भूकंपग्रस्त टर्कीला १००० ‘रिमोट पेशंट मॉनिटरिंग पॅच’ दान करणार
नवी मुंबई, ७ मार्च २०२३: टर्कीमध्ये नुकत्याच झालेल्या आपत्तीमुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे आणि हजारो लोक जखमी झाले आहेत. बचावाचा टप्पा पूर्ण झाला असून आता पुनर्वसनाचा आणि पुन्हा स्थिरस्थावर होण्याचा टप्पा नुकताच सुरू झाला आहे. यामध्ये अनेक रुग्णालयांची पडझड झाली आणि आता ती रुग्णालये कार्यरत नाहीत. डॉक्टर्स आणि परिचारिका देखील कमी झाले आहेत.या कठीण काळात टर्कीला मदत करण्यासाठी अपोलो हॉस्पिटल्स आणि लाइफसाइन्सने १००० रिमोट पेशंट मॉनिटरिंग पॅच दान करण्यासाठी भागीदारी केली आहे. जेव्हा रुग्णांना हृदयाच्या ठोक्यांची लय आणि महत्त्वाच्या लक्षणांचे निरीक्षण करणे आवश्यक असते तेव्हा हे पॅचेस वापरले जाऊ शकतात. ते डॉक्टरांना रुग्णाच्या हृदयाचे ठोके, इसीजी लय, श्वसन दर, तापमान आणि स्थिती यांचे विश्वसनीयपणे निरीक्षण करण्यास परवानगी देते. ज्यांना रुग्णालयाच्या बाहेर किंवा फील्ड वर काळजी घेण्याची आवश्यकता आहे अशा रुग्णांसाठी हे पॅचेस वापरले जाऊ शकतात.
जीवितहानी टाळण्यासाठी महत्त्वाच्या लक्षणांचे वेळेवर निरीक्षण करणे आवश्यक असते; विशेषतः जेव्हा रुग्णांना त्यांची नेहमीची काळजी आणि औषधे उपलब्ध नसतील आणि आपल्या घरदाराच्या झालेल्या नुकसानामुळे जेव्हा ते प्रचंड ताण सहन करत असतील तेव्हा तर हे निरीक्षण अधिक गरजेचे असते. अपोलो हॉस्पिटल्सचे डॉ. साई प्रवीण हरनाथ म्हणाले, “अपोलो हॉस्पिटल टर्कीला त्यांच्या या कठीण प्रसंगामध्ये आपल्या संपूर्ण क्रिटीकल केअर आणि जी या रुग्णांवर देखरेख ठेवण्यासाठी मदत करू शकते अशा सब स्पेशालिस्ट टीम सह-वैद्यकीय मार्गदर्शन आणि सहाय्य करण्यासाठी तयार आहे.”
श्री. हरी सुब्रमणियम, मुख्य कार्यकारी अधिकारी, लाइफसाइन्स म्हणाले, “एक कंपनी म्हणून आमचा नेहमीच विश्वास आहे की, महत्त्वाच्या लक्षणांवर कुठेही आणि कधीही निरीक्षण करणे गरजेचे असते आणि आमची उपकरणे रुग्णांच्या जखमा भरून येण्यासाठी, हानी टाळण्यासाठी व रुग्ण बरे व्हावेत म्हणून रुग्णांच्या संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यास डॉक्टरांना मदत करतात करतात.”
वेदॅत बुलूत, सरचिटणीस प्राध्यापक, टर्की मेडिकल असोसिएशन सेंट्रल कौन्सिल म्हणाले,“मानवतावादी वैद्यकीय मदतीसाठी आणि अपोलो हॉस्पिटल समूहाच्या एकात्मत भावनेसाठी बद्दल टर्की मेडिकल असोसिएशनच्यावतीने आम्ही कृतज्ञ आहोत. भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी केलेले सर्व प्रयत्न अमूल्य आहेत. अदाना मेडिकल चेंबर हे आता आपत्ती क्षेत्रातील सामुग्री व रसद पुरवठा केंद्र आहे आणि सर्व वैद्यकीय पुरवठा अदाना मेडिकल चेंबरमधून अन्य शहरांकडे वितरित केला जातो. विशेषतः चार शहरांचे या आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले आहे आणि या शहरांमध्ये वैद्यकीय चेंबर्सच्या इमारतीही कोसळल्या आहेत.”
डॉ. श्री. सेलाहत्तीन मेंटे, अध्यक्ष, रेडिएशन ऑन्कॉलॉजी स्पेशालिस्ट-अदाना मेडिकल चेंबर म्हणाले,“१५ दशलक्ष लोकांसह एकूण ११ प्रांत प्रभावित झालेल्या या भूकंपाच्या आपत्तीमध्ये आपण दाखविलेल्या आंतरराष्ट्रीय एकात्मतेबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत.संपूर्ण प्रयत्न अनेक देशांमध्ये पसरलेल्या स्वयंसेवकांच्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कद्वारे शक्य झाला आहे आणि यासाठी टर्कीमधील आधीच अनेक समस्यांना हाताळत असलेल्या व्यस्त डॉक्टरांचे प्रचंड समन्वय व सहकार्य लागले. आम्हाला आशा आहे की, उपकरणे आणि तज्ज्ञांच्या या देणगीमुळे या दोन महान देशांमध्ये एक वैद्यकीय सेतु तयार करण्यात आणि आपादग्रस्तांचे दु:ख कमी करण्यात मदत होईल.''
आपत्तीग्रस्त टर्कीच्या मदतीसाठी 'अपोलो-लाइफसाइन्स' ची भागीदारी
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST