Tuesday, March 21, 2023

 ज्ञानेश्वर माउली' मालिकेत नंदेश उमप साकारणार संत सेना महाराज. - पाहा, 'ज्ञानेश्वर माउली', सोम.-शनि., संध्या. 7 वा., सोनी मराठी वाहिनीवर.


                      सोनी मराठी वाहिनीवरील 'ज्ञानेश्वर माउलीया मालिकेने प्रेक्षकांना संतांची परंपरा उलगडत भक्तिरसात तल्लीन केले आहेमाउली आणि त्यांची भावंडंयांचे चमत्काररेड्यामुखी वेदसार्थ श्रीज्ञानेश्वरीविश्वरूप दर्शनपसायदान हे सारं काही प्रेक्षकांना विशेष भावलंप्रेक्षक हरिभक्तीच्या या अलौकिक प्रवासाचे साक्षीदार झाले आहेतमालिकेतल्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहेपण आता मालिकेत विविध संतांची मांदियाळी अनुभवायला मिळत असताना यात आणखी एका संताचा प्रवेश होणार आहे.

 


 संतांच्या या प्रवासाची सुरुवात संत कान्होपात्रा यांच्या येण्याने झालीसंत चोखामेळा यांची कथाही प्रेक्षकांना पाहायला मिळाली आणि प्रेक्षकांना ती भावली आहेसंत नामदेव यांनीही प्रेक्षकांना भुरळ पडलीआता मालिकेत संत सेना महाराज यांचा प्रवेश होणार आहेमाउली आणि नामदेव यांची भेट कशा प्रकारे होणारहे पाहणं रंजक ठरणार आहेसंत सेना महाराज यांची भूमिका नंदेश उमप साकारणार आहेतनंदेश उमप हे संगीत क्षेत्रातील नावाजलेलं व्यक्तिमत्त्व आहेत्यांच्या या वेशाची/पेहरावाची प्रेक्षकांमध्ये चर्चा होईलयात शंकाच नाहीत्यांच्या या आध्यात्मिक भूमिकेसाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली आहेसंत सेना महाराज आणि संत ज्ञानेश्वर  त्यांची भावंडं यांची भेट कशी होतेहे पाहणे प्रेक्षकांसाठी  उत्कंठा वाढवणारे असेल.

 

                      संत सेना महाराज हे न्हावी समाजाचे प्रमुखते आळंदीजवळून प्रवास करताहेत  हे समजताच माउली आणि त्यांची भावंडं त्यांना भेटण्यासाठी म्हणून जातातमाउली आणि त्यांच्या भावंडांना संत सेना महाराज यांना भेटण्याची फार उत्सुकता आहेमाउली आणि  संत सेना महाराज यांची भेट कशी असेलहे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे

 

                     संत श्रीज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले संत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  संत सेना महाराज यांचा प्रवास पाहण्यासाठी पाहत राहा, 'ज्ञानेश्वर माउली', सोम.-शनि., संध्या 7 वा., सोनी मराठी वाहिनीवर.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...