Monday, October 29, 2018


Option 1 - भारूड सांगणाऱ्या तात्यांवर प्रेक्षकांचा जडला जीव
 -अरूण नलावडेंनी साकारलेल्या दर्जेदार भूमिकांमध्ये भेटी लागी जीवातल्या तात्यांची भर
Option 2 -  भेटी लागी जीवातल्या तात्यांवर प्रेक्षकांचा जडला जीव
 -रंगकर्मी अरूण नलावडेंच्या दर्जेदार भूमिकांमध्ये तात्यांची भर

 सोनी मराठी वाहिनीने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केलंय आणि याचे एकमेव कारण म्हणजे सोनी मराठी वाहिनीवरील मनोरंजक मालिका. या वाहिनीवरील सर्वच मालिका लोकप्रिय होतं आहेत आणि प्रत्येक मालिकेत एक नाविन्य, वैशिष्ट्य आहे. त्यापैकीभेटी लागी जीवाया मालिकेचे वैशिष्ट्ये म्हणजे या मालिकेतील कलाकार आणि कथा. पिढ्या आणि त्यातील प्रमुख पुरुष मंडळी यांच्या नात्यावर आधारित कथा मांडून सोनी मराठीने एक उत्तम मालिका प्रेक्षकांसाठी आणली आहे. पिढ्या, त्यांचे स्वभाव, त्यांची मतं, त्यांचा एकंदर वावर याच्या अवती-भवती फिरणारीभेटी लागी जीवाची कथा खूप सुंदर पध्दतीने मांडली जात आहे. आणि ही कथा तितक्याच सुंदर पध्दतीने यातील पिढ्यांतील प्रमुख पुरुष पात्र साकारणारे कलाकार अरुण नलावडे (तात्या), समीर धर्माधिकारी (विकास) आणि श्रेयस राजे (विहंग) यांनी पडद्यावर सादर केली आहे.
 एकापाठोपाठ एक दर्जेदार भूमिका करणारे ज्येष्ठ रंगकर्मी अरूण नलावडे तात्यांच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यांच्या पात्राचं वैशिष्ट्य म्हणजे जागोजागी भारूडाचे कार्यक्रम करणाऱ्या तात्यांच्या वाणीत ऐकू येणाऱ्या ओव्या आणि त्या ओव्यांभोवती गुंफलेलं तात्यांचं आयुष्य. डिजे-रिमिक्स च्या या काळात गवळण, भारूड, भजन, किर्तनसारखे शब्द कानावर पडणं दुर्मिळचं. मात्र सध्या सोनी मराठीवर सुरू असलेल्या या मालिकेच्या निमित्ताने कानी पडणारे हे शब्द प्रेक्षकांना खूपच भावत आहेत. त्यात तात्यांकडून या एकंदर नाट्याला मिळणारी भारूडाची जोड कौतुकास्पद आहे. केवळ भारूड किंवा किर्तनच नाही तर अरूण नलावडे म्हणजेच तात्यांना दिलेले संवाद ही तितक्याच ताकदीचे आहेत. हल्लीच्याच एका भागात, " आशिर्वादाला ओझं समजून परत करायला आले की काय..." म्हणणाऱ्या तात्यांचे संवाद भाव खाऊन जात आहेत. त्यात मालिकेच्या अनुशंगाने सादर होणारं भारूड प्रेक्षकांना आपल्या मुळांशी घट्ट जोडून ठेवत आहे.
 भारूडाशी जोडलेली तात्यांची पिढी, बिझनेस हेच सर्वस्व समजणारा मध्यमवयीन विकास आणि तारूण्याशी नुकतीच ओळख झालेला तरूण म्हणजे विहंगमुलगा-वडील-नातू अशी ही तीन पिढी, त्यांच्यातील पुरेसा नसणारा संवाद, भावना यावर आधारितलभेटी लागी जीवामालिकेतील या तिघांच्या नात्यामध्ये पडलेली दरी कशी भरत जाते हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेअरुण नलावडे, समीर धर्माधिकारी आणि श्रेयस राजे यांनी त्यांच्या भूमिका इतक्या चोख पार पाडल्या आहेत की ही कथा जणू आपल्या सभोवताली घडतेय असं वाटून प्रेक्षक मालिकेला मनापासून दाद देत आहेत.
 आजोबा आणि नातू यांची योगायोगाने झालेली भेट प्रेक्षकांसाठी आनंददायी क्षण असेल पण त्यांच्या नात्याची खरी ओळख त्यांना कधी होईल हे जाणून घेण्यासाठी पण प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतील. आपल्या वडीलांना भेटवण्यासाठी जेव्हा विहंग तात्यांना घेऊन त्याच्या घरी जाईल तेव्हा काय घडेल अन् कसं घडेल हे पाहण्यासाठी बघत राहाभेटी लागी जीवासोमवार ते शनिवार रात्री १०:३० वाजता फक्त सोनी मराठी वर.
  

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Dr. Deepika Krishna: the Brain and Heart behind India’s most revolutionary wellness ventures- Immunosciences, TEDX Speaker and L&B Clinics, the author of Health Cocktail

  Dr. Deepika Krishna: the Brain and Heart behind India’s most revolutionary wellness ventures- Immunosciences, TEDX Speaker and L&B Cli...