मदर डेअरीने बृहन्मुंबईतील ग्राहकांसाठी आणलंय प्रीमियम - हाय क्रीम मिल्क
- सर्वात जास्त साय असलेलं (क्रीम ) आणि घट्ट दूध , ज्यात ७ टक्के फॅट आणि एसएनएफ ९ टक्के आहे.
- प्रीमियम दूध ५०० मिली आणि १ लिटरच्या पॅकेट मध्ये उपलब्ध, त्याची किंमत अनुक्रमे २७ रुपये आणि ५३ रुपये
दूध आणि दुग्धजन्य उत्पादनांत मदर डेअरी अग्रेसर आहे, तिची स्थापना नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या मालकीअंतर्गत 'ऑपरेशन फ्लड ' उपक्रमाचा भाग म्हणून करण्यात आली होती, आज 'प्रीमियम - हाय क्रीम मिल्क ' या सर्वात जास्त साईच्या दुधाच्या उत्पादनाचं बृहन्मुंबईच्या विविध भागातील ग्राहकांसाठी उद्घाटन करण्यात आले. नवीनच सादर करण्यात आलेलं हे प्रीमियम - हाय क्रीम मिल्क ५०० मिली आणि १ लिटरच्या पॅकेट मध्ये उपलब्ध, त्याची किंमत अनुक्रमे २७ रुपये आणि ५३ रुपये किंमतीत उपलब्ध आहे.
मदर डेअरी फ्रुट अँड व्हेजिटेबल प्रा.लि . चे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. एस. नागराजन म्हणाले की, "मदर डेअरीची आमची उत्पादने ग्राहकप्रधान आहेत, ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यानुसार नवीन उत्पादने आम्ही विकसित करतो. ग्राहकांना काय हवंय याचा अंदाज घेऊन त्यांना सेवा देण्यासाठी आमच्या नव्या उत्पादनाची श्रेणी आम्ही सादर करतो आहोत. मला खात्री आहे की ग्राहकांना हे उत्पादन नक्की आवडेल , कारण ते बाजारपेठांतील गरज लक्षात घेऊनच तयार करण्यात आलं आहे. "
ब्रँड लवकरच एटीएल आणि बीटीएल उपक्रम राबवणार आहे, काही ठराविक ग्राहकवर्गाच्या जागृतीसाठी हा उपक्रम असेल. याद्वारे कंपनीचं रिटेल नेटवर्क ठराविक प्रदेश,बाजारपेठा येथे पूर्ण साईचं दूध (फुल क्रीम ), टोन दूध आणि गाईचं दूध अशा विविध श्रेणी समजावून सांगतील.
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST