Friday, October 5, 2018

जयपूर पिंक पँथर्स संघ आणि कोकिलाबेन रुग्णालय सहयोग करार
प्रो-कबड्डी लीग सीझन ६ मध्ये कोकिलाबेन रुग्णालय जयपूर पिंक पँथर्स संघाचा ‘स्पोर्ट्स मेडिसिन अँड सायन्स पार्टनर’ असणार

मुंबई, ५ ऑक्टोबर २०१८: कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयने प्रो-कबड्डी लीग सीझन ६ मधील ‘जयपूर पिंक पँथर्स’ संघाशी सहयोग केल्याचे जाहीर केले. ७ ऑक्टोबर २०१८ रोजी सुरू होणाऱ्या व जानेवारी २०१९ मधील पहिल्या आठवड्यापर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेसाठी हे रुग्णालय संघाचा ‘स्पोर्ट्स मेडिसिन अँड सायन्स पार्टनर’ असणार आहे. या सहयोगाच्या निमित्ताने रुग्णालयाला स्पोर्ट्स मेडिसिन व पायाभूत सुविधा क्षेत्रांतील कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे.

कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमधील स्पोर्ट्स सायन्स अँड रिहॅब कन्सल्टंट, स्पोर्ट्स मेडिसिन हेड, वैभव दागा म्हणाले, "ही अप्रतिम संधी आहे व परस्परांना लाभदायक सहयोग आहे. कोकिलाबेन अंबानी सेंटर फॉर स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये आम्हाला स्पोर्ट्स सायन्स व मेडिसिन क्षेत्रातील कौशल्य व पायाभूत सुविधा दर्शवता येणार आहेत, तर जयपूर पिंक पँथर्स एका सर्वोत्कृष्ट स्पोर्ट्स सायन्स व मेडिसन सेवा देणाऱ्या रुग्णालयाचा पाठिंबा मिळणार आहे. दुखापती हा कबड्डीसारख्या थरारक खेळाचा अविभाज्य भाग असून, खेळाडू त्यातून कसे बरे होतात व लवकरात लवकर पुन्हा खेळू लागतात, हे महत्त्वाचे आहे. माझ्यासाठी व माझ्या टीमसाठी हे मोठे आव्हान आहे. आम्ही अधिकाधिक पाठिंबा देण्याची दक्षता घेऊ, जेणे करून खेळाडूंची शारीरिक स्थिती नेहमी चांगली राहील, शिवाय त्यांना पूर्ण क्षमतेने खेळता येईल."

जयपूर पिंक पँथर्सचे कप्तान व प्रसिद्ध कबड्डीपटू अनुप कुमार यांनी या सहयोगाविषयी सांगितले, “हा सहयोग म्हणजे देशामध्ये खेळाची संस्कृती रुजवण्यासाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. यापूर्वी कबड्डीच्या बाबतीत वैद्यकीय बाबींकडे इतके लक्ष दिले जात नसे.  परंतु आता स्पर्धा कमालीची चुरशीची झाली आहे व आम्ही उत्कृष्ट कामगिरी करणे आवश्यक आहे. कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलने लिलावानंतर आम्हाला फिटनेस व दुखापती या बाबतीत आमचे मूल्यमापन करण्यासाठी मदत केली. आम्ही विशेष रिहॅब प्रोग्रॅममध्ये सहभाग घेतला, तसेच आमचे बॉडी वेट व बीएमआय विशिष्ट राखण्यासाठी डाएटही देण्यात आले. आगामी सीझन लवकरच सुरू होणार असून, त्यामध्ये चांगली कामगिरी बजावण्यासाठी आम्हाला य प्रत्येक गोष्टीची मदत होणार आहे.”

फिजिऑलॉजिकल, स्पोर्ट्स सायन्स व स्पोर्ट्स बायोमेकॅनिकल टेस्टिंग इक्विपमेंट असलेल्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालय, सेंटर फॉर स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये जून २०१८ मध्ये (लिलावानंतरचा कालावधी) संपूर्ण संघाच्या चाचण्या करण्यात आल्या, जेणे करून प्रत्येक खेळाडूबद्दलची आधारभूत माहिती नोंदवली गेली. चाचण्या केल्यामुळे जयपूर पिंक पँथर्स व्यवस्थापनाला खेळाडूंचा फिटनेस जाणून घेण्यासाठी मदत झाली आणि दुखापत किंवा त्रास असणाऱ्या खेळाडूंना उपचार देण्यासाठी स्पोर्ट्स सायन्स अँड मेडिसिन टीमला पुरेसा वेळ मिळाला. एखाद्या खेळाडूच्या दुखापतीवर उपचार करण्यासाठी स्पेशलिस्ट स्पोर्ट्स सर्जिकल सल्ला व अधिक उपचार करणे गरजेचे असल्यास स्पोर्ट्स मेडिसिनचे प्रमुख व देशातील एक नामवंत स्पोर्ट्स ऑर्थोपेडिक सर्जन्स डॉ. दिनशॉ परडीवाला उपचार करतील खेळाडूला लवकरात लवकर कबड्डीच्या मैदानात पाठवण्याची जबाबदारी स्पोर्ट्स सायन्स अँड रिहॅब विभागाची असणार आहे. हा सहयोग दोन्ही पक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

More digital, more luxurious, more efficient: the new Panamera

  More digital, more luxurious, more efficient: the  new Panamera • New exterior design with even greater emphasis on width • Porsche Driver...