Friday, December 29, 2023

हास्याची नॉनस्टॉप पार्टी! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'! ३१ डिसेंबर रोजी केवळ सोनी मराठी वाहिनीवर.

 हास्याची नॉनस्टॉप पार्टी! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'! ३१ डिसेंबर रोजी केवळ सोनी मराठी वाहिनीवर.

  संपूर्ण महाराष्ट्राला लोटपोट हसवणारी हास्यमालिका म्हणजेच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'. घराघरांत हास्याची कारंजी फुलवणारी ही जत्रा 'सहकुटुंब हसू याम्हणतप्रत्येक कुटुंबाला बांधून ठेवण्याचं काम अविरत करत आली आहेसर्वाधिक लोकप्रिय हास्यमालिकेचा मान पटकावणारी सोनी मराठी वाहिनीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'. या वर्षात 'महाराष्ट्राची हास्यजत्राया कार्यक्रमाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आणि आता वर्षअखेरीस अधिकाअधिक मनोरंजन करता यावे यासाठी ३१ डिसेंबर रोजी संपूर्ण दिवस प्रेक्षकांना आवडलेली या वर्षभरातली प्रहसने दिवसभर दाखवली जाणार आहेत आणि रात्री  वाजता हास्याची नॉनस्टॉप पार्टी, 'महाराष्ट्राची हास्यजत्रापाहायला मिळणार आहे!

               सोनी मराठी वाहिनी ही नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीचा मान ठेवत आलेली आहेनवनवीन उपक्रम राबवत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्याची कला त्यांना अल्पावधीतच अवगत झाली आहेया वर्षभरातील तणावपूर्ण जीवनशैलीतून काही घटका निर्मळ आनंद घेता यावा म्हणून 'महाराष्ट्राची हास्यजत्रावर्षअखेरीस संपूर्ण दिवस आपल्या भेटीस येणार आहे.


 '
महाराष्ट्राची हास्यजत्राह्या मालिकेच्या चाहत्यांसाठी ही गोष्ट आनंद द्विगुणित करणारी आणि औत्सुक्याची असणार आहेया जत्रेतली मंडळी प्रेक्षकांचे नवीन वर्ष हसरे करण्यासाठी आता सज्ज झाली आहेतबघायला विसरू नका३१ डिसेंबर रोजी  संपूर्ण दिवस 'महाराष्ट्राची हास्यजत्राआणि रात्री  वाजता हास्याची नॉनस्टॉप पार्टी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर!

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026

  India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026 IIJS Bharat – Signature 2026 to expected to ge...