Saturday, December 8, 2018


मुंबई, ४ डिसेंबर २०१८: ना जिवंत ना मृत आहे... ती फक्त अंधाऱ्या रात्रीची कहाणी आहे, एक शापित शक्ती आहे. आपल्या सभोवतीच बेमालूम लपलेली अशी, आहे तरी कोण ती नक्की? गूढ आणि भय यांच्या एका आगळ्या समांतर दुनियेत आपल्या प्रेक्षकांना सफरीवर नेण्यासाठी &TV आणि एकता कपूर यांची बालाजी टेलिफिल्म्स घेऊन येत आहेत – डायन. ही मालिका म्हणजे खिळवून ठेवणारी कथा आहे, एका अशा मुलीची जी आपल्या आजुबाजूच्या जिवलग लोकांच्यात बेमालूमपणे दडून बसलेल्या दुष्ट सैतानी शक्तीला शोधून काढण्याच्या आणि त्या शक्तीच्या योजनांना नेस्तनाबूत करण्याच्या मार्गावर निघालेली आहे. लोकप्रिय टीव्ही कलाकार टीना दत्ता आणि मोहित मल्होत्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही नवीन थरारक काल्पनिक मालिका सुरु होत आहे, येत्या १५ डिसेंबर २०१८ पासून दर शनिवार आणि रविवारी रात्री ९.०० वाजता फक्त &टीव्हीवर.

डायन ही जान्‍हवी मौर्य (टीना दत्ता) नावाच्या तरुण मुलीची रहस्यमयी कथा आहे. उज्जैन येथे राहणारी जान्‍हवी सुशिक्षित आणि आपल्या कुटुंबाशी जवळकीने जोडली गेलेली मुलगी आहे. अशातच तिच्या गावात आजुबाजूला काही अनपेक्षित, गूढ आणि अनाकलनीय घटना वारंवार घडू लागतात. त्याचा मागोवा घेताना सैतानी शक्तींनी टाकलेल्या एका कावेबाज आणि धोकादायक डावाची अचानक तिला कल्पना येते आणि या साध्यासुध्या जान्‍हवीची काळासोबत अत्यंत चुरशीची स्पर्धा सुरु होते. जीवावरचा गंभीर धोका पत्करून आता जान्‍हवी निश्चय करते, त्या ‘डायन’चा रहस्यभेद करून तिचे अस्तित्व सर्वांसमोर उघड करण्याचा, जी त्यांच्यातील एक भाग होऊन बेमालूम लपून बसलेली आहे. जान्‍हवीच्या या थरारक आणि धोकादायक मोहिमेत तिची साथ द्यायला पुढे येतो, तिचा बालपणीचा मित्र आणि मनातून तिच्यावर प्रेम करणारा गर्भश्रीमंत व धाडसी आकर्ष शर्मा (मोहित मल्होत्रा). त्यांच्या जोडीला अमित ठाकूर, आकाश तलवार, रिशिता नाग, कनिका शिवपुरी, प्रभात भट्टाचार्य, प्रिया भाटीजा या लोकप्रिय आणि नामांकित कलाकारांनी देखील आपल्या विविध भूमिकांद्वारे या मालिकेत अनोखे रंग भरलेले आहेत.

या नव्या मालिकेबद्दल बोलताना &TVचे प्रमुख विष्णू शंकर म्हणाले, “आमच्या प्रेक्षकांना सातत्याने नाविन्यपूर्ण आणि रोचक रंजक मनोरंजनाची मेजवानी देत राहणे, हे &TV मध्ये आमचे मुख्य ध्येय आहे. त्यामुळेच नेहमीपेक्षा वेगळे, आजवर चोखाळले न गेलेले विषय आणि सादरीकरण घेऊन प्रेक्षकांसमोर येताना आम्ही कायम अत्यंत उल्हसित असतो. 'लाल इश्क' मालिकेद्वारे अतिमानवी जग आणि प्रेम यांची सांगड घालणारे आम्ही सर्वप्रथम होतो आणि या मालिकेने जीईसी श्रेणीत एक अत्यंत आगळे आणि अव्वल स्थान निर्माण केले. यामुळे आम्हाला आणखी प्रोत्साहन मिळाले असून आमच्या डायन या नवीन मालिकेत आम्ही थरारक भय आणि गूढ रहस्य यांची गुंफण केलेली आहे. येत्या १५ डिसेंबरपासून रात्री ९.०० च्या प्राईमटाईम वेळेत ही मालिका प्रेक्षकांचे वीकेंड थरारक करून टाकणार आहे. आपल्या आजुबाजूच्या लोकांच्यात दडून बसलेल्या दुष्ट सैतानी शक्तीला शोधून तिच्या योजनांना नेस्तनाबूत करण्याच्या मार्गावर निघालेल्या जान्‍हवी मौर्य या तरुण मुलीची ही कथा आहे. या प्रोजेक्टसाठी एकता कपूर आणि बालाजी टेलिफिल्म्ससोबत सहयोग करताना आम्हाला अत्यंत आनंद होत असून त्यांच्या टीमचे आम्ही &TV परिवारात अंतःकरणपूर्वक स्वागत करतो.”

आपल्या मालिकेबाबत बोलताना बालाजी टेलिफिल्म्सच्या एकता कपूर म्हणाल्या, “संपूर्ण टीम आणि मी 'डायन' सादर करताना अत्यंत उत्‍साहित आहोत. ही मालिका तयार करण्यासाठी गेल्या काही महिन्यात आम्ही अतिशय कठोर परिश्रम घेतले आहेत. आणि &TV सोबत ते सारे परिश्रम, ती मेहनत एवढ्या सुरेखप्रकारे प्रत्यक्ष साकार होत असल्याचे पाहून आम्हाला अतिशय आनंद होत आहे. मालिकेतील प्रमुख पात्र असलेल्या जान्‍हवीच्‍या डायनचे रहस्य शोधून काढण्याच्या प्रवासावर प्रेक्षकांना घेऊन जाणारी ही मालिका भय, थरार, गूढ, रहस्य, नाट्य, रोमान्स अशा सर्वच अनुभूतींचा उत्कृष्ट मिलाफ असून प्रेक्षकांना एक सर्वांगीण उत्कृष्ट असे मनोरंजन यातून मिळणार आहे. कलाकारांची एक जबरदस्त सुरेख अशी टीम या मालिकेत एकत्र आली असून त्यांच्या जोडीला मालिकेतील कथा प्रेक्षकांना अद्भुतप्रकारे गुंगवून ठेवेल आणि त्याचवेळी पुढे काय होणार याची उत्कंठा शिगेला पोचवेल याची आम्हाला खात्री आहे. भयकथा या प्रकारातील निर्मिती करताना मला खूप मजा आली आणि प्रेक्षकांकडूनही त्याला मोठी दाद मिळाली याचे समाधान वाटते. यावेळी सुद्धा आम्ही एक निर्विवाद विजेती कलाकृती साकारली असल्याचा मला विश्‍वास वाटतो आहे. परमेश्वराच्या आशीर्वादाने आता आम्ही ही मालिका प्रेक्षकांच्या स्वाधीन सुपूर्द करत आहोत.”

या आधी विविध भूमिका यशस्वीपणे पार पडलेली गुणवान अभिनेत्री टीना दत्ता म्हणाली, “जान्‍हवीची भूमिका करण्यासाठी माझी निवड झाली आणि बालाजी टेलिफिल्म्स व एकता यांच्यासोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाली याबद्दल मला आनंद तसेच कृतज्ञता वाटते. भय-रहस्य या प्रकाराला प्रेक्षकांकडून चांगला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळालेला आहे आणि या प्रकारात पदार्पण करायला मिळाले याबद्दल मी खूपच उत्‍साहित झालेले आहे. जान्‍हवीचे पात्र मी आजवर साकारलेल्या सर्वच भूमिकांपेक्षा खूप वेगळे आहे. एका साध्यासुध्या मुलीपासून ते प्रचंड खंबीर आणि एकेवेळी स्वतःच्या जीवनातील राक्षसांशी सामना करणाऱ्या धाडसी मुलीत झालेले तिचे परिवर्तन अनोखे आहे. एका सध्यासुध्या मुलीने अतिमानवी शक्तीशी दिलेला लढा आणि आपल्या जिवलगांच्यात दडून बसलेल्या डायनचा पर्दाफाश करण्याचा तिचा प्रवास यांची ही अत्यंत थरारक अशी कहाणी आहे.”

मालिकेतील प्रमुख पुरुष भूमिका साकारणारा लोकप्रिय अभिनेता मोहित मल्होत्रा म्हणाला, ''&TV सोबत माझी ही दुसरी मालिका आहे. आणि माझ्यासाठी बालाजी टेलिफिल्म्स हे जणू दुसरे घरच असल्यासारखे आहे. त्यामुळे मालिकेतील प्रमुख पुरुष पात्र असलेल्या आकर्ष शर्माची भूमिका साकारताना मला अतिशय आनंद झाला. डायन ही एक भय-रहस्य प्रकारची मालिका असून मी गेल्या कित्येक काळापासून अशा प्रकारच्या कथेची वाट चोखाळण्याच्या प्रतिक्षेत होतो, त्यामुळे ही संधी मिळताच मी ती सोडणे शक्यच नव्हते. रहस्य आणि भय यांचा मिलाफ झाल्यामुळे हा प्रकार अतिशय रंजक आणि उत्कंठावर्धक बनला आहे. माझ्या आकर्ष या पात्राची कथेत अतिशय महत्वपूर्ण भूमिका आहे. तो केवळ जान्‍हवीचे प्रेमपात्र नाही तर संपूर्ण कथेमध्ये तिचा सातत्यपूर्ण सहकारी देखील आहे.”

जादूटोणा आणि मंत्र तंत्र यांच्या गहनगूढ आणि मिट्ट काळोख्या रस्त्यांवरून आपल्या दैवाने आखलेला प्रवास करणारी डायन प्रेक्षकांच्या मनामध्ये अनेक गहन प्रश्न निर्माण करणार आहे. डायनच्या मागे दडलेले गूढ रहस्य शोधून काढण्यात जाह्नवीला यश मिळेल? की स्वतःच्या त्या सैतानाच्या सावलीमध्ये कुठेतरी हरवून जाईल? तिच्या अस्तित्वाचे गूढ आणि तिच्या प्रकटीकरणाचे अनोखे अपारंपरिक रूप यांच्याद्वारे &TV सामोरे आणत आहे, एक असे जग जिथे प्रत्येक कोपऱ्यात सैतानी कावा दडलेला आहे, जिथे प्रत्येक गोष्ट खरी वाटते, पण तरीही कुठलीच खरी नसते.

तेव्हा चला 'डायन'च्या एका अनोख्या रहस्यमयी दुनियेची सफर करूया, येत्या १५ डिसेंबर २०१८ पासून दर शनिवार आणि रविवारी रात्री ९.०० वाजता फक्त &TV वर

About &TV
Launched in 2015, &TV is the flagship Hindi GEC of the ‘&’ bouquet of channels from Zee Entertainment Enterprises Limited (ZEEL), a global media and entertainment company. Staying true to the personification of the Ampersand, &TV’s brand philosophy ‘Hain Khaas Har Andaaz’ celebrates the multiple personas of today’s Indian as they actualize the various ‘&s’ in their life. The channel’s content is designed in sync with its core proposition, offering diversified content and unified viewing experience. Some of its unique offerings include popular shows like Bhabhiji Ghar Par Hain, Paramavatar Shri Krishna, Meri Hanikarak Biwi, Perfect Pati, Vikram Betaal Ki Rahasya Gaatha and Love Me India amongst others. &TV is available in SD and HD across all Cable and DTH platforms and enjoys a leading presence in international markets including Asia Pacific, Europe, the Middle East and Americas. Viewed by the urban and premium audience, &TV is fast gaining popularity across territories.

Stay tuned to &TV shows on ZEE5 and our social media platforms like Twitter - @AndTVOfficial; Facebook – AndTVOfficial and Instagram – andtvofficial.











No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...