Friday, May 20, 2022

                    छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 

                  ‘छावा-द ग्रेट वॉरियर’ सिनेमाचा शुभारंभ


धर्मवीर संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा-द ग्रेट वॉरियर’ सिनेमाचे पहिले क्लॅपिंग कोल्हापूरमध्ये संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर दिमाखात पार पडले. जेष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 'छावा-द ग्रेट वॉरियर’ चित्रपटाचा मुहूर्त केला गेला.

दिग्दर्शक राहुल जनार्दन जाधव म्हणतात, "बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या छत्रपती शंभूराजांवरील हा  चित्रपट  तरुणांसाठी प्रेरणात्मक ठरेल अशी आशा आहे. तसेच ह्या महावीराची शोर्यगाथा मोठ्या पडद्यावर आणण्याची संधी मला मिळतेय ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे."

निर्माते सनी रजानी म्हणतात, "आम्ही भाग्यशाली आहोत की शंभूराजांसारखे थोर छत्रपती स्वराज्याला लाभले. अशा अष्टपैलू राजाची प्रेरक कारकीर्द जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी हा आमचा एक छोटासा प्रयत्न."

शंभुराजांची महान शौर्यगाथा कथन करणारा मल्हार पिक्चर्स प्रस्तुत, वैभव भोर आणि सनी रजानी निर्मित आणि राहुल जनार्दन जाधव दिग्दर्शित  ‘छावा-दि ग्रेट वॉरियर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.


लेखक युवराज पाटील, दिग्दर्शक राहुल जनार्दन जाधव, निर्माता सनी रजानी, लेखक डॉ जयसिंह राव पवार, तारारानी पवार आणि वसुधा पवार कोल्हापूरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा-द ग्रेट वॉरियर’ सिनेमाच्या शुभारंभासाठी उपस्थित होते* 

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...