Thursday, January 12, 2023

"मी वसंतराव" ह्या चित्रपटाचा ९५व्या ऑस्कर पुरस्कार नामांकनासाठी जाहिर करण्यात आले.


    "मी वसंतराव" ह्या चित्रपटाचा ९५व्या ऑस्कर पुरस्कार 

           नामांकनासाठी जाहिर करण्यात आले


द अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’ कडून ९५व्या ऑस्कर पुरस्कार नामांकनासाठी जाहिर करण्यात आलेल्या जगभरातील ३०० हून अधिक चित्रपटांच्या यादीत जीओ स्टुडिओजच्या "मी वसंतराव" ह्या चित्रपटाचा समावेश|

 संपूर्ण सिनेसृष्टीसाठी ऑस्कर हा मानाचा पुरस्कार मानला मानला जातो. जगभरातील वेगवेगळ्या भाषेमधील तब्बल ३०० हून अधिक सिनेमांमधील यादित भारतातील कांतारा गंगूबाई काठियावाडीद कश्मीर फाईल्स बरोबरच मी वसंतराव या मराठी चित्रपटाचा समावेश होणे खरंच खूप गौरवाची बाब आहे.



चित्रपटाचे दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी म्हणतात, ''मी वसंतरावया चित्रपटावर आम्ही तब्बल ९ वर्षं काम केले आहे. एखाद्या महान व्यक्तीचा जीवनपट पडद्यावर दाखवणे हे फार आव्हानात्मक काम होते. पण यात तो काळव्यकितमत्वाचे पैलूनिर्मिती प्रक्रिया आणि मुख्य म्हणजे संगीतहे सर्व निर्माण करण्यासाठी संपूर्ण टीमने अथक प्रयत्न केले आहे आणि याचीच दाद म्हणून आज ऑस्कर सारख्या प्रतिष्ठीत पुरस्काराच्या नामांकन यादीमध्ये मी वसंतरावचा विचार केला जातोय हे खूप अभिमानास्पद आहे . 

 गायक-अभिनेता राहुल देशपांडे म्हणाले की, “ही खूप आनंदाची गोष्ट आहे  कारणयानिमित्ताने आम्ही केलेल्या कामाची दखल जागतिक पातळीवर घेतली जात आहेही अभिमानाची बाब आहे. शिवाय मराठी चित्रपट व संगीत सृष्टीसाठी देखील हे महत्त्वाचे आहे असे मी मानतो. मी वसंतराव’ हा चित्रपट एक वेगळाच प्रयोग होता. यामध्ये माझे आजोबा डॉ. वसंतराव देशपांडे यांचीच कथा मी त्यांचा नातू एक नट म्हणून रसिकांसमोर घेऊन आलो आहे. इतकेच नव्हे तर त्यातील गाणी आणि संगीतदिग्दर्शन हे देखील मी स्वत:च केले असल्याने हा चित्रपट अनेकार्थाने माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. आजच्या या नामांकनाने मला खूप आनंद झाला आहे.


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable....

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable.... #Chhaava kicks off Week 3 with a bang! Rakes in 13.30 Cr on 3rd Friday, taking its ...