Wednesday, December 6, 2023

'अबोल प्रीतीची गजब कहाणी' मालिकेला रंजक वळण. अखेर मयूरीच सत्य राजवीर समोर येणार.

 'अबोल प्रीतीची गजब कहाणीमालिकेला रंजक वळणअखेर मयूरीच सत्य राजवीर समोर येणार.

'अबोल प्रीतीची गजब कहाणी', सोमते शनिसंध्या.३० वासोनी मराठी वाहिनीवर.

 

सोनी मराठीवरील 'अजब प्रीतीची गजब कहाणीही मालिका प्रेक्षकांमध्ये बरीच लोकप्रिय आहेअजिंक्यने साकारलेला राजवीर सध्या मुलींच्या गळ्यातला ताईत बनला असून राजवीरसारखा मनमिळाऊ-समजूतदार प्रेमी आपल्यालाही लाभावाही समस्त मुलींची सुप्त इच्छा आहेपण.. पण.. इतर मुलींची इच्छा पूर्ण होण्याआधी आपल्या भाऊसाहेब उर्फ मयूरीच्या हाती हा राजवीर लागतो की नाहीयाची उत्सुकता सध्या शिगेला पोहोचली आहेहे गुपित फार काळ ताणून  धरता आता राजवीरला भाऊसाहेब आणि मयूरी यांचं सत्य लवकरच कळणार आहे म्हटलं तर...


मयूरी
 आणि भाऊसाहेब यांचं गुपित आता लवकरच राजवीरच्या समोर येणार अशी परिस्थिती येणार आहे. 'अबोल प्रीतीची अजब कहाणीया मालिकेत हा ट्विस्ट येणार आहेमयूरीचा एक प्रेमळ मित्र तर भाऊसाहेबचा समजूतदार बॉस राजवीर हा एक सच्चा माणूस आहेमयूरीकडे आकर्षित होणारा राजवीर आपल्या जवळच्या बॉडीगार्डला म्हणजेच भाऊसाहेबला आपल्या दिलाची कहाणी मित्रत्वाच्या  नात्याने सांगत आलेला आहेमयूरीला राजवीरचं प्रेम कळतंय पण परिस्थितीच अशी आली आहे की मयूरीला राजवीरवरचं प्रेम त्याच्यापासून लपवावं लागतंयपण नियतीनेच आता मयूरी आणि राजवीर या दोघांना एकत्र आणलंयआपण राजवीरची फसवणूक करतोयअसं मयूरीला वाटतं आहेमयूरी आपल्या मैत्रिणीकडे मन मोकळं करत असतानाच राजवीर तिला पाहतो आणि सगळं सत्य त्याला समजतंमयूरी हीच भाऊसाहेब आहेहे राजवीरला समजतंआता यावर राजवीरची प्रतिक्रिया काय असेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहेआता तिची प्रतिक्रिया काय असेलतो मयूरीची अडचण समजून तिला माफ करेल का की मयूरी आणि  राजवीर यांच्यात  दुरावा निर्माण होईलयाचा मयूरीवर काय परिणाम होणार हे सगळं आता मालिकेत पाहायला मिळेल.

 

भाऊसाहेबच मयूरी आहेहे  राजवीरच्या समोर येणार आहेराजवीरने आजवर भाऊसाहेबशी एक मित्र म्हणून बोलताना आपल्या प्रेमाची कबुली आधीच दिली असल्यामुळे मयूरी आपल्याविषयी काय विचार करेलहा प्रश्न त्याला सतावेल की भाऊसाहेबने उर्फ मयूरीने राजवीरच्या साधेपणाचा फायदा घेतला असा त्याचा समज होईलया दोघांच्या प्रेमाला लागलेलं हे ग्रहण आता तरी सुटणार काराजवीर आणि मयूरी एकत्र येतील कासाधा-सरळ-समजूतदार राजवीर अशाही परिस्थितीत शांत चित्ताने विचार करून मयूरीची बाजू समजून घेईल काया सगळ्या प्रश्नांची मालिका आपल्या सगळ्यांनाच सतावत असेल तर.. त्यासाठी सोमते शनिसंध्या.३० वासोनी मराठीवरील 'अबोल प्रीतीची अजब कहाणी पाहायला विसरू नका.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026

  India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026 IIJS Bharat – Signature 2026 to expected to ge...