Monday, October 29, 2018

मोहसिन अख्तरच्या पहिल्या मराठी चित्रपटात शरदची हटके भूमिका
or
'माधुरी'मध्ये शरद साकारणार यापूर्वी कधीही केलेली भूमिका
or
'माधुरी'साठी शरद दिसणार अजून जास्त हॉट आणि हँडसम
or
मोहसिन अख्तर निर्मितमाधुरीमध्ये शरद केळकरची यापूर्वी कधीही पाहिलेली भूमिका

                ‘मुंबापुरी प्रॉडक्शनचे मोहसिन अख्तर निर्मित आणि सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेल्यामाधुरीया मराठी चित्रपटाची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. नवरात्रीच्या दिवसात टीझर पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर या चित्रपटाविषयीची कमालीची उत्सुकता वाढली आहे. एका सुंदर नात्याची गोष्ट सांगणा-यामाधुरीया चित्रपटात सोनाली कुलकर्णीसह अभिनेता शरद केळकरची पण महत्त्वाची भूमिका आहे. नेहमी वेगवेगळ्या भूमिका साकारणारा शरद या चित्रपटात प्रेक्षकांनी कधीही पाहिलेल्या एका हटके रुपातून दिसणार आहे. नुकतेच, शरद केळकरने त्याच्या सोशल मिडीया अकाऊंट्सवरुन या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे आणि या टीझरमधून शरदच्या लूकची आणि भूमिकेची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे.

          ‘माधुरीमधील शरद केळकरच्या आगळ्या-वेगळ्या भूमिकेविषयी बोलताना निर्माते मोहसिन अख्तर यांनी म्हटले की, “शरदने जे पात्रं साकारलं आहे त्या पात्राविषयी मी फार विचार केला की मी यासाठी कोणाला कास्ट करु शकतो. कारण हे पात्र प्रेमळ, हँडसम आणि हॉट आहे. शरदची आणि माझी खुप जुनी ओळख आहे. शरदचं काम मी पाहिलंय आणि त्यामुळे माझ्या पात्राच्या ज्या गरजा आहेत त्यात शरद एकदम फीट बसतो. शरदचा अभिनय, त्याचा आवाज, त्याचा लूक या सगळ्या गोष्टी फार कमाल आहेत आणिमाधुरीमध्ये शरदने अप्रतिम काम केलंय आणि मुळात, प्रेक्षकांना त्याने या कधी नं साकारलेलं पात्रं पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील शरदचे काम पाहिल्यावर मला खात्री आहे की शरद मराठी सिनेमामध्ये एक छाप सोडेल इतका त्याचा अभिनय अप्रतिम आहे


    निर्माते मोहसिन अख्तर निर्मितमाधुरीचित्रपटातील शरदची आगळी-वेगळी भूमिका येत्या ३० नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.




No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026

  India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026 IIJS Bharat – Signature 2026 to expected to ge...