Monday, October 15, 2018

सचिन पिळगांवकर दिग्दर्शितअशी ही आशिकीच्या निमित्ताने नवीन वर्षातव्हॅलेन्टाईन डेऐवजी साजरा होणार ‘AHA’ डे

        अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले सचिन पिळगांवकर यांनी त्यांच्या ६०व्या वाढदिवसाला प्रेक्षकांसाठी एक खास भेट म्हणून त्यांच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली होती आणि खास सरप्राईज ठरलेला तो मराठी चित्रपट म्हणजेचअशी ही आशिकी’. चित्रपटाचे नाव जाणून घेतल्यावर या चित्रपटातील कलाकार कोण हे जाणून घेण्याविषयी प्रेक्षकांची कुतूहलता वाढली. चित्रपटाचे नावंच इतके यंग आणि हटके आहे की या चित्रपटासाठी कलाकारांची निवड पण तितकीच हटके असणार. तरअशी ही आशिकीमध्ये अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे युथफूल हिरोची भूमिका साकारणार आहे. आता अभिनयची हिरोईन कोण, हे देखील प्रेक्षकांसाठी सुंदर सरप्राईज असेल. पण प्रेमाच्या महिन्यात अर्थात १४ फेब्रुवारीला प्रेमाचे नवे रंग, नवा अर्थ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतेयअशी ही आशिकी
‘        अशी ही आशिकीच्या निमित्ताने तब्बल पाच वर्षांनी सचिन पिळगांवकर पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहेत. दिग्दर्शनासह सचिनजी यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे, तसेच कथा-पटकथा-संवाद ही सचिनजी यांचेच आहेत. ‘अशी ही आशिकीचा प्रेमाचा रोमँटिक प्रवास प्रेक्षकांसाठी नक्कीच नवीन अनुभव ठरेल.

      गुलशन कुमार आणि भूषण कुमार प्रस्तुत, 'अशी ही आशिकीचित्रपटाची निर्मिती 'टी-सीरिज' आणि 'सिलेक्ट मिडिया' यांनी केली असून सहनिर्मिती सुश्रिया चित्र यांनी केली आहे. वजीर सिंह, जो राजन आणि सुप्रिया पिळगांवकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. मनोरंजनाचे माध्यम ठरलेली टी सीरिज कंपनीने अनेक हिंदी सिनेमे आणि गाणी यांच्या मार्फत प्रेक्षकांची अभिरुची जाणून त्यांच्यासाठी नेहमीच मनोरंजक प्रोजेक्ट्सची निर्मिती केली आहे.


      सचिन पिळगांवकरांच्या दिग्दर्शनाच्या शैलीतून अजून सुंदररित्या खुलून दिसणार आणि प्रेमाची नव्याने उजळणी करणारअशी ही आशिकी’.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...