Friday, March 24, 2023

                                        'सरी'मध्ये दिसणार प्रेमाचा त्रिकोण



प्रेम म्हणजे दोन जीवांचे मिलन. जणू स्वर्गात बांधल्या गेलेल्या रेशीमगाठीच. पण क्षणात त्यांच्या आयुष्यात तिसरा आला तर? अशी अकल्पित प्रेमकथा असलेला 'सरी' हा चित्रपट येत्या ५ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटामधील प्रमुख भूमिकेत असलेल्या कलाकारांचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून मालिकेतून घराघरात पोहोचलेला अजिंक्य राऊत, विविध चित्रपटांतून तरूणांच्या हृदयचा ठाव घेणारी रितिका श्रोत्री आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता पृथ्वी अंबर यांच्या प्रेमाचा त्रिकोण या पोस्टरमध्ये दिसत आहे. आता यांचे प्रेम त्यांना आयुष्याच्या कोणत्या वळणावर नेणार हे पाहणे रंजक ठरणार आहे. 'लाईफ इज फुल्ल ऑफ सरप्राइज अँड मिऱ्याकल्स.' अशी या प्रेमकथेची टॅगलाईन आहे.

कॅनरस प्रोडक्शन प्रस्तुत, डॉ. सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्मित या चित्रपटाचे लेखन, संकलन दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक अशोका के. एस. यांनी केले असून, सरी या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच ते मराठीत पदार्पण करत आहेत, तर रिलायन्स एंटरटेनमेंटने या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी सांभाळली आहे. 

प्रेमकथा असलेल्या 'सरी' या  चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अशोका के. एस. म्हणतात; "गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटाने घेतलेली भरारी मी पाहिली आहे. मी दाक्षिणात्य सिनेसृष्टीत कार्यरत असलो, तरी मराठी चित्रपट आवर्जून पाहतो. त्यामुळेच मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची इच्छा होती. ती संधी मला 'सरी' या चित्रपटाद्वारे मिळाली आहे. प्रेक्षकांना ही प्रेमकथा नक्कीच भावेल."

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable....

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable.... #Chhaava kicks off Week 3 with a bang! Rakes in 13.30 Cr on 3rd Friday, taking its ...