Tuesday, December 4, 2018

सिडनी आणि मेलबर्नच्या डेस्टिनेशनवर व्हिडीयो पॅलेसची ‘झिलमिल’ 

  लियातील सिडनी आणि मेलबर्नसारख्या नयनरम्य लोकेशन्सवर व्हिडीयो पॅलेसची ‘झिलमिल’ 

 बेखबर कशी तू’ या रोमँटिक गाण्याने सर्वांना पुन्हा एकदा प्रेमाचे वेड लावणार-या व्हिडीयो पॅलेसने ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी एक नवीन म्युझिक व्हिडीयो प्रेक्षकांसाठी आणण्याचा बेत आखला आहे. सेलिब्रेशन उत्साहाने झाले पाहिजे या हेतूने व्हिडीयो पॅलेसचा आगामी म्युझिक व्हिडीयो ‘झिलमिल’चे टीझर पोस्टर नुकतेच सोशल मिडीयावर लाँच करण्यात आले आहे.

व्हिडोयो पॅलेस त्यांच्या प्रत्येक म्युझिक व्हिडीयोमधून हटके, इंटरेस्टिंग आणि रॉकिंग देण्याचा प्रयत्न करतात. मग ते गायक असो, कलाकारांची जोडी असो किंवा लोकेशन्स... पण व्हिडीयो पॅलेसने प्रत्येकवेळी काहीतरी नवीन प्रेझेंट करावं हा त्यांचा मुख्य हेतू असतो. त्यामुळे ‘बेखबर कशी तू’ या गाण्याला प्रेक्षकांनी मनापासून दाद दिल्यावर, प्रेक्षकांसाठी आणखी एक खास भेट म्हणून ‘झिलमिल’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

गुझबम्प्स एंटरटेनमेंट आणि व्हिडीयो पॅलेस प्रस्तुत ‘झिलमिल’ या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे लोकेशन्स. ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न आणि सिडनीच्या नयनरम्य ठिकाणी या गाण्याचे शूट झाले आहे.  हल्ली मराठी चित्रपट, गाणी यांचे शूटिंग परदेशात होऊ लागल्यामुळे प्रत्येक मराठी प्रेक्षकासाठी ही अभिमानाची बाब आहे. आपल्या वातावरणाने आणि सुंदर देखाव्यामुळे अनेकांना भुरळ पाडणा-या या लोकेशन्सवर या गाण्याचे शूट झाले असून या गाण्याच्या टीझर पोस्टरवर दिसणारा अभिनेता नेमका कोण आहे, असा प्रश्न अनेकांना नक्की पडला असेल. तसेच ‘गेट ऑन दि बीट’ हे कॅप्शन असे सुचविते की हे डांसिंग नंबर आहे जे प्रेक्षकांना आपल्या बीटवर थिरकायला भाग पाडतील.

आता फक्त काही दिवसांचा अवधी, मग सेलिब्रेशनच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येतेय ‘झिलमिल’. तोपर्यंत ओळखा पाहू सिडनी आणि मेलबर्नच्या लोकेशन्सवर कोणता अभिनेता करणार आहे डांसिंग नंबरच्या बीटवर ‘झिलमिल’.


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026

  India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026 IIJS Bharat – Signature 2026 to expected to ge...