'कार्टूनली स्टुडिओ' प्रस्तुत 'नको रुसू ग माझे आई' गाण्याचा दिमाखदार लॉंचिंग सोहळा संपन्न
![]() |
एकविरा आईच्या भक्तांसाठी 'नको रुसू ग माझे आई' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. नुकतंच या गाण्याचा लॉंचिंग सोहळा पार पडला. प्रथमेश कदम आणि अंकिता राऊत हे कलाकार या गाण्यात झळकले आहेत. कोळीबांधवांच्या दिलावर राज्य करणारी त्यांची एकविरा आई कायमच तिच्या लेकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. कार्ल्याच्या डोंगरावर बसलेल्या या एकविरा आईच्या चैत्र महिन्यातील यात्रेला जाता न आल्याने आई तू रागवू नकोस, कायम आम्हा भक्तांवर कृपा ठेव असे सांगणाऱ्या कोळी जोडप्याची आर्त हाक 'नको रुसू ग माझे आई' या गाण्यातून प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणार आहे.
या गाण्याच्या लॉंचिंग सोहळ्याला 'नको रुसू ग माझे आई' या गाण्यातील कलाकार प्रथमेश कदम आणि अंकिता राऊत आणि संगीतकार प्रवीण कुवर जी , गायिका सोनाली सोनावणे तसेच सुप्रसिद्ध संगीतकार प्रशांत नाक्ती, अभिनेता नीक शिंदे आणि विजय सोनावणे हे देखिल उपस्थित होते.
'नको रुसू ग माझे आई' हे गाणे प्रेक्षकांच्या दिलावर राज्य करण्यास आले असून एकविरा आईचे दर्शनही या गाण्यातून घडतेय. विशेषतः एकविरा आईच्या भक्तांना या गाण्याचा आस्वाद घेणे रंजक ठरणार यांत शंकाच नाही. तर अंकिता आणि प्रथमेशची फ्रेश जोडी या गाण्यातून प्रेक्षकांना थिरकायला भाग पाडेल यात काही शंका नाही.
Link - https://youtu.be/M6lgPq-EaF4
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST