Friday, October 12, 2018

सोनीवर सुरू होणार शोध महाराष्ट्राच्या सुपर डान्सरचा!
OR
छोट्या डान्सर्ससाठी नवा प्लॅटफॉर्म
- सोनी मराठी घेऊन येत आहे नवा रिऍलिटी शो 'सुपर डान्सर महाराष्ट्र'

तारिख -११ ऑक्टोबर २०१८, गुरुवार
प्रसिद्धी पत्रक

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर चांगलाच गाजलेला सुपर डान्सर हा शो मराठीत आणण्यासाठी सोनी मराठी आता सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातल्या छोट्या उस्तादांसाठीच्या या कार्यक्रमासंबंधी माहिती देण्यासाठी लोअर परेलच्या गेम झोनमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. लहान मुलांसाठी असणाऱ्या या सुपर डान्सर महाराष्ट्र या रिऍलिटी शोचा फॉर्मट लक्षात घेता पत्रकारांना त्यांच्या मुलांसोबत या परिषदेला येण्याचं आमंत्रण सोनीकडून देण्यात आलं होतं. यावेळी जमलेल्या छोट्या उस्तांदांनी पत्रकार परिषदेची रंगत वाढवली. या छोट्यांना पाहून सुपर डान्सर महाराष्ट्र चे जजेस् ही चांगलेच आनंदले. यावेळी सुपर डान्सर महाराष्ट्र करताना किती मजा येणार आहे, याचा ट्रेलर  पाहायला मिळाल्याचं जजेस् नी म्हटलं.
'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात' असं म्हणतात, आपल्यात असणाऱ्या नृत्याच्या कौशल्याला वेळीच खतपाणी मिळालं, तर आयुष्य सोपं होऊन जातं. छोट्या उस्तादांमध्ये असणाऱ्या नृत्यकौशल्याची जाणीव त्यांना करून देऊन महाराष्ट्राच्या सुपर डान्सरचा शोध सोनी मराठीवर घेतला जाणार आहे.
अभिनयाची अचूक जाण असणारे सतीश राजवाडे, 'आता वाजले की बारा' म्हणत रसिकांच्या ह्रदयाचा ठोका चुकवणारी सुंदर अभिनेत्री-नृत्यांगना अमृता खानविलकर  आणि कथाविस्तारावर भर देणारे रिंगण या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे निर्माते, यंग्राड, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा अश्या चित्रपटांची कोरियोग्राफी करणारे विठ्ठल पाटील.. ते डान्सच टेक्निक, style, याबाबत ते मुलांच परीक्षण आणि मार्गदर्शन करतील, ही त्रयी सोनी मराठीच्या या शोधमोहिमेत महाराष्ट्रात सापडणारी छोटेखानी कला आपले मापदंड लावून प्रेक्षकांसमोर सादर करणार आहे. आपल्या दिग्दर्शनातून प्रेक्षकांना दर्जेदार चित्रपटांचा गुलदस्ता देऊ करणारे सतीश राजवाडे पहिल्यांदाच रिऍलिटी शोचा भाग होणार आहेत. असा हरहुन्नरी दिग्दर्शक महाराष्ट्रात सापडणाऱ्या छोट्या उस्तादांच्या  कलेचं मूल्यमापन करणार म्हणजे महाराष्ट्राच्या विविध भागांत सापडलेले हिरे प्रेक्षकांसमोर येतील आणि डान्स चा सर्वात मोठा स्टेज - जिथे डान्सर बनतील सुपर डान्सर हा वाक्याला साजेसा असा हा कार्यक्रम जणू नृत्य प्रेमींसाठी सुद्धा पर्वणीच ठरेल यात शंका नाही.
 सगळ्यांतच एक पाऊल पुढे असणारी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकर आपल्या अनुभवांच्या गाठोड्यातून या छोट्या नृत्यकलाकारांना युक्तीच्या काय खास गोष्टी सांगणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.त्यात या कार्यक्रमाचे तिसरे परीक्षक, विठ्ठल पाटील कोरिओग्राफरच्या नजरेतून या छोट्या कलाकारांचं परिक्षण करणार आहेत. तेव्हा आपापल्या क्षेत्रात तरबेज असणाऱ्या या त्रयीचं परीक्षण पाहण्यातही एक वेगळीच मजा येणार आहे.
वेगळेपण जपण्याची परंपरा कायम ठेवत सोनी मराठीने आता छोट्या उस्तादांचं मूल्यमापन करण्यासाठी एक सुंदर त्रयी रंगमंचावर बसवली आहे. परीक्षक मंडळावर पहिल्यांदाच एकत्र आलेल्या सतीश राजवाडे, अमृता खानविलकर आणि विठ्ठल पाटील यांच्यावर 'सुपर डान्सर महाराष्ट्र' शोधण्यासाठीची जबाबदारी सोनी मराठीनी सोपवली असून या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सध्याच्या यंग ब्रिगेडमध्ये मोडणारा अमेय वाघ करणार आहे.

तेव्हा या महाराष्ट्रातल्या छोट्या उस्तादांच्या नृत्याची रंगत नक्की अनुभवा येत्या १५ ऑक्टोबरपासून फक्त सोनी मराठीवर...










No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...