Saturday, December 16, 2023

एमआयटी-डब्ल्यूपीयूची १३वी 'भारतीय छात्र संसद'

 एमआयटी-डब्ल्यूपीयूची १३वी 'भारतीय छात्र संसद'


नागरी सेवांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसीय कार्यक्रम एक अनोखा उपक्रम

नवी मुंबई, १२ डिसेंबर २०२३: राजकीय आणि सामाजिकदृष्ट्‍या सक्रिय विद्यार्थ्यांनी आवर्जून उपस्थित रहावा असा हा कार्यक्रम असून यामध्ये २५०,००० पेक्षा जास्त महाविद्यालये आणि ४०० पेक्षा अधिक विद्यापीठांमधून विद्यार्थी सहभागी होणे अपेक्षित आहे. पारंपरिक शैक्षणिक पद्धतींच्या पलीकडे जाऊन परस्परसंवादी सत्र व माहितीपूर्ण चर्चासत्रे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लोकशाहीबाबत जागरूकता व दृष्टी देणारे व्यासपीठ आहे.

विशेषतः जी मुले नागरी सेवा परीक्षा व मुलाखतीसाठी तयारी करीत आहेत त्यांच्यासाठी ही सत्रे अतिशय उपयुक्त आहेत. १३व्या भारतीय छात्र संसदेसाठी नावनोंदणी चालू झाल्याची घोषणा करताना एमआयटी- वर्ल्ड पीस यूनिवर्सिटी (MIT-WPU) ला अत्यंत आनंद होत आहे. १०-१२ जानेवारी २०२३ या कालावधीमध्ये पुण्यातील कोथरूड येथे स्थित असलेल्या एमआयटी- वर्ल्ड पीस यूनिवर्सिटी (MIT-WPU) च्या परिसरात ‘भारतीय छात्र संसद’ ही तीन दिवसीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. लोकशाहीबाबत वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तरुणांचे प्रबोधन करण्याच्या उद्दिष्टाने हा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे.


नागरी सेवांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा तीन दिवसीय कार्यक्रम एक अनोख्या प्रकारचे नेटवर्क प्लॅटफॉर्म म्हणून तर उपयुक्त आहेच, त्याशिवाय हा कार्यक्रम त्यांना समविचारी लोकांबरोबर, तज्ज्ञांबरोबर आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील नेत्यांसह संपर्क साधायला आणि जोडले जायला देखील मदत करेल. या वर्षी डॉ.विक्रम संपतजी, अॅडवोकेट आभा सिंगजी, डॉ.शेला रशीदजी, श्री.इम्रान प्रतापगढी, स्वामी मुकुंदानंदजी, श्री. एम.व्यंकय्या नायडूजी, श्रीमती.खुशबू सुंदरजी हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहणे म्हणजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समस्यांविषयीच्या अभ्यासपूर्ण चर्चेत निश्चितपणे सक्रिय सहभागी होणे. 

इच्छुक विद्यार्थी https://registration.bharatiyachhatrasansad.org या अधिकृत संकेतस्थळावर नावनोंदणी करू शकतात.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

सबसे कातिल "गौतमी पाटिल "द महाराष्ट्र फाईल्स उघडणार

  सबसे   कातिल  " गौतमी   पाटिल  " द   महाराष्ट्र   फाईल्स   उघडणार   सबसे   कातिल   गौतमी   पाटिल   या   नावाची   ओळख   महाराष्ट्...