Monday, December 18, 2023

नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला!

नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला!

नवी मालिका "निवेदिता माझी ताईलवकरच सोनी मराठी वाहिनीवर.

 

                   सोनी मराठी वाहिनी नेहमीच निरनिराळ्या विषयांच्या मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतेआता आपल्या मनोरंजनाच्या पेटाऱ्यातून आणखी एक नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला  येते आहे. "निवेदिता माझी ताईअसे या मालिकेचे नाव असून या मालिकेतून एक फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेअशोक फळदेसाई आणि एताशा संझगिरी ही जोडी या नव्या मालिकेतून आपल्या भेटीस येते आहेप्रेक्षकांच्या लाडक्या अशोक आणि एताशा यांनी याआधीच्या मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची चांगलीच छाप पाडली आहेआता नव्या मालिकेतून ते  प्रेक्षकांचे मनोरंजन कशा प्रकारे करतातहे पाहणे उत्सुकतेचे असेलयशोधन आणि निवेदिता ही त्यांच्या व्यक्तिरेखांची नावे आहेतपण या मालिकेत त्या दोघांबरोबर एक लहानगा मुलगा दिसणार आहेरुद्रांश चोंडेकर असे त्याचे नाव असून तो असीम या भूमिकेत पाहायला मिळणार आहेअसीम हा निवेदिताचा लहान भाऊआता निवेदिता आणि यशोधन यांची जोडी छोट्या पडद्यावर किती रंगत आणतेहे आपल्याला मालिकेत पाहायला मिळेल.

  

सोनी मराठी वाहिनी नेहमीच रंगतदार विषय प्रेक्षकांसाठी घेऊन येते. "निवेदिता माझी ताईया मालिकेचा विषयही तितकाच आगळावेगळा आहेअभिनेता अशोक फळदेसाई आपल्या प्रॉमिसिंग अभिनयासाठी नेहमीच चर्चेत असतोत्याच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी असेलतसेच एताशा संझगिरीनेही याआधी काही मालिकांमध्ये उत्तम अभिनय केला आहे आणि आता या मालिकेत दोघेही नव्या व्यक्तिरेखांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतीलमालिकेची पहिली झलक नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेनिवेदिता आणि यशोधन  यांच्या नव्या वेषभूषेची चर्चा नक्कीच रंगणार आहे.  भावा-बहिणीच्या अनोख्या नात्याची गोड गोष्ट सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेआता असीम आणि निवेदिता या भावा-बहिणीचे अनोखे नाते कशाप्रकरचे असेल हे मालिकेतच आपल्याला पाहायला मिळेलमालिका लवकरच सोनी मराठी वाहिनीवर दाखल होणार आहेपाहायला विसरू नका "निवेदिता माझी ताईलवकरच सोनी मराठी वाहिनीवर

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...