Wednesday, October 19, 2016



स्वप्निलच्या वाढदिवशी कापला 'फुगे' सिनेमाचा केक

नवीन प्रयोग आणि नवीन संकल्पनांनी बहरलेले अनेक सिनेमे आता मराठीत येताना दिसत आहे. अशा या नावीन्यतेने नटलेल्या सिनेमांची रंगत आणखीन वाढवण्यासाठी चित्रपटांची नावेदेखील हटके ठेवण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. सिनेमांच्या हटके नावांच्या यादीत आगामी 'फुगे ' या सिनेमाचा देखील समावेश होत आहे. मितवा फेम दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी यांनी दिग्दर्शित केलेल्या 'फुगे ' या सिनेमाची सध्या मोठी चर्चा होत आहे.  धम्माल मस्तीने भरलेल्या या सिनेमाचे सांताक्रूझ येथील लाईटबॉक्समध्ये मोठ्या उत्साहात मोशन पोश्टर आणि टायटल सॉन्गचा टीजर लॉन्च करण्यात आला. या सोबतच सिनेमातील प्रमुख कलाकार स्वप्नील जोशींचा वाढदिवस देखील मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
" स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे यांनी एकत्र काम करावे हाच केवळ या चित्रपटाचा उद्देश आहे ", असे स्वप्नील व सुबोध यांनी सांगितले. . स्वप्नील जोशी व सुबोध भावे यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे.  स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे या मराठीतील दोन तगड्या अभिनेत्यांवर आधारित असलेल्या  गाण्याचे टीजर  प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन करणारे ठरले. मंदार चोळकर लिखित या गाण्याला बॉलिवूडचे आघाडीचे संगीत दिग्दर्शक रोचक कोहली यांनी तालबद्ध  केले आहे. याशिवाय अवधूत गुप्ते आणि सिद्धार्थ महादेवन यांनी सुबोध-स्वप्नीलचे बोल गायले आहेत. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन उमेश जाधव यांनी केले आहे.
पुण्याचा अभिमान बाळगणारा मुंबई-पुणे-मुंबई मधील स्वप्नील त्याच प्रकारच्या भूमिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर धिरगंभीर आणि ऐतिहासिक भूमिकेतून बाहेर पडून सुबोध भावे हटके भूमिकेत दिसणारा आहे. पहिल्यांदाच एकत्र आलेल्या या जोडगोळीला एकमेकांसोबत काम करताना खूप छान वाटले असे या दोघांचेही म्हणणे आहे.  पोष्टरवरील उडत जाणाऱ्या रंगीबेरंगी फुग्यांमुळे हा सिनेमा नक्कीच एका वेगळ्या धाटणीचा असल्याचे समजून येते.



फुगेच्या विषयी बोलताना दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे यांनी सांगितले, "फुगे हा प्रत्येकाच्या आयुष्यात रंग भरणारा चित्रपट आहे. स्वप्न बघायला लावणारा, कल्पना रंगवायला मदत करणारा निरागस आनंद साजरा करायला लावणारा अश्या या  फुगे  चित्रपटाचा  आनंद  सर्व परिवारासोबत  लूटा ".
इंदर राज कपूर या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते आहे. एस टीव्ही  नेटवर्क्ससोबत जीसिम्सचे अर्जुनसिंग बऱ्हानकार्तिक निशानदार तसेच अश्विन आंचन आणि अनुराधा जोशी यांची निर्मिती असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना मनोरंजनाची खुमासदार मेजवानी देण्यास सज्ज झाला आहे. येत्या २ डिसेंबरला  हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...