दिवो कॅफे आणि बार, ग्लोबल फूड आणि लाइव्ह संगीतासाठी नवे, उच्चभ्रू
ठिकाण, कळंगुट गोवा येथे सुरू
कलंगुट, १३ ऑक्टोबर २०१८ – जागतिक स्तरावरचे रूचकर खाद्यपदार्थ, आकर्षक
कॉकटेल्स आणि या सर्वाच्या जोडीला धुंद करणारं संगीत यांची अनुभूती देणारं नवं
ठिकाण कळगुंट, गोवा इथं मोठ्या धामधुमीत सुरू झालं आहे. भारतातील हॉस्पिटॅलिटी
क्षेत्रात नवा मापदंड तयार करण्याच्या दूरदृष्टीकोनातून श्री. त्रिवेश आजगांवकर
आणि त्यांचे भागीदार श्री. शिकर कुमार या तरुण व धडाडीच्या उद्योजकांनी गोव्याच्या
प्रमुख समुद्रकिनाऱ्यावर हा उच्चभ्रू कॅफे आणि बार सुरू केला आहे.
श्री. आजगांवकर दिवो
कॅफे अँड बारचे कामकाज हाताळणार असून या लाँचमागच्या प्रेरणेबद्दल ते म्हणाले, “एप्रिल महिन्यातल्या एके दिवशी मी आमच्या तरुण, उत्साही टीमबरोबर व्यवसाय विस्तारासाठी नवनव्या संकल्पनांवर
चर्चा करत होतो. आम्हाला नाविन्यपूर्ण आंतरराष्ट्रीय स्वादाची चव देणारं आणि
महत्त्वाचं म्हणजे गोव्याचा वारसा दर्शवणारं एक आधुनिक रेस्टॉरंट उभारायचं होतं.
त्यातूनच दिवो कॅफे अँड बार उभारण्याची संकल्पना जन्माला आली. आम्ही खाद्यसंस्कृतीच्या जाणकारांकडून आमच्या
खाद्यपदार्थांबद्दल अभिप्राय जाणून घेतला व त्यातून वैविध्यपूर्ण आणि रूचकर
पदार्थांचा समावेश असलेला मेन्यू तयार झाला.”
कळंगुटच्या मुख्य रस्त्यावर
वसलेल्या दिवो कॅफे अँड बारला रिहा कुमार आणि प्रसिद्ध गोवन इलस्ट्रेटर मॅन्युएला
मेंडोंन्सा गोम यांनी उत्साही, सळसळता लूक दिला आहे. काचेची अप्रतिम रचना करून या
हॉटेलची अंतर्गत सजावट बाहेरच्या गजबजत्या रस्त्याशी जणू एकरूप करण्यात आली आहे.
बारला आलिशान लूक देण्यासाठी आणि तरीही कॅफेची संकल्पना कायम राखण्यासाठी राखाडी
रंगाची लाल आणि हिरव्या अशा तजेलदार रंगांबरोबर रंगसंगती करण्यात आली आहे. शिवाय
झाडं आणि कलात्मक वस्तूंनी दिवोला कॅज्युअल तरीही शानदार लूक दिला आहे.
श्री. आजगांवकर यांच्या मते आज गोव्यातील
रेस्टोबारचे डिझाइन नारळाच्या झावळ्या आणि लाल दगडांच्या पलीकडे जात आधुनिक,
सुटसुटीत आणि तरीही आकर्षक झाली आहे. ते म्हणाले, ‘गोव्याचा श्रीमंत वारसा आणि
कला यांच्यापासून प्रेरणा घेतलेली अंतर्गत सजावट करण्यासाठी आम्ही रात्रंदिवस
मेहनत केली आहे. शिवाय, भारतातील प्रसिद्ध इलस्ट्रेटर मारियो मिरांडा यांच्या
कलेपासून प्रेरणा घेत एका भिंतीची आम्ही खास सजावट केली आहे. मारियो मिरांडा वॉल
ही या कॅफेमधील सर्वात लक्षवेधक गोष्ट असून, गोव्याच्या या आंतरराष्ट्रीय
कीर्तीच्या कलाकाराला आम्ही मानवंदना दिली आहे.’
लक्षवेधी
अंतर्गत सजावटीखेरीज दिवो कॅफे आणि बारमधील खाद्यपदार्थांची चव जीभेवर रेंगाळणारी
आहे, मग तो सकाळचा नाश्ता असो, दुपार किंवा रात्रीचं जेवण असो, त्यात प्रत्येकालाच
परफेक्ट पदार्थ चाखायला मिळतात. जेवणाची सुरुवात साध्या पण रूचकर टोमॅटो किंवा
बेसिल सूपने करता येईल. रंगीबेरंगी आणि फोटोजनिक असे दिवोची खासियत असलेले,
फ्राइजबरोबर सर्व्ह केले जाणारे सँडविच पोट पटकन भरण्यासाठी एकदम योग्य आहे.
हाताने बनवलेले, नाजूकपणे तयार केलेले आणि खाण्यास एकदम तयार असलेले वॉटरमेलन फेटा
सॅलड प्रत्येक घासागणिक परफेक्ट लागते. मेडिटेरियन मसाल्यांमध्ये मॅरिनेट केलेले
ग्रिल्ड चिकन या पदार्थाला स्वर्गीय चव देते. अगदी पूर्वीच्या काळात सर्वात
प्रसिद्ध कॉकटेल म्हणजे मॉस्को म्यूल. हे प्राचीन कॉकटेल आमच्या मेन्यूमध्येही
समाविष्ट करण्यात आले असून ते पारंपरिक पद्धतीच्या हायबॉस कॉपर मगमध्ये सर्व्ह
केले जाते. त्याशिवाय किवी आणि बनाना स्मूदीसारख्या हेल्दी पर्यायानेही वीकेंडची
धमाल सुरुवात करता येऊ शकते.
दिवो कॅफे अँड बारचे दैनंदिन कामकाज हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातले उत्साही आणि पॅशनेट व्यवस्थापक श्री. साहिल जोशी यांच्यातर्फे हाताळले जाणार आहे. किचनचे काम कार्यकारी शेफ मानस पात्रा सांभाळणार असून ते आपली समर्पित टीम तसंच सर्वोत्तम काँटिनेंटल व जागतिक पदार्थांसाठी प्रसिद्ध आहेत.
तेव्हा या पार्टी सीझनमध्ये दिवो
कॅफे अँड बारमध्ये या आणि अप्रतिम सजावट व स्वादिष्ट मेन्यूचा आनंद घ्या.
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST