द इंडियन हॉटेल्स तर्फे भारतातील राजेशाही रोमांचक स्थळ अनुभवा
उमैद भवन पॅलेस, ताज लेक पॅलेस, ताज रामबाग
पॅलेस,ताज फलकनुमा पॅलेस मध्ये राजेशाही वास्तव्य करण्याची संधी
मुंबई, १६ ऑक्टोबर २०१८:- राजेशाही प्रासादांचा
वारसा व भव्यता आणि राजघराण्यांच्या विस्मयकारी जीवनशैली आणि भारत असे समीकरण अनंत
काळापासून आपण पाहतो. भारताच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या या स्थळांनी जागतिक पर्यटन
नकाशावर भारतासाठी खास स्थान निर्माण केले आहे. यातील अनेक प्रासादांचे हेरिटेज हॉटेल्सच्या
स्वरुपात पुनरुज्जीवन आणि जतन करण्यात आले आहे. द इंडियन हॉटेल्स कंपनी या भारतातील
अग्रगण्य हॉस्पिटॅलिटी ब्रॅण्डने अगदी स्थापनेपासूनच भारतातील प्रसिद्ध अशा राजेशाही
मालमत्तांचे पुनरुज्जीवन करून भारताचा वैभवशाली भूतकाळ जिवंत ठेवणे ही बांधिलकी मानली
आहे. यातील अनेक वास्तू स्वातंत्र्यपूर्व काळातील
आहेत. समृद्ध इतिहासात पाऊल टाकत ताज पॅलेसेसच्या प्रशस्त व्हराड्यांमध्ये प्राचीन
वंशावळी आणि वारशाचे प्रतिबिंब दिसते आणि आयुष्यभर स्मरणात राहील अशा खास निर्माण केलेल्या
राजेशाही वास्तव्याचा अनुभव देण्याची ग्वाहीही यातून पाहुण्यांना मिळते.
उमैद भवन पॅलेस, जोधपूर २६ एकर पसरलेल्या हिरव्यागार उद्यानांमधील उमैद
भवन प्रासाद हा जगातील सर्वांत मोठ्या खासगी निवासांपैकी एक आहे. वाळवंटाची राजधानी
जोधपूरमध्ये काहीशा उंचीवर विसावलेला हा राजवाडा म्हणजे अत्युत्कृष्ट आरामाचे उदाहरण
ठरावे. १९२८ ते १९४२ या कालावधीत बांधून पूर्ण झालेल्या या प्रासादाची रचना एडवर्डियन
आर्किटेक्ट हेन्री लँचेस्टर यांनी केली होती. १५ वर्षांच्या बांधकामातून आकाराला आलेला
हा राजवाडा पौर्वात्य व पाश्चिमात्य स्थापत्यशास्त्राचा मिलाफ आहे. ३४७ खोल्यांचा हा
प्रासाद जोधपूरमधील राजघराण्याचे प्रमुख निवासस्थान होता. श्वास रोखून धरायला लावणाऱ्या
चित्रांनी सुशोभित अशा या राजवाड्यात रचनेची अनेक वैशिष्ट्ये बघायला मिळतात. उदाहरणार्थ,
गुलाबी संगमरवराच्या एका तुकड्यातून तयार करण्यात आलेला स्टीफन नोरब्लिन बाथ. महाराणी
दालनाच्या न्हाणीघरातील ही रचना प्रासादाच्या अभिमानाचे स्थळ आहे. गेल्या अनेक युगांतील
जोधपूरची ओळख करून घेण्यासाठी राजेशाही शोधाच्या प्रवासाला हे हॉटेल पाहुण्यांना घेऊन
जाते.
ताज लेक पॅलेस, उदयपूर आता उदयपूरमधील ताज लेक पॅलेसमध्ये जा आणि पिचोला
सरोवरातील निश्चल पाण्यातून वर आल्यासारख्या भासणाऱ्या चार एकरांतील संगमरवरी वास्तूची
अद्वितीय लक्झ्युरी अनुभवा. एका मानवनिर्मिती बेटावर बांधलेला हा २५० वर्षे जुना प्रासाद
आता जगातील सर्वांत रोमॅण्टिक हॉटेल्सपैकी एक समजला जातो. एकेकाळी महाराणा जगतसिंहजी
यांचा प्लेझर पॅलेस असलेली ही वास्तू म्हणजे जनान्यातील स्त्रियांना रिझवण्यासाठी सर्वोत्तम
निवांत स्थळ होते. आजही पॅलेस हॉटेलने शाही वारसा कायम राखला असून, पाहुण्यांचे स्वागत
गुलाबपाकळ्यांचा वर्षावाने केले जाते. सरोवरात विहार करणाऱ्या जिवा स्पा बोटीमुळे पाहुण्यांना
एका दैवी अनुभवात बुडून जाण्याची संधी मिळते. निश्चल पाण्याच्या शांततेत पारंपरिक भारतीय
सुगंधोपचार, वैशिष्ट्यपूर्ण बॉडी ट्रीटमेंट्स किंवा गात्रे सुखावणाऱ्या स्नानाचा अनुभव
पाहुण्यांना घेता येतो.
ताज रामबाग पॅलेस, जयपूर एकेकाळी जयपूरच्या महाराजांचे निवासस्थान असलेल्या
जयपूरच्या रामबाग पॅलेसमध्ये राजपूत आतिथ्यशिलतेच्या सर्वोत्तम परंपरा तुम्हाला मंत्रमुग्ध
करून सोडतील. राणीच्या सर्वांत आवडत्या दासीसाठी १८३५ साली बांधलेला रामबाग प्रासाद
नंतर राजेशाही गेस्ट हाउस आणि शिकारघर म्हणून नव्याने बांधून घेण्यात आला. हा प्रासाद
प्रसिद्ध आहे सर्वांच्या प्रशंसेला पात्र ठरलेले महाराज सवाई मानसिंग दुसरे आणि त्यांच्या
राणी राजमाता गायत्री देवी यांचे निवासस्थान म्हणून. उच्च अभिरूचीने सजवलेली दालने,
हवेशीर व्हरांडे आणि महिरपी असलेले संगमरवरी कॉरिडॉर्स या सर्वांत राजेशाही निवासस्थानाच्या
इतिहासाचे प्रतिबिंबंब दिसते. पाहुण्यांना राजे-राण्यांच्या पाऊलखुणांवरून चालण्याचा
खराखुरा अनुभव देत राजस्थानच्या भूतकाळाची सफर हा प्रासाद घडवून आणतो.
ताज फलकनुमा पॅलेस, हैदराबाद शहरापासून २००० फूट उंचीवर बांधलेल्या ताज फलकनुमा
प्रासादात तत्कालीन निजामाच्या पाऊलखुणा शोधता येतील. त्याकाळी जगातील सर्वांत श्रीमंत
व्यक्ती समजल्या जाणाऱ्या निझाम महबूब अली पाशाचे हे एकेकाळचे निवासस्थान. १८९४ मध्ये
बांधलेल्या फलकनुमा प्रासादाच्या प्रत्येक वळणावर इतिहास, कला आणि संशोधनाच्या जादूई
खुणा दिसतात. यात भर घालतो तो पाच मोहक बेल्जियन झुंबरांनी उजळलेल्या जगातील सर्वांत
लांब डायनिंग टेबलावर भोजनाचा अलौलिक अनुभव. ३२ एकरात पसरलेल्या या राजेशाही प्रासादात
पाहुण्यांना मोठाल्या व्हेनेशिअन झुंबरांचे, सुंदर म्युरल्सचे, गालिचाने आच्छादलेल्या
जिन्यांचे, प्राचीन सामानाचे, फोटोग्राफीसारख्या भासणाऱ्या चित्रांचे, कोरिंथिअम स्तंभांचे
आणि सुशोभित रेखीव उद्यानांचे वैभव नजरेत साठवता येते. हे सर्वकाही निझामाने स्वत:च्या
कल्पनेतून तयार करवून घेतले होते.
ताज पॅलेसेस एका पूर्णपणे
वेगळ्याच जगाचा अनुभव देतात. मग तो त्यांच्या निवडक विशेष घडवलेल्या राजेशाही रोमांचक
स्थळांच्या माध्यमातून असो किंवा पाहुण्यांवर सुविधांचा वर्षाव करून त्यांना भारताच्या
राजघराण्यांच्या वैभवशाली इतिहासात घेऊन जाणे असो.
आता तुम्हाला प्रतिष्ठेच्या
ताज पॅलेसमध्ये थोडा अधिक काळ वास्तव्य करण्याची संधी आहे. दोन रात्रींसोबत तुम्हाला
एक रात्र मोफत दिली जात आहे. ही ऑफर ३० ऑक्टोबर २०१८ पर्यंत लागू आहे. तेव्हा तुमचे
आरक्षण झटकन करून टाका !
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST