Monday, December 4, 2023

एण्‍ड टीव्‍हीची नवी मालिका 'अटल' ५ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता!

एण्‍ड टीव्‍हीची नवी मालिका 'अटल५ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता!

नेहा जोशी कृष्‍णादेवी वाजपेयीची भूमिका साकारणार!

एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका 'अटल'चा पहिला एपिसोड ५ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता सुरू होणार आहे. प्रेक्षकांना दिवंगत पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्‍या बालपणीच्‍या न सांगण्‍यात आलेल्‍या कथा पाहण्‍याची उत्‍सुकता लागली आहे. पहिल्‍या एपिसोडमध्‍ये अटल यांचा जन्‍मत्‍यांच्‍या कुटुबियांनी त्‍यांच्‍यामध्‍ये बिंबवलेली सांस्‍कृतिक मूल्‍येब्रिटीश राजवटीतील अन्‍यायकारक वागणूकीबाबतची त्‍यांची अस्‍वस्‍थता आणि अन्‍यायाविरोधत त्‍यांची भूमिका पाहायला मिळणार आहे.


आगामी एपिसोडबाबत सांगताना कृष्‍णा बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणारे आशुतोष कुलकर्णी म्‍हणाले
, ''एपिसोड नाताळ उत्‍सवादरम्‍यान अटल यांचा जन्‍मतसेच ब्रिटीश अधिकारी व तोमर (मोहम्मद हश्‍मी) यांच्‍यामुळे त्‍यांच्‍या कुटुंबियांना हॉस्पिटलमध्‍ये जाताना सामना कराव्‍या लागलेल्‍या अडथळ्यांना दाखवतो. अटल (व्‍योम ठक्‍कर) मोठे होत असताना त्‍यांचे कुटुंबिय त्‍यांच्‍यामध्‍ये सांस्‍कृतिक मूल्‍ये व वारसा बिंबवतात. शाळेतील सांस्कृतिक चिन्हे पुसून टाकण्याविरोधात त्‍यांचा पुढाकार आणि ब्रिटीश राजवटीत असलेल्या लोकांच्या अन्यायकारक वागणूकीबद्दलची त्यांची अस्वस्थता यामधून त्‍यांची वाढती जागरूकता व असहमती दिसून येते. ब्रिटीश अधिकाऱ्यांकडून गावकऱ्यांवर होणारा क्रूर अत्याचार पाहून अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचा त्यांचा संकल्प आणखी दृढ होतोहे सर्व जाणून घेण्यासाठीचा अटल यांचा शोध त्‍यांना भगतसिंगच्या पावलांवर पाऊल ठेवण्‍यास प्रेरित करतोज्याचा त्यांच्यावर खोलवर परिणाम होतोभगतसिंगसुखदेव आणि राजगुरु यांच्या फाशीमुळे अटल यांना खूप त्रास होतोविरोधाला न जुमानता या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचे त्यांचे ध्येय आहेब्रिटीश अधिकाऱ्यांनी आव्‍हानात्‍मक स्थिती निर्माण केली असताना देखील स्वातंत्र्यसैनिकांना अटळ पाठिंबा देत अटल यांचे कुटुंब तोमरच्या धमकावण्याच्या डावपेचांना तोंड देण्‍याचे ठरवतात आणि कथानकाला रोमांचक वळण मिळतेहा संघर्ष दडपशाहीविरुद्ध उभे राहण्याचा आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या बलिदानाचा सन्मान करण्याची त्यांची स्थिरता व दृढनिश्चयाला सादर करतो.'' 

पहा मालिका 'अटल'चा प्रीमियर एपिसोड ५ डिसेंबर रोजी ८ वाजता, आणि मालिकेचे प्रसारण पहा दर सोमवार ते शुक्रवार फक्‍त एण्‍ड टीव्‍हीवर!

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...