Friday, May 20, 2022

 ज्ञान आणि मनोरंजन यांचा अद्भुत खेळ रंगणार!  

ज्ञान आणि मनोरंजन यांचा अद्भुत खेळ रंगणार! - सचिन खेडेकर घेऊन येताहेत 'कोण होणार करोडपती'चं  नवं पर्व !

'कोण होणार करोडपती'. 6 जूनपासून सोम.-शनि., रात्री 9 वाजताआपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

 


 सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपतीहा कार्यक्रम  जूनपासून  प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेया कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळते.  संपूर्ण महाराष्ट्रातून 'कोण होणार करोडपतीया कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतो 'आता आलीये आपली वेळज्ञान आणि मनोरंजन यांचा अद्भुत खेळ', असं या वेळच्या पर्वाचं ब्रीदवाक्य आहे.  या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन  सचिन खेडेकर करणार आहेतहॉटसीटवर आलेल्या प्रत्येकाशी आपुलकीनी बोलून त्यांना मानसिक आधार देण्याचं महत्त्वाचं काम सचिन खेडेकर लीलया पार पाडतातसचिन खेडेकर हे मनोरंजन क्षेत्रातलं खूप मोठं नाव असल्यानं ज्ञानार्जन आणि मनोरंजन या दोन्हींची ते उत्तम सांगड घालतातया कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून स्पर्धक सहभागी होत असतात.  प्रत्येक स्पर्धकाचा जीवनसंघर्ष जाणून घेऊनत्याला कार्यक्रमाची माहिती देऊन  त्यांना   बोलतं करून सचिन खेडेकर सूत्रसंचालकाची धुरा  उत्तमरीत्या सांभाळतातप्रेक्षकांमध्येही 'कोण होणार करोडपती', या कार्यक्रमाविषयी उत्सुकता असते.

 

पाहा, 'कोण होणार करोडपती'. 6 जूनपासून सोम.-शनि., रात्री 9 वाजताआपल्या सोनी मराठी वाहिनीवर.सचिन खेडेकर घेऊन येताहेत 'कोण होणार करोडपती'चं नवं पर्व !

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Moneyview Limited: Initial public offering to open on Thursday, September 24, 2026

  Moneyview Limited: Initial public offering to open on Thursday, September 24, 2026 Price Band fixed at ₹32 per equity share of face value ...