Saturday, March 25, 2023

 प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री साकारणार ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे मालिकेत विशेष व्यक्तिरेखा!

 


                       मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळी हे नाव कायमच आघाडीवर असतेतिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहेसुरुवातीच्या काळात काही मालिकांत काम करून प्राजक्ता घराघरांत पोहोचलीफक्त मालिकाच नव्हे तर मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याचंही स्वप्न तिनी पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवलंमालिकाचित्रपटवेबसिरीज या तिन्ही माध्यमांमध्ये प्राजक्ता उत्तम काम करतेचपण त्याबरोबरीनेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारीही तिनी उत्तमरीत्या पेलली आहेसुरुवातीपासूनच ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा ह्या कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग आहेप्राजक्ताने अधिक मेहनत करत कलाविश्वात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.


                       आता प्राजक्ता माळी आपल्या चाहत्यांना आश्चर्यचकित करणार आहेआता ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे या मालिकेत तिची एन्ट्री होणार आहेतब्बल  वर्षांनी ती मालिकेत पुनरागमन करते आहेतिला मालिकेत पाहण्याची संधी मिळत असल्याने तिचा चाहतावर्ग नक्कीच खूश होणार आहे आणि तिच्या चाहत्यांसाठी ही पर्वणी ठरणार आहेपारगाव पोस्टात तिच्या येण्यामुळे काय धमाल होणार आहेहे पाहणे रंगतदार ठरेल.



 

पोस्टात संगणक येण्याने आधीच सर्वांच्या कामात गोंधळ निर्माण झाले आहेत.  त्यात आता पोस्टात नवीन एन्ट्री झाल्यामुळे आणखीन काय पाहायला मिळणारहे पाहणे प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहेपाहायला विसरू नकानवी मालिका - 'पोस्ट ऑफीस उघडं आहे.',  गुरुवार ते शनिवार रात्री 9 वासोनी मराठी वाहिनीवर.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

*NTT DATA Payment Services Introduces ADAPTIS to Power Smarter Commerce & Payments for Indian Businesses*

  *NTT DATA Payment Services Introduces ADAPTIS to Power Smarter Commerce & Payments for Indian Businesses* (From left) Mr. Takeo Ueno W...