Monday, December 24, 2018



आयुष्यावर प्रेमाची उधळण करणारा कौटुंबिक सिनेमा "लव यु जिंदगी"

        एसपी प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड, सचिन बामगुडे निर्मित  मनोज सावंत दिग्दर्शितलव यु जिंदगीचित्रपटाचा ट्रेलर २० डिसेंबरला मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये भव्यतेने प्रदर्शित झाला. चित्रपटाचा रंजक आणि उत्कंठावर्धक टीझर बघून लव यु जिंदगी चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता प्रेक्षकांच्या आणि माध्यमांमध्ये निर्माण झाली होती. सचिन पिळगावकर, कविता लाड मेढेकर, प्रार्थना बेहरे यांची  प्रमुख भूमिका असलेला लव यु जिंदगीचा ट्रेलर आता प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. ट्रेलरदेखील टीझर इतकाच रंजक झाला असून चित्रपट विनोदी, कौटुंबिक आणि आज प्रत्येक व्यक्तीलारिलेट करता येण्याजोगा वाटतो. ट्रेलरमध्ये अनिरुद्ध दाते या जिंदादील व्यक्तीची कथा दर्शवते. आयुष्यावर प्रेम करायला वयाची सीमा नसते हे हा सिनेमा सांगतो.
 चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन मनोज सावंत यांचं आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा प्रथम चित्रपट आहे. चित्रपटाची निर्मिती एस. पी. प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड आणि एस. पी. एंटरप्राइजेज यांनी प्रस्तुती केली आहे. चित्रपटाचे निर्माते सचिन बामगुडे यांनी चित्रपटाची ही दुहेरी बाजू समर्थपणे सांभाळली आहे.

          चित्रपटात अनिरुद्ध दाते यांची भूमिका सचिन पिळगावकर यांनी केली आहे. अनिरुद्ध दातेच्या बायकोच्या भूमिकेत कविता लाड मेढेकर आहेत. प्रार्थना बेहरेला अनिरुद्ध दातेची तरुण मैत्रीण म्हणूनरियाच्या टवटवीत भूमिकेत बघताना छान वाटतं. याशिवाय अतुल परचुरे आणि समीर चौघुले यांनी नेहमीप्रमाणे आपल्या सहज अभिनयाने आपापल्या भूमिकेला सजवलं आहे. चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन समीर सापतिस्कर यांनी केलंय. चित्रपटाला साजेसं छायाचित्रण  पराग देशमुख यांचं आहे. पार्श्वगायनाची धुरा अवधूत गुप्ते आणि सचिन पिळगावकर यांनी सांभाळली आहे. लव यु जिंदगी चित्रपटाची पटकथा श्रीपाद जोशी आणि मनोज सावंत तर संवाद गणेश पंडित आणि श्रीपाद जोशी यांनी लिहिले आहेत. सचिन पिळगावकर, कविता लाड मेढेकर आणि प्रार्थना बेहरे यांची प्रमुख भूमिका असलेला एक  सकारात्मक चित्रपटलव यु जिंदगी११ जानेवारीला  महाराष्ट्रभर प्रदर्शित होतोय.









No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable....

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable.... #Chhaava kicks off Week 3 with a bang! Rakes in 13.30 Cr on 3rd Friday, taking its ...