Wednesday, May 18, 2022

 रौद्र सिनेमानंतर उर्मिला झळकणार श्यामची आई सिनेमात

 

अभिनेत्री उर्मिला जगताप करिअरच्या सुरुवातीच्या काळातच विविध भूमिकांनी लक्ष वेधून घेत आहे.उर्मिलाचा रौद्र हा सिनेमा एप्रिल मध्ये रिलीज झाला. रौद्र सिनेमातल्या उर्मिलाच्या कामाचं कौतुक झाले. रौद्र सिनेमानंतर उर्मिला आता नक्की काय करते आहे, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना असेल. उर्मिलाचा नवीन सिनेमा लवकरच भेटीला येणार आहे. उर्मिलाने नुकतंच नव्या सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे. या सिनेमाचे नाव आहे सुजय डहाके दिग्दर्शीत श्यामची आई.  


या सिनामबद्दल उर्मिला सांगते ‘’एखाद्या कलाकारासाठी यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असू शकेल. एप्रिलला माझा रौद्र सिनेमा रिलीज झाला, 3 एप्रिलला लगेच श्यामची आई या सिनेमाचं शूटिंग सुरू झालं.  नावाजलेले प्रोजेक्ट , नवीन टीम, नावाजलेले कलाकार, त्यातही पहिल्याच सिनेमात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक सुजय डहाके, त्यामुळे सुरुवातीला थोडं दडपण होतं. पण,प्रत्यक्षात सेटवरचा अनुभव मला खूप शिकण्यासारखा होता.’’



साने गुरुजींच्या श्यामची आई या मूळ कथेवर आधारीत हा चित्रपट आहे. या सिनेमाबद्दल उर्मिला पुढे सांगते, “या चित्रपटाचा काळ वीस – तीसच्या दशकातील असल्याने त्या काळची भाषा, देहबोली या सगळया गोष्टी मला शिकायला मिळाल्या. या भूमिकेसाठी मी जीव ओतला असं म्हणेन. सुजय सरांनी मला खूप मदत केली. भूमिकेची लांबी किती आहे यापेक्षा कोणती भूमिका आहे ? टीम कोणती आहे ? हेही माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.”

श्यामची आई सिनेमातल्या उर्मिलाच्या भूमिकेबद्दल आणि सिनेमाबद्दल अधिक माहिती लवकरच समोर येईल.  





No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable....

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable.... #Chhaava kicks off Week 3 with a bang! Rakes in 13.30 Cr on 3rd Friday, taking its ...