Tuesday, March 21, 2023

 अश्विनी कासार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत. - ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ १ मेपासून सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता 


  नेहमी निरनिराळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री अश्विनी कासार आता एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘कारण गुन्ह्याला माफी नाही या नव्या मालिकेत अश्विनी कासार पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहेअश्विनी या मालिकेत साहाय्यक पोलीस आयुक्तांच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेअश्विनी पहिल्यांदाच पोलिसांच्या भूमिकेत दिसते आहेयाआधी निरनिराळ्या मालिकांमधून आणि निरनिराळ्या व्यक्तिरेखांमधून अश्विनी कासार प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. ‘कारण गुन्ह्याला माफी नाही ह्या मालिकेची झलक सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी घेऊन आली आहे.

                 ‘तुमची मुलगी काय करते या मालिकेची टीम या मालिकेसाठीच कार्यरत आहेहरीश दुधाडे आणि चंद्रलेखा जोशी यांच्या गाजलेल्या व्यक्तिरेखांबरोबरच आता अश्विनी कासार हीसुद्धा पोलीस गणवेशात पाहायला मिळणार आहेयांचे हे स्पेशल ओप्रेशन स्कॉड मालिकेतून आपल्याला पाहायला मिळणार आहेया मालिकेची झलक जेव्हापासून प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे तेव्हापासून प्रेक्षकांमध्ये मालिकेबद्दल चर्चा आणि उत्सुकता निर्माण झाली आहेअश्विनी साहाय्यक पोलीस आयुक्तांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेनुकताच तिचा फर्स्ट लूक प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे.   मेपासून सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असून प्रेक्षकांच्या मनात या मालिकेबद्दल फार कुतूहल आहे.




No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...