापकीय संचालक, हर्बालाइफ न्युट्रिशन इंडिया म्हणाले, ‘‘स्मृती मंदाना यांच्यासह भागिदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. चांगल्या पोषणाचे महत्त्व समजणारी आमची समान विचारधारा तसेच त्यांची सक्रिय जीवनशैली लक्षात घेता त्या आमच्या ब्रँडसाठी योग्य भागीदार आहेत. इतर खेळाडूंप्रमाणे आम्ही त्यांच्यासह काम करण्यासाठी, त्यांच्या क्रीडा महत्त्वाकांक्षांना पाठिंबा देण्यासाठी आणि प्रत्येकाला सर्वोत्तम जीवन जगण्यास मदत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’’

 स्मृती मंदाना म्हणाल्या, '‘हर्बालाइफ न्युट्रिशनसह भागिदारी करताना मला आनंद आणि सन्मान वाटत आहे. ब्रँडशी संबंधित खेळाडूंच्या परिवात समाविष्ट होण्यासाठी आणि चांगल्या पोषणाच्या मदतीने खेळाडूंना त्यांची सर्वोच्च पातळी गाठण्यास मदत करणयासाठी मी उत्सुक आहे. माझ्या मते पोषण हा चांगल्या आरोग्याचा महत्त्वाचा भाग असून कोणत्याची खेळात चांगली कामगिरी करण्यासाठी ते आवश्यक असते. सर्वांना निरोगी आयुष्य जगण्यासाठी प्रोत्साहन देण्यावर माझा भर असेल.’'

 मैदानावर केलेल्या कामगिरीमुळे स्मृती मंदाना २०१८ मध्ये आयसीसी वुमन्सच्या ओडीआय क्रिकेटर ऑफ द इयर ठरल्या होत्या. त्याचवर्षी आणि २०२१ मध्ये त्यांनी रेचल हेहो फ्लिंट पुरस्कार मिळवला. क्रिकेट करियरच्या सुरुवातीला त्यांनी बेस्ट वुमन क्रिकेटर ऑफ द इयर २०१३- १४ साठी बीसीसीआयची एमए चिदंबरम ट्रॉफी मिळवली होती. २०१६ मध्ये आयसीसी वुमन्स टीममधे समावेश झालेल्या त्या एकमेव भारतीय खेळाडू होत्या. २०१९ मध्ये त्यांना प्रतिष्ठित अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 हर्बालाइफ परिवारात समाविष्ट होत असलेली पाचवी खेळाडू आणि दुसरी क्रिकेटर स्मृती मंदाना विराट कोहली, मेरी कोम, लक्ष्य सेन आणि मनिका बात्रा यांसारख्या समकालीन भारतीय क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंचा आदर्श ठेवतात.

 

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...