एण्ड टीव्हीवरील मालिका 'अटल'मधील मिलिंद दास्ताने
यांनी दिवंगत पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबत त्यांच्या भेटीला दिला उजाळा!
संपूर्ण देश २५ डिसेंबर रोजी दिवंगत पंतप्रधान श्री. अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मरण करण्यासह ९९वी जयंती साजरी करण्यास सज्ज असताना एण्ड टीव्हीवरील मालिका 'अटल'मधील अभिनेता मिलिंद दास्ताने २००६ मध्ये त्यांच्यासोबत घेतलेल्या भेटीला उजाळा देत आहेत. एण्ड टीव्हीवर नुकतीच सुरू झालेली मालिका 'अटल' दिवंगत पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या बालपणीच्या न सांगण्यात आलेल्या कथांना सादर करते. मालिकेमध्ये यंग अटलचे आजोबा श्याम लाल वाजपेयी यांची भूमिका साकारणारे मिलिंद दास्ताने या महान नेत्यासोबतच्या त्यांच्या संस्मरणीय भेटीबाबत सांगत आहेत, जेथे या भेटीने त्यांच्या जीवनावर अमिट छाप सोडली.
श्याम लाल वाजपेयी यांची भूमिका साकारणारे मिलिंद दास्ताने म्हणाले, ''२००६ मध्ये मी भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ. हेडगेवार यांच्या जीवनाच्या फिल्म प्रकल्पावर काम करत होतो. डॉ. हेडगेवार यांनी दुर्दैवाने दिवसाचा प्रकाश कधीच पाहिला नाही. चित्रीकरणादरम्यान मोहन राव भागवत जी यांनी अटलजींनी लिहिलेली 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' ही साडेतीन पानांची कविता वाचण्याचा आणि समजून घेण्याचा सल्ला दिला. यासाठी त्यांनी अटलजींसोबत त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी प्रत्यक्ष भेटीची व्यवस्था केली. मला आठवते की, मी त्वरित अस्वस्थ व उत्साहित देखील झालो. पण, भेटीचा क्षण आला आणि मी भारावून गेलो, तसेच त्यांचे व्यक्तिमत्त्व, हुशारी व दूरदृष्टी पाहून मी अचंबित झालो. ते खूप विनम्र होते आणि माझ्यामधील अस्वस्थता त्वरित दूर केली. ते निपुण कथाकार असण्यासह लक्षवेधक शब्दांचा वापर करत अनेक विषयांवर लक्षवेधक कथा रचण्यामध्ये माहिर होते. साहित्य व वक्तृत्वाप्रती त्यांची आवड वाखणण्याजोगी होती. ते अपवादात्मक वक्ता, कवी व राजकारणी होते. त्यांनी मला प्रेरित केले आणि माझ्यावर अमिट छाप पाडली. त्यांच्या ९९व्या जयंतीनिमित्त व्यक्तिश: घेतलेल्या भेटीचे स्मरण करत आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वामधून प्रेरणा घेत या महान नेत्याचे स्मरण व त्यांच्या जयंतीला साजरे करण्यासाठी यासारखा उत्तम क्षण नाही. मी या अद्भुत संधीसाठी कृतज्ञ आहे, ज्यासाठी माझ्या प्रोफेशनचे आभार व्यक्त करतो. मी कधीच कल्पना केली नव्हती की, त्यांच्या भेटीनंतर १७ वर्षांनंतर मी एण्ड टीव्हीवरील मालिका 'अटल'च्या माध्यमातून त्यांच्या बालपणीच्या कथेशी संलग्न असेल आणि मालिकेमध्ये त्यांच्या आजोबांची भूमिका साकारत असेन. हा मोठा सन्मान आहे आणि मी या भूमिकेला न्याय देण्यासोबत संस्मरणीय करण्याची आशा करतो. मी फक्त एवढेच सांगू शकतो की, ज्यांचा वारसा भारतीयांनी उच्च मानला आहे अशा या महान नेत्याला माझी श्रद्धांजली म्हणून या संधीच्या माध्यमातून काही प्रमाणात योगदान दिल्याबद्दल मी कृतज्ञ आहे.''
मिलिंद दास्ताने यांना श्याम लाल वाजपेयी यांच्या भूमिकेत पाहण्यासाठी पाहत राहा 'अटल' दर सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजता फक्त एण्ड टीव्हीवर!
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST