Monday, January 23, 2023

तरुणांना उद्योजक होण्याचं आवाहन देतायत अभिनेते प्रभाकर मोरे आणि विजय पाटकर

 तरुणांना उद्योजक होण्याचं आवाहन देतायत अभिनेते प्रभाकर मोरे आणि विजय पाटकर

मुंबईची मूळ भाषा मराठी हे जगमान्य असली तरी पण मिल ते मॉल ही मुंबईची प्रगती

होताना इकडच्या भूमीपुत्र मात्र त्या प्रगती पासून वंचितच राहिला. मराठी माणूस व्यवसायात पाठी

राहिला आणि त्यामुळे परप्रातिंयानी मुंबईत स्वतःचे व्यवसाय सुरु करत आपलं वर्चस्व स्थापन केलं.

भूमीपुत्राचे झालेले हे हाल स्वतः भूमीपुत्र थांबवू शकतात. हेच जाणून सुधीर भौड या तरुणाने पुढे

येऊन या आपण बोलूया या उपक्रमाची सुरुवात केली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ज्या मराठी

तरुणांना व्यवसाय करायची इच्छा आहे पण काही अडचणी आहेत त्या सोडवण्याचा आणि त्यांना

व्यवसाय करण्याचा आत्मविश्वास देण्याच काम करत आहे. काही तरुण उद्योजनकांना घेऊन हा

उपक्रम बहुसंख्य लोकांपर्यंत पोचावा म्हणूंन या आपण बोलूया या चर्चा सत्राच आयोजन या

उपक्रमाच्या अंतर्गत करण्यात आलं होत. चर्चेसोबत एक आर्थिक व्यासपीठ मिळवून देण्याचा मानस

या निमित्ताने सुधीर यांचा होता. या चर्चेत प्रभाकर मोरे विजय पाटकर या कलाकारांचा सुद्धा सहभाग

होताच पण त्याच बरोबर आमदार.अमित साटम याची सुद्धा उपस्थिती होती.



आज मराठी तरुण ऊद्योजकांची हवी असलेली गरज याची जाणीव या चर्चेच्या निमित्ताने

उपस्थित जनसमुदायाला करून दिली. तर या निमित्ताने आमदार अजित साटम यांनी सांगितलं मराठी

आपल्याकडे नोकरदार वर्ग म्हणून चालतो पण मालक म्हणून नाही चालत, याची खंत वाटते. आपण

इथले मालक असून सुद्धा नोकऱ्या करतो. मुंबईच्या बाहेर जाऊन आपण राहू लागलोय उद्या

महाराष्ट्र सोडावा लागेल जर हे जे चालू आहे ते चालूच राहील तर आपण कुठे तरी स्वतःला

विचारायला हवं की आपण व्यवसायात कमी पडतो आहोत ते. व्यवसायिक होणं कठीण असलं तरी

त्याच सोयीस्कर उत्तर म्हणजे या आपण बोलूया याच निमित्ताने विजय पाटकर सांगतात मराठी

व्यावसायिक नाहीत म्हणून मराठीत मुख्य निर्माते हे मोजकेच आहेत. त्याची संख्या वाढायला हवी

तरी मराठी उयोजक आणि या आपण बोलूया हे एकमेव माध्यम आहे. या आपण बोलूया या

उपक्रमाचा आयोजक सुधीर भौड सांगतो  मराठीची होणारी गळचेपी हि मला कधीच पाहवली नाही

त्यामुळे मी सर्वे केला आणि त्यानुसार या उपक्रमाची बांधणी केली तब्बल ७० टक्के मराठी माणूस हा

मुंबईच्या बाहेर जाऊन राव लागलाय आताच्या परिस्थितीत असं असताना अशुद्ध आपण शांत

आहोत तर आपल्यापेक्षा दगड बारा, म्हणून या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही तरुण उद्योजक

होण्याचं मार्गदर्शन आणि हवी असलेली मदत दोन्ही करणार आहोत. या उपक्रमाच्या या चर्चा सत्राच्या

दरम्यान तीन तरुणांना व्यावसायीकी होण्याची संधी देत त्यांना हवा असलेला व्यवसायची पूर्तता

करता, त्यांना त्याच व्यवसायाची किल्ली सुपूर्त करण्यात आली.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

‘जर्नी’तील आत्मशोधावर आधारित शीर्षक गीत प्रदर्शित..

‘जर्नी’तील आत्मशोधावर आधारित शीर्षक गीत प्रदर्शित..  सचिन दाभाडे फिल्म्स प्रस्तुत ‘जर्नी’ या आगामी चित्रपटाचे शीर्षक गीत नुकतेच प्रदर्शित झा...