Monday, May 30, 2022

  


'माझी माणसं'

सन मराठी ३० मेपासून सादर करीत आहे नवी मालिका

स्वकर्तृत्वावर घर सांभाळणाऱ्या गिरीजाची गोष्ट

सन टीव्ही नेटवर्कची सन मराठी ही वाहिनी  गेल्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस आली. ‘सोहळा नात्यांचा’ हे ब्रीदवाक्य असणाऱ्या या वाहिनीने आपल्या प्रेक्षकांसाठी नात्यांनी सजलेल्या वेगवेगळया मालिका आणल्या.

अशीच एक वेगळ्या नातेसंबंधाची गोष्ट, 'माझी माणसं' या सन मराठीच्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांना येत्या ३० मे पासून दिसणार आहे. आपल्या वडिलांच्या पश्चात आपल्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या 'गिरीजा'ची ही गोष्ट असून एका हॉस्पिटलमध्ये हेड नर्स असलेली गिरिजा तिच्या ८ जणांच्या कुटुंबातील एकमेव कमवणारी व्यक्ती आहे. घरातील सर्वांची काळजी घेत असताना, स्वतःकडे; स्वतःच्या सुखाकडे  मात्र ती नेहमीच दुर्लक्ष करते. कुटुंबाचा एकटाच कमवता आधार असल्यामुळे आपल्या भावंडांच्या शिक्षणापासून ते घरखर्च भागवण्याची जबाबदारी सर्वस्वी गिरीजाच पार पाडते. अर्थात या सगळ्या प्रवासात अनेक अडथळे येतात. त्यातून मार्ग काढताना ज्या आपल्या माणसांचा तिला आधार वाटतो, अशी तिला आपली वाटणारी माणसं खरंच तिची आपली आहेत का? ह्या  प्रश्नाभोवती  मालिका गुंफलेली आहे.  

सन मराठी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या वेगवेगळ्या मालिका आपल्याला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रांतात घेऊन जातात. शहरी आणि ग्रामीण महाराष्ट्रातील राहणीमान, तेथील संस्कृती आणि विविधता यांचा सुरेख मिलाप आपल्याला या मालिकांमध्ये पहायला मिळतो. महाराष्ट्रातील मालवण या भागातील कुटुंबाची पार्श्वभूमी असलेले मालिकेचे हे कथानक कोकणातील निसर्गसौंदर्याप्रमाणेच उत्तरोत्तर फुलत जाणार आहे.

कर्तव्यदक्ष आणि जबाबदार गिरीजाची भूमिका या मालिकेत जानकी पाठक  साकारत आहे. झोंबिवली या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या जानकीची ही पहिलीच मालिका आहे. स्मिता सरवदे या मालिकेत गिरीजाच्या आईची भूमिका साकारत असून, दिगंबर नाईक मालिकेत गिरीजाचे काका ही नकारात्मक भूमिका साकारत आहेत. याशिवाय साईंकित कामत, आरती मोरे, भूमिजा पाटील, विजय पाटील, साक्षी महाजन, रोहन पेडणेकर, सोनम म्हसवेकर हे कलाकार सुद्धा या मालिकेत ठळक भूमिकेत दिसणार आहेत. कोठारे व्हिजन यांची निर्मिती असलेली ही मालिका सन मराठीवर ३० तारखेपासून सोमवार ते शनिवार रोज रात्री ८ वाजता महाराष्ट्राच्या प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

ह्यासोबतच सन मराठी ह्या वाहिनीवर प्रेक्षकांना नात्यांनी सजलेल्या वेगवेगळ्या मालिका  संध्याकाळी ७ ते रात्री १०. ३०  ह्या वेळेत पाहायला मिळतील. सन मराठीवर संध्याकाळी ७ वाजता 'आभाळाची माया', ७.३० वाजता 'जाऊ नको दूर बाबा!', ८.३० वाजता 'कन्यादान',  रात्री ९ वाजता 'संत गजानन शेगावीचे',  ९. ३० वाजता 'नंदिनी' तसेच रात्री १० वाजता 'सुंदरी' ह्या मालिका दाखविल्या जाणार आहेत.

सन मराठी ही फ्री वाहिनी सर्व प्रमुख डिटीएच प्लॅटफॉर्म्स आणि केबल नेटवर्क्सवर मोफत उपलब्ध आहे. तसेच ही वाहिनी डीडी फ्री डिश वर देखील चॅनेल नंबर ६ वर उपलब्ध आहे. 

Promo Links-

Title Track-

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

GLOBAL PRIDE OF SINDHI AWARDS 2024: A GLORIOUS CELEBRATION OF SINDHI HERITAGE

  GLOBAL PRIDE OF SINDHI AWARDS 2024: A GLORIOUS CELEBRATION OF SINDHI HERITAGE Awardees and guests- Ramesh Taurani, Ghanshyam Vaswani,Lille...