Monday, December 24, 2018

*टी-सिरीजचा पहिला मराठी चित्रपट आणि सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’चे रोमँटिक पोस्टर प्रदर्शित; कोण असेल अभिनयची हिरोईन?* 

'आशिक' आणि 'आशिकी' हे दोन शब्द जरी उच्चारले तरी ‘लैला-मजनू’, ‘रोमिओ-जुलिएट’ यांसारख्या रोमँटिक आणि प्रेमळ जोड्या आणि त्यांची लव्हस्टोरीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आशिकी म्हंटलं की प्रेमातला वेडेपणा, जीव ओतून समोरील पार्टनरला खूष करण्याचे प्रयत्न या गोष्टी हक्काने येतातच… अशीच आशिकी आता मराठीत पाहायला मिळणार आहे.

ज्याप्रमाणे ओढ म्हणजे काय ते जीव लावल्याशिवया कळत नाही त्याचप्रमाणे आशिकी म्हणजे काय हे वेड्यासारखं आणि मनापासून प्रेम केल्याशिवाय कळत नाही. अशीच एका नव्या जोडीची लव्हस्टोरी पाहिल्यावर प्रत्येकजण नक्कीच बोलणार "अशी ही आशिकी"…

सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’ हा मराठी चित्रपट येत्या नव्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे. गेल्यावर्षी सचिनजी यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी रिटर्न गिफ्ट म्हणून या चित्रपटाची अनाऊंसमेंट केली होती. ‘अशी ही आशिकी’ हा चित्रपट अनेक कारणांसाठी स्पेशल ठरणार आहे. जसे की, या चित्रपटाचे रोमँटिक टायटल, गोष्ट, सचिनजी यांचे जवळपास ५ वर्षांनी पुन्हा एकदा दिग्दर्शन, स्टारकास्ट, लोकेशन्स इत्यादी.

‘अशी ही आशिकी’ला अगदी शोभून दिसेल आणि ‘आशिकी’ असं नाव जरी उच्चारलं तर या चित्रपटातील कपल आठवतील अशी हिरो-हिरोईनच्या जोडीची निवड सचिनजी यांनी केली आहे. यंग, टॅलेंटेड अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे या चित्रपटात हिरोच्या भूमिकेत दिसणार आहे पण अभिनयची हिरोईन कोण हे अजूनही सिक्रेट आहे जे लवकरच रिव्हिल होणार आहे.

 नुकतेच या चित्रपटाचे टीझर पोस्टर सोशल मिडीयावर लाँच करण्यात आले आहे. मात्र टीझर पोस्टरमध्ये हिरोईनचा चेहरा पूर्णपणे दाखवण्यात न आल्यामुळे कोण असेल सचिनजींच्या चित्रपटाची हिरोईन याचे अनेक अंदाज बांधले जात आहेत. या टीझर पोस्टरने प्रेक्षकांना प्रेमाने टीझकरुन प्रेक्षकांची चित्रपटासाठी असलेली एक्ससाईटमेंट वाढवणार हे नक्की.

गुलशन कुमार प्रस्तुत ‘अशी ही आशिकी’ची निर्मिती टी-सिरीजचे भूषन कुमार आणि क्रिशन कुमार यांनी केली आहे. तसेच मुव्हिंग पिक्चर्स आणि सुश्रिया चित्र यांनी देखील या चित्रपटाची निर्मिती केली असून वजीर सिंह, जो राजन आणि सुप्रिया पिळगांवकर हे सुध्दा या चित्रपटाचे निर्माते आहेत. दिग्दर्शनासोबत सचिनजी यांनी या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाचीही जबाबदारी सांभाळली आहे. इतकेच नव्हे तर कथा-पटकथा-संवाद देखील सचिनजी यांनीच लिहिले आहेत.

 ‘अशी ही आशिकी’ची ही रोमँटिक जर्नी  व्हॅलेंनटाईन डे ला म्हणजेच  १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांना पाहायला आणि आशिकीचा फील घ्यायला मिळणार आहे.


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...