शरीरसौष्ठवपटू आणि अभिनेता अनुप सिंग ठाकूर यांच्या वॅक्स पुतळ्याचे अनावरण
एकाच वर्षातील शरिरसौष्ठव क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे लोणावळा येथील वॅक्स म्युझियम मधे त्यांचा प्रतीकात्मक पुतळा ठेवण्यात येणार आहे . सेलिब्रिटीज वॅक्स म्युझियम च्या सुनील कंडलूर यांनी हा पुतळा तयार केला आहे .
गोरेगाव येथील वेस्टीन हॉटेल मधे अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले.
अनुप सिंग हे पहिलेच शरीरसौष्ठवपटू आहेत ज्यांचा प्रतिकात्मक पुतळा लोणावळा येथील वॅक्स म्युझियम मधे ठेवला जाणार आहे . याआधी क्रिकेटपटू कपिल देव यांचा पुतळा या म्युझियम मधे ठेवला गेला आहे. या प्रसंगी एजाज खान , मृण्मयी देशपान्डे , लीना मोगरे हे उपस्थित होते .
मिस्टर वर्ल्ड 2015 मुळे ओळखले जाणारे अनुप आता अभिनय क्षेत्रातही पदार्पण करत आहेत . ते एकाच वेळी पाच भाषांमधील चित्रपटात प्रथम पदार्पण (debut) करत आहेत . तेलगू , कन्नड , तामिळ , मराठी आणि हिंदी अशा पाच भाषांमधे एकाच वेळी काम करत आहेत . चित्रपटात काम करत असतानाच अनुप यांनी 7 व्या जागतिक शरिरसौष्ठव चॅम्पियनशिप मधे सुवर्ण पदक पटकावले . याचबरोबर 49 व्या आशियाई चॅम्पियनशिप मधे कांस्य पदक आणि फिट फॅक्टर मधे रौप्य पदक पटकावले होते.
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST